डिप्रेशन म्हणजे काय? डिप्रेशनची लक्षणे व त्यावरील उपाय - Depression in Marathi

Depression in Marathi - In this Article we will Study the Symptoms of Depression and the Solutions to it. Depression symptoms in Marathi, Depression Treatment.

Depression in Marathi

Depression in Marathi - नुकतेच प्रसिद्ध सिने अभिनेते सुशांत सिंह राजपूत यांनी डिप्रेशनमध्ये येऊन आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. अलिकडील स्पर्धेच्या युगात डिप्रेशनच्या समस्येने मोठे रौद्र रूप धारण केले आहे. या लेखात आपण डिप्रेशनची लक्षणे व त्यावरील उपाय अभ्यासणार आहोत.

सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की डिप्रेशन म्हणजे काय? तर डिप्रेशन म्हणजे अति ताण तणावाची उच्चतम पातळी..

Depression in Marathi
Depression in Marathi

सध्याच्या धावपळीच्या व स्पर्धेच्या युगात डिप्रेशन ही फक्त प्रौढांचीच समस्या बनून न राहता तिने तरुण, मुले यांनासुद्धा आपली शिकार बनवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भविष्यात डिप्रेशन ही मोठी समस्या बनण्याची शक्यता नाकारता येत नाही.


कधी कधी तर डिप्रेशनमध्ये असलेली व्यक्ती स्वतः ला इजा करून घेते किंवा आपले जीवन संपवून टाकण्याचा (आत्महत्या) विचार, कृती करते. कधी कधी डिप्रेशनमध्ये असलेली व्यक्ती दुसऱ्यांना इजा करण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. तसेच डिप्रेशनमुळ व्यक्ती पूर्ण प्रभावीपणे काम करू शकत नाही. अशावेळी कामात अनेक अडथळे येत असतात.

डिप्रेशनची लक्षणे (Symptoms)

तसं बघितलं तर डिप्रेशनची अनेक लक्षणे (Symptoms) दिसून येतात, त्यात
 • सतत उदास किंवा निराश वाटणे.
 • कधी कधी अचानक चिडचिड होणे.
 • नवीन व्यक्तींची व नवीन ठिकाणांची अनाठायी भिती वाटणे.
 • एखाद्या गोष्टीची आवड अचानक कमी होणे.
 • आपल्या दैनंदिन कामकाजात मन न लागणे.
 • थकवा येणे किंवा अशक्तपणा जाणवणे.
 • कमी भूक लागणे किंवा अति जास्त प्रमाणात भूक लागणे.
 • एखाद्या गोष्टीची विनाकारण काळजी लागून राहणे.
 • स्वतः दोषी असल्यासारखे वाटणे.
 • कायम स्वतः ला काही इजा करावीशी वाटणे किंवा आत्महत्या करावी वाटणे.
 • कारण नसताना पचनाच्या समस्या जाणवणे.
 • जन्म घेऊन आपण काहीच करू शकलो नाही असे कायम वाटत राहणे.
 • जवळच्या व्यक्तींशी किंवा कुटुंबियांशी संवाद कमी होणे.
 • आपले हसू होईल या भीतीने कमी बोलणे किंवा अतिशय हळू आवाजात बोलणे.
 • कधी कधी अचानक हसू किंवा रडू येणे.

सर्वांमध्येच वरील लक्षणे दिसून येतील असे नाही. मात्र वर सांगितल्याप्रमाणे हा आजार कोणालाही होऊ शकतो. त्यावर वेळीच ताबा मिळवला नाही तर मोठी हानी होण्याचा संभव असतो.

डिप्रेशनचा सर्वाधिक धोका
अति जास्त गरिबी, दीर्घकालीन बेरोजगारी, एखाद्या गोष्टीचे व्यसन, प्रेमभंग, अतिप्रिय व्यक्तीचा अचानक मृत्यू, एखादा मानसिक धक्का, कायम अपयश, शारीरिक आजार यांमुळे डिप्रेशनच्या समस्येचा धोका कैक पटींनी वाढतो.

