Garudzep
![घ्या गरुडझेप [Garudzep] घ्या गरुडझेप [Garudzep]](https://1.bp.blogspot.com/-QYmyI1egsqs/Xu9YPYdvl0I/AAAAAAAAAPg/SXzMzF-k6E8KUPaBYNr55a9Gv3OtVLXFwCPcBGAYYCw/w640-h426/Ghya%2BGarudzep.jpg)
त्याला “पक्ष्यांचा राजा” [King of birds] असे म्हटले जाते. त्याची चोच इतकी धारदार असते की कोणत्याही वस्तूचे क्षणात दोन तुकडे. त्याची नजर इतकी तीक्ष्ण असते की, दुरुनही आपले सावज अगदी सहजपणे हेरता येईल.
त्याच्या पंखात इतके बळ असते की, ढगांच्याही वर झेप घेण्याची क्षमता. त्याच्या पायांच्या नखामध्ये इतकी ताकद असते की, अगदी हरीण जरी असेल तरी अलगदपणे त्याला उचलून घेऊन जाईल.
ज्या धारदार चोचीच्या बळावर कुठल्याही वस्तूचे क्षणार्धात दोन तुकडे करण्याची कुवत गरुड बाळगून असतो, ती चोच देखील बोथट होण्यास सुरुवात होते. ज्या नखांमध्ये लांडग्यांसारखे प्राणी अलगदपणे उचलून आणण्याची क्षमता होती, ते नखं देखील आता झडायला सुरुवात होते.
यामुळे गरुडाला पहिल्यासारखी शिकार करता येत नाही. शिकार न करता आयते मेलेले जनावरं, पशु-पक्षी यांना आपले अन्न बनविल मग तो गरुड कसला?
मात्र तो हे सर्व सहन करतो. डोंगरावरील एका खडकावर तो आपली चोचदेखील आपटून आपटून तोडून टाकतो. रक्तबंबाळ अवस्थेत तो तसाच एकटा, असह्य त्या डोंगरावर ऋषितुल्य जीवन जगतो. याकाळात त्याला शिकार करता येत नसल्याने त्याला उपाशी राहण्याशिवाय किंवा मिळेल ते खाण्याशिवाय दुसरा पर्यायच उपलब्ध नसतो.

दिवसामागून दिवस गेल्यावर आता गरुडाला जुन्या चोचीच्या जागी नवीन चोच येऊ लागते की जी पहिल्या चोची पेक्षाही अधिक धारदार असते. स्वतः च्या चोचीने उपटून टाकलेल्या पंखांच्या जागी नवीन पंख येऊ लागतात, ज्यांच्यात आता ढगांच्याही वर अगदी सहजपणे झेप घेण्याची क्षमता आलेली असते.
जुन्या झालेल्या नखांच्या जागी तीक्ष्ण व धारदार नखं परत पालवी फुटल्याप्रमाणे येतात. पुन्हा त्या नखात लांडग्याचीसुद्धा शिकार सहजतेने करण्याची क्षमता उत्पन्न होते.

आता गरुडाच्या अंगी पहिल्यापेक्षाही अधिक बळ आलेले असते. आता तो आपल्या धारदार चोचीच्या बळावर कोणत्याही गोष्टीचे क्षणार्धात दोन तुकडे करू शकतो. आपल्या मजबूत पंखांच्या जोरावर तो अवकाशात झेप घेऊ शकतो. आपल्या धारदार नखांनी शिकारसुद्धा करू शकतो.
हालअपेष्टा सहन करून त्याच्यात आता पूर्वीपेक्षाही अधिक बळ आलेले असते. आता तो सज्ज होतो नवीन शिकार अगदी सहजतेने करण्यासाठी…
आपण घ्यावा असा बोध/प्रेरणा
ज्याप्रमाणे गरुडाचे पंख, चोच, नखं त्याला साथ देत नाहीत त्याचप्रमाणे आपल्याला आपले नशीब, आपले नातेवाईक, मित्र किंवा इतर व्यक्ती कठीण प्रसंगात साथ देत नाहीत.
ज्याप्रमाणे गरुड आपल्यावर आलेल्या संकटाला अतिशय शांतपणे सामोरे जातो, त्याचप्रमाणे आपल्याला शांतपणे आलेल्या संकटांचा सामना करावयाचा आहे. यश निश्चितच एके दिवशी आपल्या पायाशी लोळण घेईल.
आता आपणही कोणत्याही संकटाला तोंड देण्यासाठी सज्ज असाल. जर आपल्याला हा लेख आवडला तर आपल्या मित्र-मैत्रीणींना जरूर शेअर करा.
