
What is Facebook in Marathi
ज्यावेळी फेसबुकची सुरुवात झाली तेव्हापासूनच फेसबुक खूपच लोकप्रिय ठरलेले आहे. आज फेसबुकचे करोडो वापरकर्ता [Users] आहेत. चला तर मग जास्त वेळ न करता जाणून घेऊया फेसबुक काय आहे ते…
फेसबुक काय आहे?
फेसबुकचे फायदे
✔️ फेसबुकच्या सहाय्याने आपण कितीही फोटोज आपल्या मित्रांना शेअर करू शकतो, किंवा आपल्या मित्रांचे फोटोज आपण सहजरीत्या बघू शकतो.
✔️ फेसबुक ग्रुप्सच्या माध्यमातून आपण आपल्या आवडीच्या विषयाची माहिती बघू किंवा वाचू शकतो.
✔️ फेसबुक पेजच्या माध्यमातून आपण आपल्या आवडीच्या सेलेब्रिटी, ब्रँड यांच्या संपर्कात राहू शकतो.
फेसबुकचा इतिहास
सुरुवातीला या वेबसाईटची मेंबरशिप फक्त याच विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी होती. मात्र हि वेबसाईट इतकी लोकप्रिय झाली कि इतर विद्यापीठातील विद्यार्थीही यामध्ये समाविष्ट केले गेले. त्यानंतर या वेबसाईटची मेंबरशिप सर्वांसाठी खुली करण्यात आली.
फेसबुकचा वापर कसा करावा?
- फेसबुकचा वापर करण्याअगोदर आपल्याला त्यावर नोंदणी करावी लागेल. फेसबुकवर नोंदणी करताना कोणतेही शुल्क आकारले जात नाही. ते निशुल्क आहे.
- नोंदणी केल्यावर आपल्याला आपल्या मित्रांना शोधावे लागेल. त्यासाठी आपल्याला “Search” या ऑप्शनवर क्लिक करून तेथे आपल्या मित्रांचे नाव टाकून शोधावे लागेल.
- मित्रांचा शोध घेतल्यावर आपल्याला त्यांना “Friend Request” पाठवावी लागेल. तुमच्या मित्रांनी ती Request स्वीकारल्यावर आपण त्यांचे फोटोज, अपडेट बघू शकता.
- आपल्याला नवीन फोटोज अपलोड करायचे असतील किंवा नवीन पोस्ट लिहावयाची असेल तर “Create Post” या ऑप्शनवर क्लिक करा.
- आपल्याला एखाद्या ग्रुपला जॉईन व्हावयाचे असेल तर आपण “Join Group” या पर्यायावर क्लिक करा.
- आपल्याला एखाद्या सेलेब्रिटीचे किंवा ब्रँडचे फेसबुक पेज जर आवडले तर त्यालाही तुम्ही “Like” करू शकता.
सोशल मिडीयाच्या टिप्स आणि ट्रिक्ससाठी वेळोवेळी आमच्या Net Marathi या वेबसाईटला भेट द्या व आपल्या मित्रांनाही सांगा.
फेसबुक हि एक खूप मोठी सोशल नेटवर्किंग वेबसाईट आहे.
✅ फेसबुकच्या मदतीने आपण काय काय करू शकतो?
✔️ फेसबुकच्या मदतीने आपण आपल्या कोणत्याही मित्राशी संपर्क साधू शकतो.
✔️ आपल्या आवडीचे व्हिडिओदेखील आपण फेसबुकच्या मदतीने पाहू शकतो.
✔️ मित्रांचे वैयक्तिक फोटोदेखील आपण फेसबुकच्या मदतीने पाहू शकतो, जर त्या मित्राने तशी परवानगी दिलेली असेल तर.
✔️ फेसबुकच्या मदतीने आपण आपल्या व्यवसायाचे एक पेज तयार करून व्यवसायदेखील वाढवू शकतो.
✅ फेसबुकची स्थापना कधी झाली?
सन 2004 मध्ये फेसबुकची स्थापना झाली.
✅ फेसबुकची स्थापना कोणी केली?
Mark Zuckerberg, Dustin Moskovitz आणि Chris Hughes या Harvard विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी फेसबुकची स्थापना केली होती.
✅ फेसबुकची नोंदणी निशुल्क आहे का?
हो, जर आपल्याला फेसबुकवर नोंदणी (Registration) करावयाचे असेल तर ते अगदी निशुल्क आहे. त्यासाठी आपल्याकडे फक्त एक मोबाईल क्रमांक किंवा एक ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.