डिप्रेशनमुळे इतर देखील समस्या उद्भवतात. त्यात

 • भित्रेपणा
 • चिडचिड
 • उदासीनता
 • अस्वस्थता
 • रक्तदाब
 • मधुमेह
 • वजन वाढणे किंवा कमी होणे.

आता आपल्या हे लक्षात आलेच असेल की डिप्रेशन ही समस्या आपल्याबरोबर इतरही आजारांना आमंत्रण देते.


आता आपण अतिशय हानिकारक असलेल्या या डिप्रेशनवरील उपाय जाणून घेऊ -

डिप्रेशनवरील उपाय (How to Overcome Depression)

 • नियमितपणे 6 ते 8 तास झोप घ्यावी.
 • रोजचा किमान 30 मिनिटे व्यायाम करावा.
 • रोज योगासन करावे, योगासन आपल्याला मनशांती प्रदान करते.
 • एखादा छंद किंवा आवड जोपासा. जसे, पेंटिंग, कुकिंग इ.
 • स्वतः ला क्वालिटी टाइम द्या.
 • सर्वांसोबत आपले विचार शेअर करा.
 • आपली प्रत्येक कृती सकारात्मक असू द्या. सकारात्मक रहा, सकारात्मक वाचन करा, सकारात्मक लोकांच्या संपर्कात रहा.
 • मोकळ्या वेळेत तसेच बसण्यापेक्षा काहीही करत रहा. स्वतःला एखाद्या उद्योगात गुंतवून ठेवा.
 • स्वतः ला कमी समजू नका.

तर मित्रांनो, आपण वाचत होतात डिप्रेशन (Dipression) म्हणजे काय ? आम्हाला आशा आहे की डिप्रेशन या समस्येबद्दल या लेखाच्या माध्यमातून आपल्याला परिपूर्ण माहिती मिळाली असेल. ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा.

अशाच स्वरूपाच्या दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी Net Marathi या वेबसाईटला भेट द्या.

❝  सदर लेखातील माहिती ही विविध माध्यमातून संशोधन करून केवळ आणि केवळ प्राथमिक माहितीसाठी उपलब्ध करून दिली आहे. वाचकांनी कोणताही निर्णय किंवा उपचार घेण्याअगोदर त्या त्या क्षेत्रातील विशेषज्ञाचा सल्ला घ्यावा. ❞

Depression FAQ's - 

✅ डिप्रेशन म्हणजे काय?

डिप्रेशन म्हणजे अति ताण तणावाची उच्चतम पातळी.

✅ डिप्रेशनची लक्षणे काय काय आहेत?

सतत उदास किंवा निराश वाटणे, सतत उदास किंवा निराश वाटणे, कधी कधी अचानक चिडचिड होणे, नवीन व्यक्तींची व नवीन ठिकाणांची अनाठायी भिती वाटणे, एखाद्या गोष्टीची आवड अचानक कमी होणे, आपल्या दैनंदिन कामकाजात मन न लागणे, थकवा येणे किंवा अशक्तपणा जाणवणे याबरोबरच इतरही अनेक डिप्रेशनची लक्षणे सांगता येतील.

✅ डिप्रेशनमुळे इतर आणखी काही समस्या उद्भवतात का?

डिप्रेशनमुळे भरपूर समस्या उद्भवतात. त्यात भित्रेपणा, चिडचिड, उदासीनता, अस्वस्थता, रक्तदाब, मधुमेह, वजन वाढणे किंवा कमी होणे यांचा समावेश होतो.

✅ डिप्रेशनवर काही उपाय आहेत का?

जर वरील लक्षणे आपल्याला जाणवत असतील आणि त्याची तीव्रता जास्त असेल तर आपण ताबडतोब एखाद्या विशेषज्ञाचा सल्ला घ्या. तसेच रोजच्या रोज कमीत कमी 6 ते 8 तास शांत झोप घ्या, अति जास्त विचार करणे सोडून द्या, रोज व्यायाम व योगासने करा, एखादा छंद जोपासा, सकारात्मक लोकांच्या संपर्कात राहा आणि सर्वात महत्वाचे स्वतःला कमी लेखणे सोडून द्या. तुम्ही अद्वितीय आहात.

0 Comments