What is Youtube in Marathi - आजच्या या लेखात आपण जगातील सर्वात लोकप्रिय व्हिडीओ शेअरिंग अँप असलेल्या युट्युब बद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्याच्या परिस्थितीत ज्या कुणाकडे अँड्रॉइड फोन असेल तो हमखासपणे युट्युबचा वापर करत असेलच. असा कोणीही व्यक्ती सापडणार नाही की जो युट्युबचा वापर करत नसेल. तर चला जाणून घेऊया युट्युबबद्दल अधिक माहिती...

What is Youtube in Marathi

सर्वसाधारणपणे युट्युब हे एक व्हिडीओ शेअरिंग वेबसाईट म्हणा किंवा अँप आहे. याठिकाणी कोणतीही व्यक्ती आपले व्हिडीओ अपलोड करू शकतात. त्यासाठी कोणतेही शुल्क देण्याची आवश्यकता नाही. आपल्याकडे फक्त एक जीमेल खाते असणे आवश्यक आहे.

What is Youtube in Marathi

युट्युबची सुरुवात -

युट्युबची सुरुवात 14 फेब्रुवारी 2005 रोजी करण्यात आली होती. स्टीव्ह चैन, चाड हर्ले आणि जावेद करीम या तीन मित्रांनी मिळून युट्युबची स्थापना केली होती. सुरुवातील युट्युबमध्ये सध्या आहेत तसे फिचर अस्तित्वात नव्हते.
दिनांक 9 ऑक्टोबर 2006 रोजी गुगलने जवळजवळ 1 अरब 65 करोड डॉलरमध्ये युट्युब विकत घेतले. इतक्या मोठ्या रकमेची हि त्यावेळची सर्वात मोठी देवाणघेवाण होती.

युट्युबची काही वैशिष्ट्ये -

  • युट्युब आपल्या नोंदणीकृत सभासदांना मोफतपणे व्हिडीओ अपलोड करण्याची मुभा देते. यासाठी ते कोणतेही शुल्क आकारत नाही. आपल्याकडे फक्त एक जीमेल अकाऊंट असणे आवश्यक आहे.
  • सध्या युट्युबवर लाखो व्हिडिओ उपलब्ध असून त्यात संगीत, मनोरंजन, खेळ, शैक्षणिक तसेच इतर सर्व प्रकारच्या व्हिडीओचा समावेश आहे.
  • युट्युबवर जर आपल्याला नोंदणी करण्याची इच्छा नसेल तरीही आपण यावरील व्हिडिओचा लाभ घेऊ शकता. मात्र जर आपल्याला व्हिडिओ अपलोड करायचा असेल तर आपल्याला नोंदणी करावीच लागेल.
  • युट्युबद्वारे आपण पैसे कमवू शकतो का? हा प्रश्न खूप साऱ्या लोकांना नेहमी पडत असतो. तर याचे उत्तर आहे "हो". युट्युबद्वारे आपण हजारोच नाही तर लाखो रुपये कमावू शकतो. गुगलची एक सर्व्हिस आहे गुगल ऍडसेन्स . याद्वारे आपण खूप सारे पैसे कमवू शकतो. मात्र त्यासाठी आपण युट्युबवर अपलोड करत असलेली सामग्री [Content] लोकांच्या उपयोगी आले पाहिजे व त्यांना ते आवडले पाहिजे.

Post a Comment

Previous Post Next Post