How to Increase Computer Speed in Marathi - दैनंदिन जीवनात आपण संगणक किंवा लॅपटॉपवर काम करत असू आणि त्यांचे कार्य व्यवस्थित चालले तर आपल्याला काही वाटत नाही. मात्र जर ते अगदीच हळू चालत असतील आणि वारंवार आपल्या कामात अडथळा येत असेल तर मात्र आपण वैतागून जातो.

आम्ही आपल्याला याठिकाणी काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचा वापर करून आपण आपला संगणक किंवा लॅपटॉप यांचा वेग [स्पीड] आश्चर्यकारकरित्या वाढवू शकता.
जर आपल्याला हि माहिती आवडली तर आपल्या मित्रांना जरूर शेअर करा.

How to Increase Computer Speed in Marathi

आपण बघितले असेल कि जेंव्हा आपला संगणक किंवा लॅपटॉप हा नवीन असतो त्यावेळेस त्याचा वेग हा अतिशय जास्त असतो. म्हणजे आपण कुठलीही फाईल उघडली कि ती लगेच क्षणात उघडते. मात्र जसजसा तो संगणक किंवा लॅपटॉप जुना होऊ लागतो तसतसा त्यांचा वेग कमी कमी होऊ लागतो. त्यांची अनेक कारणे आहेत व त्यांच्यावर असलेले उपाय खालीलप्रमाणे -

How to Increase Computer Speed in Marathi

Startup प्रोग्राम डिसेबल करा -

जेंव्हा जेंव्हा आपण संगणक किंवा लॅपटॉप चालू करतो त्यावेळी हे चालू होत असताना Background ला खूप सारे Application सुरू होत असतात. त्याचा परिणाम असा होतो कि आपला संगणक किंवा लॅपटॉप सुरु होण्यास खूपच वेळ लागतो आणि त्याचा आपल्या कामावर परिणाम होतो.
त्यामुळे जे Application आपल्याला नको आहेत, ते आपण Startup प्रोग्राममधून डिसेबल करू शकता.

How to Increase Computer Speed in Marathi

त्यासाठी खालीलप्रमाणे स्टेप्स फॉलो करा -
 1. Ctrl + alt + delete हि कि [बटन] दाबा.
 2. आता Task Manager या पर्यायावर क्लिक करा.
 3. आता पुढे Startup हा पर्याय दिसत असेल त्यावर क्लिक करा.
 4. आता आपल्यापुढे खूप सारे पर्याय दिसत असेल. त्यावर जे आपल्याला Enabled राहू द्यायचे असेल ते Enabled राहू द्यावे. आणि जे Application आपल्याला नको असेल ते Disable करून टाकावे.
महत्वपूर्ण सूचना - याठिकाणी आपण आपले कोणतेही अँटी व्हायरस किंवा मायक्रोसॉफ्टचे कोणतेही सॉफ्टवेअर Disable करू नका.

हे देखील वाचा...

योग्य सिस्टीम परफॉर्मन्स निवडा -

मित्रांनो आता आम्ही जी टिप्स तुम्हाला सांगणार आहोत, त्याने तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपचा स्पीड अगदी दुप्पट होणार आहे. त्याचा तुम्हाला देखील प्रत्यय येईल.
त्यासाठी काही स्टेप्स फॉलो करा.
 1. सर्वप्रथम आपण आपल्या Control Panel वर जा.
 2. पुढे System या पर्यायावर क्लिक करा.
 3. आता Advanced System Settings या पर्यायावर क्लिक करा.
 4. आता समोर दिसणाऱ्या Settings या पर्यायावर क्लिक करा.
 5. आता Adjust for best performance या पर्यायावर क्लिक करा.
मित्रांनो, या पर्यायावर क्लिक केल्यावर आपल्याला दिसून येईल कि आपल्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपचा स्पीड हा जवळजवळ दुप्पट वाढलेला आहे. जर आपल्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपचा स्पीड वाढला नाही तर एकदा आपण आपला कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप एकदा Restart करावा.

टेम्प फाईल डिलीट करा -

जेंव्हा जेंव्हा आपण आपल्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर काम करत असतो, त्यावेळी अनेक टेम्प फाईल्स आपोआप तयार होत असतात. त्यांचा आपल्याला शक्यतो काहीही उपयोग नसतो, मात्र त्या आपल्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर अधिक लोड आणतात. त्यामुळे आपण वेळोवेळी या टेम्प फाईल्स डिलीट करत चला.
त्यासाठी स्टेप्स खालीलप्रमाणे -

How to Increase Computer Speed in Marathi

 1. सर्वप्रथम कीबोर्डवर आपण एकाच वेळेस window + r हे बटन दाबा.
 2. आता आपल्यासमोर एक सर्च बार उघडेल. त्यामध्ये आपण एकदा %temp% आणि एकदा फक्त temp असे टाईप करून एन्टर हे बटन दाबा. आता आपल्यापुढे अनेक फाईल्स दिसतील. या सर्व फाईल्स ctrl + a बटन दाबून सिलेक्ट करा आणि सर्व फाईल्स डिलीट करून टाका.
 3. आता ह्या फाईल्स आपल्या Recycle Bin मध्ये गेल्या असतील, तेथूनही ह्या फाईल्स डिलीट करून टाका.
किमान आठवड्यातून एकदा ह्या फाईल्स डिलीट करत चला. त्याने अनावश्यक फाईल्स तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर राहणार नाही आणि नाहकच कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर लोड येणार नाहीत.

तर मित्रांनो, आपण या स्टेप्स जर व्यवस्थित फॉलो केल्या तर आपल्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपचा स्पीड निश्चितच वाढेल. जर आपल्याला काही अडचण आली किंवा आपल्या काही समस्या असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवा. आम्ही त्याचे नक्की उत्तर देऊ.

1 Comments

 1. अतिशय उत्कृष्ट माहिती. मला या माहितीचा खूप उपयोग झाला आहे.

  ReplyDelete

Post a comment

Previous Post Next Post