Weight Loss Tips in Marathi – या लेखात आपण नैसर्गिकपणे वजन कमी करण्याच्या काही महत्वाच्या टिप्स जाणून घेणार आहोत. हा लेख नक्की वाचा…
Weight Loss Tips in Marathi
सध्याच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या युगात वाढते वजन हि सर्वांचीच एक मोठी समस्या बनत आहे. या लेखात आपण नैसर्गिकपणे वजन कमी करण्याच्या काही महत्वाच्या टिप्स जाणून घेणार आहोत.
![]() |
Weight Loss Tips in Marathi |
वजन वाढण्याचे खूप मोठे दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसून येत असतात. त्यात खालील काही लक्षणे दिसून येतात…
अवास्तव वाढणाऱ्या वजनाचे दुष्परिणाम
- थोडेसे चालले तरी दम लागणे.
- कधी कधी अचानक अस्वस्थ वाटणे.
- आयुष्यातून काही तरी हरवल्यासारखे वाटणे.
- आपल्या कौटुंबिक जीवनात देखील याचा नकारात्मक परिणाम जाणवणे.
म्हणजेच काय तर अतिरिक्त वजन वाढण्याचे फायदे कमी आणि तोटेच जास्त आहेत. वजन कमी करण्यासाठी आपण प्रत्येक वेळी एक नवीन योजना [Plan] आखतो, मात्र प्रत्येक वेळी त्याला आपण पुढे ढकलत राहतो. याचा व्हायचा तोच परिणाम आपल्या शरीरावर होतो.
आपले वजन इतक्या शांततेत वाढत असते कि, आपल्याला त्याची पुसटशीदेखील कल्पना येत नाही. मात्र ज्यावेळी हि बाब आपल्या लक्षात येते, त्यावेळी एकतर खूप उशीर झालेला असतो किंवा आपल्यासाठी ती अतिशय अवघड गोष्ट होऊन बसते.
Table of Contents
आजच्या या लेखात आपण वजन कमी करण्याच्या (Weight Loss Tips in Marathi) अशा टिप्स अभ्यासणार आहोत कि ज्यासाठी आपल्याला काहीही वेगळे शिवधनुष्य पेलण्याची गरज नाही. फक्त आपल्या दैनंदिन सवयी थोड्याशा जरी बदलल्या तरी त्याचा आपल्याला दीर्घकालीन फायदा नक्कीच होणार आहे.
भरपूर पाणी प्या
आता याठिकाणी आम्ही सांगितले आहे, कि भरपूर पाणी प्या, म्हणजे फक्त पाणीच पीत राहा असे नाही. तर पाणी पिण्याची आपल्या शरीराला एक सवय लावा. म्हणजे प्रत्येक एक तासाला किंवा अर्ध्या तासाला थोडे थोडे पाणी पीत राहा.
पाणी पिताना ते गटागट न पिता खाली बसून शांततेत एक एक घोट प्या. याने आपले पोट नेहमी भरलेले राहील आणि आपल्या मेंदूला एक प्रकारची सूचना मिळेल कि आता तरी आपल्याला सध्या काही खाण्याची गरज नाही. त्यामुळे आपसूकच तुमचे जेवणावरील लक्ष कमी होईल आणि त्यामुळे आपले वजन कमी होण्यास त्याची मदत होईल.
घाईघाईने जेवण करणे टाळा
सध्याच्या धकाधकीच्या व धावपळीच्या युगात आपण वावरत आहोत. मात्र वजन वाढण्याचे सर्वात महत्वाचे कारण जे असेल ते म्हणजे अतिशय वेगात अधाशासारखे जेवण करणे.
आपल्या पूर्वजांनी आपल्याला सर्वाना हे सांगितलेच असेल कि प्रत्येक घास हा किमान 30 ते 32 वेळा चावून खावा. मात्र सध्या या सूचनेचे पालन किती लोक करतात हा संशोधनाचाच विषय ठरेल. आपण जितके शांततेत जेवण करू तितके ते पचण्यासाठी मदत होईल.
त्यामुळे शरीरात अन्न चरबीच्या स्वरुपात साठवून राहण्याऐवजी ते लवकर पचेल. अतिशय शांतपणे घाई न करता जेवण करणे हे वजन कमी करण्यासाठी महत्वाचा उपाय मानता येईल.
चटकदार, चमचमीत, तेलकट पदार्थ टाळा
आजच्या घडीला सर्वांनाच चटकदार पदार्थ खाण्याची जरा जास्तच चटक असते.
परंतु आपल्याला हे चटकदार, चमचमीत पदार्थ खाण्याचे दुष्परिणाम हमखास भोगावेच लागतात. कारण ह्या पदार्थांची सवय लागली तर मात्र हे पदार्थ आपल्याला मिळाले नाही तर आपण अस्वस्थ होतो, आपली चिडचिड होते. त्यामुळे आपले वजन वाढवण्यात मोलाचा जर वाटा कशाचा असेल तर तो या चमचमीत पदार्थांचा. त्यामुळे चटकदार, चमचमीत पदार्थांचे कमीत कमी प्रमाणात सेवन करून आपण आपल्या वाढत्या वजनाला आळा घालू शकतो.
आपल्याला हे चमचमीत पदार्थ खाणे थेट बंद करायचे नाहीये मात्र त्याचे प्रमाण अतिशय अल्प ठेवणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. त्यामुळे चमचमीत पदार्शांचे सेवन कमी करणे आपल्या वाढलेल्या वजनास आटोक्यात ठेवण्यास मदत करते.
पुरेशी झोप घ्या
आपल्या सर्वांना हे माहिती असेल कि आपल्या शरीरास किमान 7 ते 8 तास शांत झोप आवश्यक असते. मात्र सध्या मोबाईलमुळे आपण रात्रभर जागरण करतो. त्यामुळे आपल्या शरीरास पाहिजे तितक्या प्रमाणात आराम मिळत नाही. त्यामुळे एक नकारात्मक परिणाम आपल्या शरीरावर होण्यास सुरुवात होते. त्याचा परिमाण आपल्या शरीरावर होतो.
जर आपल्याला आपले शरीर व आपले स्वास्थ एकदम व्यवस्थित ठेवायचे असेल तर पुरेशी झोप हि आवश्यकच आहे.
अति जास्त ताणतणाव टाळा
सध्या आपल्या सर्वांनाच स्पर्धेच्या युगात टिकवून राहावयाचे असल्याने आपण खूपच जीवाचा आटापिटा करत असतो. प्रत्येक ठिकाणी आपणास ताणतणावास सामोरे जावे लागते.
बरं हा ताणतणाव ठराविक कालावधीचा न राहता आता नेहमीच आपल्या सोबत असतो. त्याचा अतिशय वाईट परिमाण आपल्या शरीरावर होत असतो. त्यामुळे ताणतणावरहीत जीवन जगण्याचा संकल्प आपणास करावा लागेल. तरच आपले वजन कमी होण्यास मदत होईल.
तर मित्रांनो आपले वाढलेले वजन कमी करण्याच्या संदर्भात [Weight Loss Tips in Marathi] ह्या काही टिप्स होत्या ज्या आम्ही तुमच्या बरोबर शेअर केल्या.
आरोग्याशी संबंधित असेच दर्जेदार लेख वाचण्यासाठी वेळोवेळी आमच्या NetMarathi या वेबसाईटला भेट द्या आणि हा लेख आपल्याला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रीणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा.