इंडिया विरुद्ध हिंदुस्तान - मराठी कविता

India Viruddh Hindustan - Marathi Kavita - India Vs Hindustan Latest Marathi Kavita. Read Latest Marathi Kavita India Viruddha Hindusthan.

India Viruddh Hindustan - Marathi Kavita
India Viruddh Hindustan - Marathi Kavita

इंडिया विरुद्ध हिंदुस्तान

इथं किती जरी गेले ना प्राण...
हा आमचा निवडणुकीपुरता हिंदुस्तान !

इंडियानं घरात बसून घेतलं मस्त...
हिंदुस्तानात मरण झालंय स्वस्त !

हिंदुस्तान पोटाची आग विझविण्याकरिता झटतंय ...
इंडियाला सात पिढ्या घरातच सुरक्षित वाटतंय !

हिंदुस्तानात हे असंच घडणार...
मरण्यासाठी प्रत्येकजण बाहेर पडणार !

वर्षानु-वर्षे इथलं रहाटगाडगे...
आम्ही असंच मुकाट्यानं पुढं ओढणार !


(कविता सौजन्य - वैभव व्यवहारे)

Netmarathi आता टेलीग्रामवर देखील उपलब्ध आहे. आमचं चॅनेल (@Netmarathi) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.