Tips for Weight Loss in Marathi - आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्ती स्पर्धेत टिकण्यासाठी जीव तोडून मेहनत करताना दिसतो. कारण सध्या "थांबला तो संपला" या उक्तीप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचे जीवन झाले आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या शरीराकडे लक्ष देते असे नाही.

Tips for Weight Loss in Marathi

Tips for Weight Loss in Marathi

आपल्या या आळशीपणाचा फटका मग आपल्या शरीराला बसण्यास सुरुवात होते. त्यात खालील बाबींचा समावेश होतो -
  • वजन वाढणे.
  • थोडेसे चालले तरी दम लागणे.
  • कधी कधी अचानक अस्वस्थ वाटणे.
  • आयुष्यातून काही तरी हरवल्यासारखे वाटणे.

वजन कमी करण्यासाठी आपण प्रत्येक वेळी एक नवीन योजना [Plan] आखतो, मात्र प्रत्येक वेळी त्याला आपण पुढे ढकलत राहतो. याचा व्हायचा तोच परिणाम आपल्या शरीरावर होतो.

आपले वजन इतक्या शांततेत वाढत असते कि, आपल्याला त्याची पुसटशीदेखील कल्पना येत नाही. मात्र ज्यावेळी हि बाब आपल्या लक्षात येते, त्यावेळी एकतर खूप उशीर झालेला असतो किंवा आपल्यासाठी ती अतिशय अवघड गोष्ट होऊन बसते.

आजच्या या लेखात आपण वजन कमी करण्याच्या [Tips for Weight Loss in Marathi] अशा टिप्स अभ्यासणार आहोत कि ज्यासाठी आपल्याला काहीही वेगळे शिवधनुष्य पेलण्याची गरज नाही. फक्त आपल्या दैनंदिन सवयी थोड्याशा जरी बदलल्या तरी त्याचा आपल्याला दीर्घकालीन फायदा नक्कीच होणार आहे. 

या टिप्सचा आपल्या शरीरावर काहीही नकारत्मक बदल होणार नाही, हे देखील याठिकाणी लक्षात घ्या.

चला तर मग सुरु करूया.

1. भरपूर पाणी प्या -

आता याठिकाणी आम्ही सांगितले आहे, कि भरपूर पाणी प्या, म्हणजे फक्त पाणीच पीत राहा असे नाही. तर पाणी पिण्याची आपल्या शरीराला एक सवय लावा. म्हणजे प्रत्येक एक तासाला किंवा अर्ध्या तासाला थोडे थोडे पाणी पीत राहा.

Tips for Weight Loss in Marathi

पाणी पिताना ते गटागट न पिता खाली बसून शांततेत एक एक घोट प्या. याने आपले पोट नेहमी भरलेले राहील आणि आपल्या मेंदूला एक प्रकारची सूचना मिळेल कि आता तरी आपल्याला सध्या काही खाण्याची गरज नाही. त्यामुळे आपसूकच तुमचे जेवणावरील लक्ष कमी होईल.

लक्षात ठेवा - पाणी पिताना ते हळूवारपणे प्या.

2. घाईघाईने जेवण करणे टाळा

सध्याच्या धकाधकीच्या व धावपळीच्या युगात आपण वावरत आहोत. मात्र वजन वाढण्याचे सर्वात महत्वाचे कारण जे असेल ते म्हणजे अतिशय वेगात अधाशासारखे जेवण करणे.

हे देखील वाचा - 

आपल्या पूर्वजांनी आपल्याला सर्वाना हे सांगितलेच असेल कि प्रत्येक घास हा किमान 30 ते 32 वेळा चावून खावा. मात्र सध्या या सूचनेचे पालन किती लोक करतात हा संशोधनाचाच विषय ठरेल. कारण आपण जितके शांततेत जेवण करू तितके ते पचण्यासाठी मदत होईल. 

त्यामुळे शरीरात अन्न चरबीच्या स्वरुपात साठवून राहण्याऐवजी ते लवकर पचेल. अतिशय शांतपणे घाई न करता जेवण करणे हे वजन कमी करण्यासाठी महत्वाचा पर्याय आहे.

