आई नावाचं विश्व – मराठी कविता

Share :

Aai Navach Vishwa – Latest Aaichya Kavita, Latest Kavita in Marathi, Aaiche Vishwa, Net Marathi Kavita.


आई नावाच विश्व - Aai Navach Vishwa - Marathi Kavita
आई नावाच विश्व – Aai Navach Vishwa – Marathi Kavita

।। आई नावाचं विश्व ।।

आयुष्यात भेटलेली तू पहिली नारी…
तूच दाखवली मला दुनिया सारी !

किती झेललं तू ऊन…
कसं फेडावं तुझं हे ऋण !

तुझी ती अगणित माया…
जशी चंद्राची शीतल छाया !

तुझ्या प्रेमाच्या कुशीत निजलो…
तिथं फुलाप्रमाणे मी रुजलो !

आई जेव्हा पहिल्यांदा पकडलं माझं तू बोट…
तेव्हाच अनुभवला मी अमृताचा घोट !

तू दाखवलं बागडायला अंगण…
तूच शिकवलं भेदायला अपयशाचं रिंगण !

आई तूच माझी तलवार…
मला लाभलेला तू अलंकार…
तूच माझा जगण्याचा आधार !

(कविता सौजन्य – वैभव व्यवहारे)


Netmarathi आता टेलीग्रामवर देखील उपलब्ध आहे. आमचं चॅनेल (@Netmarathi) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Share :

Leave a Comment