SEO काय आहे आणि त्याचे महत्व – What is SEO in Marathi

Share :

What is SEO in Marathi – In this Article, We will Learn What is SEO in Marathi. If You Also Want to Know What is SEO in Marathi, Read this Article Carefully.


What is SEO in Marathi – जर आपल्याला वेबसाईटविषयी थोडेसे ज्ञान असेल तर आपल्याला SEO हा शब्द नवीन नसेल. आपणास याविषयी थोडीशी माहिती असेलच. कारण जे लोक वेबसाईट चालवतात किंवा त्या क्षेत्राशी संबधित आहेत, त्यांना SEO चे महत्व सांगण्याची आवश्यकता नाही. ते त्याचे महत्व जाणून आहेत.
या लेखात आपण SEO म्हणजे काय आणि त्याचे काय महत्व आहे? याची माहिती अगदी सोप्या भाषेत समजावून घेणार आहोत.

What is SEO in Marathi

What is SEO in Marathi

आपल्याला देखील नेहमी हा प्रश्न सतावत असेल कि नेमके हे SEO म्हणजे काय आहे? जर आपल्याला या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर आपण अगदी योग्य ठिकाणी आला आहात.

SEO म्हणजे काय?

सर्वात सोप्या भाषेत सांगायचे झाले तर SEO चा फुल फॉर्म आहे Search Engine Optimization.

जेंव्हा आपण गुगल, बिंग, याहू किंवा इतर सर्च इंजिनवर काहीही टाईप करून सर्च करतो तेंव्हा ज्या वेबसाईट पहिल्या पेजवर दिसतात त्यांचा SEO हा अतिशय चांगला असतो. त्यामुळे सर्च इंजिन त्यांना पहिल्या पेजवर प्राधान्य देते.

कोणत्याही वेबसाईटची रँकिंग वाढवण्यासाठी SEO खूप मोलाची भूमिका बजावत असतो.

कोणीही वेबसाईट का बनवतो तर ती वेबसाईट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचली पाहिजे. SEO आपली वेबसाईट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्यास मदत करते.
याठिकाणी एक लक्षात घ्या कि वेबसाईट बनवणे आणि त्याचा SEO करणे ह्या अगदी भिन्न बाबी आहेत.

SEO चे महत्व

  • सध्या अधिकाधिक लोक गुगलवर काहीही सर्च केल्यावर पहिल्या तीन रिझल्टवर क्लिक करण्यासाठी प्राधान्य देतात. त्यामुळे आपल्या वेबसाईटचा चांगला SEO करून ती पहिल्या तीन रिझल्टमध्ये आणण्यासाठी SEO खूपच महत्वाची भूमिका अदा करतो.
  • SEO करून आपण अगदी मोफतपणे गुगलच्या पहिल्या पेजवर येऊ शकतो.Google Ads चा वापर करून आपण कोणत्याही वेबसाईट किंवा ब्लॉगचा शून्य SEO करून पहिल्या पेजवर आपले वेबपेज दाखवू शकतो, परंतु त्यासाठी खूपच खर्च येतो. ज्यांनी नवीनच वेबसाईट किंवा ब्लॉग सुरु केला  आहे, अशा नवीन लोकांसाठी हा खर्च परवडणारा नसतो.
  • सध्या जवळजवळ 90 % पेक्षा जास्त लोक काहीही सर्च करण्यासाठी गुगलचा वापर करतात. त्यामुळे SEO हे अतिशय महत्वाचे आहे.
  • चांगल्या SEO ने आपण वेबसाईटद्वारे हजारो रुपये कमवू शकतो.
  • आपण कितीही चांगली वेबसाईट बनवली आणि कितीही दर्जेदार सामुग्री त्यामध्ये उपलब्ध करून दिली तरी ती वाचकांपर्यंत पोहचली नाही तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. SEO आपली वेबसाईट, आपली सामुग्री वाचकांपर्यंत पोहचवण्यास मदत करते.

तर मित्रांनो, आपण वाचत होतात SEO म्हणजे काय (What is SEO in Marathi). जर आपण वेबसाईट बनवण्याचा विचार करत असाल किंवा वेबसाईट बनवली असेल तर SEO हा विषय आपल्यासाठी खूपच महत्वाचा आहे. त्याच्या सहाय्याने आपण आपली वेबसाईट इतर वाचकांपर्यंत अगदी सहजरीत्या पोहचवू शकता.

वेबसाईट आणि वेबसाईटचा SEO यासंबंधित अधिक माहिती वाचण्यासाठी वेळोवेळी आमच्या Net Marathi या वेबसाईटला भेट द्या आणि जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा.

Share :

Leave a Comment