मोबाईलच्या बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे? काही टिप्स – Mobile Battery Tips in Marathi

Share :

Mobile Battery Tips in Marathi – In this article we will look at how to maintain long battery life. This will help you in maintaining your mobile battery.

Mobile Battery Tips in Marathiसध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाच्या खिशात एक वस्तू हमखास बघायला मिळते, ती म्हणजे मोबाईल फोन. कारण सध्याचे युग तंत्रज्ञानाचे युग असले तरी ते विशेष करून मोबाईलचे युग मानता येईल. मात्र अशा या मोबाईल फोनची सर्वात मोठी समस्या असते बॅटरीशी संबंधित.

Mobile Battery Tips in Marathi

Mobile Battery Tips in Marathi

जेव्हा आपण नवीन मोबाईल फोन विकत घेतो तेव्हा त्याची बॅटरी अगदी व्यवस्थित चालत असते, मात्र जसजसा मोबाईल जुना होत जातो तसे त्याच्या बॅटरीला समस्या येत जातात. मग त्यात…

  • मोबाईलची बॅटरी लवकर उतरणे.


  • बॅटरीचे आयुष्य खूपच थोडे असणे.


  • बॅटरी लवकर चार्जिंग न होणे.  • कोणतेही अँप्लिकेशन सुरु नसताना बॅटरी लवकर उतरणे.
आज आपण याठिकाणी काही महत्वपूर्ण टिप्स (Mobile Battery Tips) जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, कि ज्याच्या मदतीने आपण मोबाईलच्या बॅटरीचे आयुष्य वाढवू शकतो…

1. बॅटरी चार्ज करण्यासाठी काही नियम बनवावे

आपल्या मोबाईलची बॅटरी हि कधीही 100 % पूर्ण होऊ देऊ नका. त्यामुळे आपल्या मोबाईलच्या बॅटरीचे आयुष्य कमी होते. त्यामुळे आपल्या मोबाईलची बॅटरी 90 ते 95 % पर्यंतच सीमित ठेवा.

2. थोडासा अंधुक डिस्प्ले ठेवा

आपण सर्वजण मोबाइलचा ब्राइटनेस अतिशय जास्त करून ठेवतो. परंतु जितका जास्त ब्राइटनेस असेल तितकीच जास्त बॅटरी वेगाने संपेल. त्यामुळे शक्यतो आपल्या मोबाईलचा ब्राइटनेस कमी करून ठेवा किंवा तो रीडिंग मोडवर ठेवा.

मोबाईलचा डिस्प्ले रीडिंग मोडवर ठेवण्याचे दोन फायदे आहेत –

  • तुमच्या मोबाईलची बॅटरी जास्त वेळ टिकेल.
  • मोबाईलमधून निघणाऱ्या अतिघातक किरणांपासून आपले व आपल्या डोळ्यांचे संरक्षण होईल.

3. अति जास्त बॅटरी खाणारे अ‍ॅप शक्यतो डिलीट करा

आपल्या मोबाईलमध्ये अनेक अ‍ॅप आपण घेत असतो व डिलीट करत असतो. परंतु कधी कधी काही अ‍ॅप हे आपल्या नकळत डिलीट करावयाचे राहून जातात. परंतु अनेक अ‍ॅप आपण वापरत नसतानाही बॅकग्राऊंडला काम करत असतात. त्यामुळे आपल्या फोनची बॅटरी कमी कमी होत असते.

आपण हाच विचार करत असतो कि, मी तर अजिबात मोबाईल वापरला नाही तरी माझ्या मोबाईलची बॅटरी कशी कमी झाली? तर त्याचे हे उत्तर असू शकते.

त्यामुळे जास्त बॅटरी खाणारे अ‍ॅप ताबडतोब डिलीट करून टाका. सेटिंग्जमध्ये Battery या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला विविध अ‍ॅप किती बॅटरी वापरत आहेत हे समजेल, त्यानुसार तुम्ही जास्त बॅटरी खाणारे अ‍ॅप डिलीट करू शकता.

4. दुसऱ्या मोबाईलच्या चार्जरचा वापर करावा कि करू नये

आपल्याकडे नेहमी असे म्हटले जाते कि एका मोबाईलचे चार्जर दुसऱ्या मोबाईलला कनेक्ट केले कि त्या मोबाईलच्या बॅटरीला समस्या येतात. परंतु हा गैरसमज आहे.

फक्त दुसरा चार्जर वापरताना आपल्याला एक काळजी घ्यावयाची आहे. आपल्याला त्या चार्जरेचे आउटपुट व्होल्टेज किती आहे ते शोधावे लागेल. कारण आपल्या फोनचे Circuit तेवढेच व्होल्टेज घेईल, जेवढी त्याची क्षमता आहे. या क्षमतेपेक्षा अधिक व्होल्टेज असेल तर आपल्या मोबाईलच्या बॅटरीचे आयुष्य कमी होऊ शकते.

खाली काही महत्वपूर्ण टिप्स देत आहे, त्याचे अवलोकन करा – 

हे करा
✔️ आपल्या मोबाईलला 90 ते 95 टक्क्यापर्यंत चार्ज करा.

✔️ जास्त बॅटरी खाणारे ऍप शक्यतो डिलीट करा. 

✔️ शक्यतो आपल्या चार्जरच्या आउटपुट व्होल्टेजशी जुळणाऱ्या चार्जरनेच आपल्या मोबाईलला चार्ज करा.

हे करू नका
❌ आपल्या मोबाईलला संपूर्ण 100 टक्क्यापर्यंत कधीही चार्ज करू नका.

जास्त बॅटरी खाणारे ऍप शक्यतो इन्स्टॉल करू नका.

कोणतेही चार्जर वापरण्याअगोदर त्याचा आउटपुट व्होल्टेज तपासा.

तर मित्रांनो आपण वाचत होतात मोबाईलच्या बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे याच्या काही टिप्स (Mobile Battery Tips). वरील उपायांचा अवलंब करून आपल्या मोबाईलची बॅटरी खराब होण्यापासून वाचवू शकता.


मोबाईलशी संबंधित असेच दर्जेदार लेख वाचण्यासाठी वेळोवेळी आमच्या Net Marathi या वेबसाईटला भेट द्या व आपल्याला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा.

Share :

Leave a Comment