What is Blogger in Marathi - In this article, we will learn about Blogger. If you are planning to start a blog, you have come to the right place...
What is Blogger in Marathi - आजच्या या लेखात आपण ब्लॉगर म्हणजे काय? याची माहिती घेणार आहोत. जर मित्रांनो, आपण ब्लॉगर संबंधी माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहात तर आपण अगदी योग्य ठिकाणी आला आहात. चला तर सुरु करूया.
बहुतेक व्यक्ती या कशात ना कशात अतिशय तरबेज असतात. म्हणजेच कोणी चित्रकलेत, कोणी लिखाणात, कोणी स्वयंपाक बनवण्यात तर कोणी टेक्नॉलॉजीमध्ये अतिशय हुशार असतात. मात्र अशा व्यक्तींना एखादा प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे हे ज्ञान फक्त त्यांच्यापर्यंतच सीमित राहते. मात्र आता ब्लॉगरमुळे हि समस्या दूर होण्यास मदत झाली आहे.
ब्लॉगर अशा व्यक्तींना त्यांचे ज्ञान इतर व्यक्तीपर्यंत पोहचवण्यात अतिशय महत्वाची भूमिका निभावते.

ब्लॉगर हे गुगलचे एक प्रॉडक्ट आहे कि जे विविध व्यक्तींना आपले विचार व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून उपलब्ध करून दिले आहे. गुगलद्वारा प्रदान केलेली हि सेवा अगदी मोफत आहे. जर आपल्याला कोडींगची थोडीफार माहिती असेल तर आपण अगदी सहजपणे ब्लॉगरवर हवी तशी वेबसाईट किंवा ब्लॉग बनवून आपले ज्ञान दुसऱ्या व्यक्तींपर्यंत पोहचवू शकता.
Blogger चा इतिहास
ब्लॉगर ची सुरुवात 23 ऑगस्ट 1999 रोजी करण्यात आली. ब्लॉगर हे अगदी मोफत व्यासपीठ आहे आपले विचार व्यक्त करण्याचे. त्यामुळे जर आपल्याला एखादा ब्लॉग बनवण्याची इच्छा असेल तर ब्लॉगर हा आपल्यापुढील सर्वात सोपा व कमी खर्चिक पर्याय आहे.
जर आपण ब्लॉग तयार करण्याचा विचार करत असाल तर काही महत्वपूर्ण बाबी लक्षात घ्या.
- सर्वप्रथम आपली जमेची बाजू ओळखा. म्हणजेच आपल्याला कोणत्या क्षेत्राचे जास्त ज्ञान आहे, आपण कोणत्या विषयाशी संबंधित लेख अतिशय चांगले लिहू शकतो हे ओळखा व त्याच क्षेत्राशी संबंधित ब्लॉग तयार करण्याचा प्रयत्न करा.
- आपण सुरु करीत असलेल्या ब्लॉगसाठी एखादे चांगले डोमेन निवडा. ब्लॉगर आपल्यासाठी निशुल्क डोमेन उपलब्ध करून देते.
- आपल्या ब्लॉगला व्यवस्थित डिझाईन करून घ्या.
- आता आपण आपले ज्ञान पोस्टच्या माध्यमातून विविध वाचक वर्गापर्यंत पोहचवू शकता.
जर तुमच्याकडे टेक्नॉलॉजि, रेसिपी, कला, क्रीडा किंवा इतर गोष्टीचे ज्ञान असेल कि ज्याची समाजातील व्यक्तींना खूपच गरज आहे, तर आपण त्या टॉपिक्सवर आपला छानसा ब्लॉग तयार करू शकता. त्यासाठी आपण ब्लॉगर या प्लॅटफॉर्मची निवड करू शकता. कारण ब्लॉगर हे गूगलचे मोफत प्रॉडक्ट आहे.
ब्लॉगरची वैशिष्ट्ये (Features of Blogger)
✔️ ब्लॉगर हे गुगलचे मोफत व्यासपीठ आहे. त्यामुळे आपल्याला याच्यासाठी कोणतेही शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
✔️ सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाहिले तर ब्लॉगर हे अतिशय सुरक्षित, मजबूत व्यासपीठ आहे. त्यामुळे आपला ब्लॉग हॅक होण्याची शक्यता अगदीच नाममात्र आहे.
✔️ ब्लॉगर हे वापरण्यासाठीदेखील अतिशय सोपे आहे. एकदा तुम्ही याच्या काही बाजू समजून घेतल्या तर तुम्हाला कोणत्याची गोष्टीची अडचण येणार नाही.

तर मित्रांनो, आपण वाचत होतात ब्लॉगर म्हणजे काय आणि ब्लॉगरची वैशिष्ट्ये Blogger in Marathi. आम्हाला आशा आहे कि वरील माहिती आपल्याला फायदेशीर ठरेल.
ब्लॉगरशी संबंधित असेच दर्जेदार लेख वाचण्यासाठी वेळोवेळी आमच्या Net Marathi या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्या व आपल्या मित्रांना हा लेख शेअर करा.
Blogger FAQ's -
✅ ब्लॉगर हे काय आहे?
ब्लॉगर हे गुगलचे एक प्रॉडक्ट आहे कि जे विविध व्यक्तींना आपले विचार व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून उपलब्ध करून दिले आहे.
✅ ब्लॉगरच्या मदतीने आपण काय करू शकतो?
ब्लॉगर हे आपल्याला आपले विचार मनमोकळेपणाने मांडण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देते. म्हणजेच जर आपल्याला कोणत्याही बाबीत लिखाण करावयाचे असेल तर आपण येथे येऊन लिखाण करू शकता. यासाठी ब्लॉगर आपल्याला आपली स्वतःची लिंक उपलब्ध करून देईल.
✅ ब्लॉगरची सुरुवात कधी झाली?
ब्लॉगर ची सुरुवात 23 ऑगस्ट 1999 रोजी करण्यात आली
✅ ब्लॉगरद्वारे आपण पैसे कमवू शकतो का?
हो, आपण गुगलच्या जाहिराती आपल्या ब्लॉगवर दाखवून त्याद्वारे पैसे कमवू शकतो. तसेच आपले एखादे प्रोडक्टदेखील आपण यावर दाखवून ते विकू शकतो व त्याद्वारे चांगले पैसे कमवू शकतो.
✅ ब्लॉगरची नोंदणी निशुल्क आहे का?
हो, ब्लॉगर हे पूर्णतः निशुल्क आहे. त्यासाठी आपल्याला कोणतेही शुल्क देण्याची गरज नाही. यासाठी फक्त आपल्याकडे आपला एक वैयक्तिक ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.