पावसात DTH Set Top Box बंद पडण्यामागील कारण तुम्हाला माहित आहे का?

Share :

DTH Set Top Box Stop During Rain – In This Article We Read Information About Why DTH Set Top Box Stop Working During Rain. Read Full Interesting Article.

DTH Set Top Box Stop During Rain – पावसाळ्यात आपला DTH Set Top Box बंद पडण्याच्या घटना नेहमी घडतात. मात्र आपल्याला नेहमी हाच प्रश्न पडतो कि, असे का होते?
ज्यावेळी आपण आपला आवडता चित्रपट, मालिका किंवा क्रिकेट मॅच बघत असू, आणि अचानक पावसाला सुरुवात होऊन आपला DTH Set Top Box बंद पडतो, त्याचे सिग्नल जाते, त्यावेळी आपली तळपायाची आग मस्तकात जाते. आपल्याला भयंकर राग  येतो.

आपल्याला अशावेळी फक्त एकच प्रश्न पडतो, तो म्हणजे पाऊस सुरु झाल्यावर DTH Set Top Box ला असे काय होते, कि याचे सिग्नलच गायब होऊन जाते.


याचीच माहिती आपण आजच्या लेखात करून घेणार आहोत.
DTH Set Top Box Stop During Rain
DTH Set Top Box Stop During Rain

अशावेळी आपल्याला
खराब वातावरणामुळे आपला Set Top Box सिग्नल स्विकारु शकत नाही.
असा मॅसेज वारंवार दिसतो.
अशी समस्या आपल्याला प्रत्येक पावसात अनुभवास येत असेल. मग आपल्यापैकी प्रत्येकालाच हा प्रश्न पडतो कि, नेमके असे काय होते, कि पावसाला सुरुवात झाल्याबरोबरच सिग्नल गायब होऊन जाते.

आपल्या याच प्रश्नाचे सविस्तर उत्तर आपण याठिकाणी जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याअगोदर आपण DTH Set Top Box कार्य कसे करते ते बघूया…

मित्रांनो आपल्या टीव्हीला जोडला गेलेला Set Top Box एका अँटिनाद्वारे सिग्नल स्वीकारत असतो. हे सिग्नल अंतराळात असलेल्या उपग्रहाच्या माध्यमातून येत असतात.


हे सिग्नल उपग्रहापासून ते आपल्या Set Top Box पर्यंत Ku Band फ्रिक्वेन्सीद्वारे पोहचत असतात. याच फ्रिक्वेन्सीच्या माध्यमातून आपण आपल्या टीव्हीवर विविध कार्यक्रम, मालिका, मॅच बघत असतो.

पाऊस आल्यावर नेमके काय होते?

ज्यावेळी पाऊस येतो, त्यावेळी ह्या फ्रिक्वेन्सी जड होतात व त्यामुळे त्या आपल्या Set Top Box च्या अँटिनापर्यंत व्यवस्थितपणे पोहचू शकत नाही. त्यामुळे आपल्या Set Top Box वर वरीलप्रमाणे मॅसेज दिसतो आणि आपला DTH Set Top Box बंद पडतो.

यावर उपाय काय?

आता बहुतेक वाचक हे म्हणतील कि “मग आपण आपला सर्व्हिस प्रोव्हायडर बदलल्याने हि समस्या सुटेल का? किंवा यावर काही उपाय आहे का?

हे देखील वाचा…

तर मित्रांनो, आपण आपला सर्व्हिस प्रोव्हायडर बदलला तरी हि समस्या सुटणार नाही. कारण यात त्यांची काहीच चूक नसून फ्रिक्वेन्सीच्या समस्येमुळे हि समस्या निर्माण होते.


त्यामुळे यावर काहीच उपाय नाही. पाऊस बंद झाल्यावर आपले DTH Set Top Box आपोआप सुरु होते. याचा अनुभव आपण घेतला असेलच…
तर मित्रांनो, आम्हाला खात्री आहे कि, आम्ही दिलेल्या माहितीने आपले संपूर्ण समाधान झाले असेल. अशाच रंजक माहितीसाठी वेळोवेळी आमच्या www.netmarathi.com या वेबसाईटला भेट द्या व हि माहिती आपल्या मित्रांना जरूर शेअर करा.

Netmarathi आता टेलीग्रामवर देखील उपलब्ध आहे. आमचं चॅनेल (@Netmarathi) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Share :

Leave a Comment