लक्षात ठेवा - घाईघाईने जेवण करू नका.

3. चटकदार, चमचमीत, तेलकट पदार्थ टाळा

आजच्या घडीला सर्वानांच चटकदार पदार्थ खाण्याची जरा जास्तच चटक असते.

🌅 सायंकाळी रम्य वातावरणात, मंद प्रकाशात, वाऱ्याच्या मंद झुळूकेबरोबर जर एखादा चटकदार पदार्थ असेल तर तो कुणाला आवडणार नाही?

परंतु आपल्याला हे जे चटकदार, चमचमीत पदार्थ खाण्याचे दुष्परिणाम हमखास भोगावेच लागतात. कारण ह्या पदार्थांची सवय जर लागली तर मात्र हे पदार्थ आपल्याला मिळाले नाही तर आपण अस्वस्थ होतो, आपली चिडचिड होते. त्यामुळे आपले वजन वाढवण्यात मोलाचा जर वाट असेल तर तो या चमचमीत पदार्थांचा.
Tips for Weight Loss in Marathi

आपल्याला हे चमचमीत पदार्थ खाणे थेट बंद करायचे नाहीये मात्र त्याचे प्रमाण अतिशय अल्प ठेवणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. त्यामुळे चमचमीत पदार्शांचे सेवन कमी करणे आपल्या वाढलेल्या वजनास आटोक्यात ठेवण्यास मदत करते.

लक्षात ठेवा - तळलेले, चमचमीत पदार्थ खाणे टाळा.

4. पुरेशी  झोप घ्या -

आपल्या सर्वांना हे माहिती असेल कि आपल्या शरीरास किमान 7 ते 8 तास शांत झोप आवश्यक असते. मात्र सध्या मोबाईलमुळे आपण रात्रभर जागरण करतो. त्यामुळे आपल्या शरीरास पाहिजे तितक्या प्रमाणात आराम मिळत नाही. त्यामुळे एक नकारत्मक परिणाम आपल्या शरीरावर होण्यास सुरुवात होते.
त्याचा परिमाण आपल्या वजनवाढीवर होतो. 

जर आपल्याला आपले शरीर व आपले स्वास्थ एकदम व्यवस्थित ठेवायचे असेल तर पुरेशी झोप हि आवश्यकच आहे.

लक्षात ठेवा - किमान 7 ते 8 तास शांत झोप घ्या.

5. अति जास्त ताणतणाव टाळा

सध्या आपल्या सर्वांनाच स्पर्धेच्या युगात टिकवून राहावयाचे असल्याने आपण खूपच जीवाचा आटापिटा करत असतो. प्रत्येक ठिकाणी आपणास ताणतणावास सामोरे जावे लागते.

Tips for Weight Loss in Marathi

बरं हा ताणतणाव ठराविक कालावधीचा न राहता आता नेहमीच आपल्या सोबत असतो. त्याचा अतिशय वाईट परिमाण आपल्या शरीरावर होत असतो. त्यामुळे ताणतणावरहीत जीवन जगण्याचा संकल्प आपणास करावा लागेल. तरच आपले वजन कमी होण्यास मदत होईल.

लक्षात ठेवा - अति ताणतणाव टाळा.

निष्कर्ष -

तर मित्रानो आपले वाढलेले वजन कमी करण्याच्या संदर्भात [Tips for Weight Loss in Marathi] ह्या काही टिप्स होत्या ज्या आम्ही तुमच्या बरोबर शेअर केल्या. या टिप्स अशा आहेत कि याचा शरीरावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. कारण सध्या वजन कमी करण्यासाठी बाजारात भरपूर गोळ्या, पावडर उपलब्ध आहेत, मात्र त्या आपल्या शरीरावर काहीही वाईट परिणाम करणार नाहीत अशी हमी कोणीही देऊ शकत नाही.

आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या टिप्स ह्या काही अतिशय अवघड नाही कारण त्यासाठी आपल्याला फक्त आपल्या थोड्याशा सवयी बदलाव्या लागतील, परंतु आपले वाढलेले वजन कमी करण्यासाठी या गोष्टी आवश्यकच आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post