Mistakes After Bath - सर्वसाधारणपणे आपल्याकडे अंघोळ झाल्यावर लोक अशा काही चुका करतात कि त्याचा आपल्याला कालांतराने नक्कीच पश्चाताप होतो. आजच्या या लेखात आपण अशाच काही बाबींचा अभ्यास करणार आहोत...

प्रत्येकाला आपण सुंदर व आकर्षक दिसावे असे नेहमी वाटतच असते. त्यासाठी प्रत्येकजण विविध माध्यमातून प्रयत्न करताना दिसतो. सध्याच्या प्रदूषणाच्या वाढत्या प्रमाणामुळे अगोदरच आपल्या त्वचेची काळजी घेताना प्रत्येकाच्या नाकी नऊ येत असतात. अशावेळी आपण अशा काही चुका करतो [Mistakes After Bath] कि ज्याचा पश्चात्ताप आपल्याला कालांतराने होतोच होतो.

Mistakes After Bath
Mistakes After Bath

दररोज अंघोळ केल्यावर काही व्यक्ती या अशा चुका करतात. तथापि त्याचा परिणाम तात्काळ न जाणवता उशिरा या गोष्टी लक्षात येतात. त्यामुळे या बाबींची आपण वेळीच काळजी घेतलेली बरी...!

चला तर मग जाणून घेऊया त्या कोणत्या चुका आहेत, [Mistakes After Bath] ज्या आपण नेहमी करतो...

टॉवेलचा वापर

अंघोळ झाल्यावर आपण सर्वसाधारणतः कोणत्याही टॉवेलने आपले अंग व केस पुसतो. मात्र तो टॉवेल हा रोजच्या रोज धुतला असला पाहिजे. त्यावर कोणत्याही प्रकारची धूळ नसली पाहिजे. जर आपण जुन्या व न धुतलेल्या टॉवेलने आपले अंग व केस पुसले तर ते आपल्यासाठी अतिशय घातक ठरू शकते. याचा आपल्या त्वचेवर व केसांवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अंघोळ झाल्यावर स्वच्छ टॉवेलचाच वापर करावा.


केसांना तेल न लावणे

अंघोळ झाल्यावर कित्येकजण आपल्या केसांना तेल लावण्याचे पसंद करत नाही. काहींना तेल लावल्यावर डोक्यावर अतिशय पचपच झाल्याचे फिलिंग्स येतात, तर काहींना तेल न लावल्यामुळे हवेत उडणारे केस आवडतात. काही जण तर हेअर जेल, वेगवेगळ्या क्रीमचाही वापर करतात. मात्र जर आपण अंघोळ झाल्यावर केसांना तेल लावत नसू तर आपल्या केसांना व्यवस्थितपणे पोषण मिळत नाही. परिणामी आपले केस गळण्यास सुरुवात होते, याचा शेवट कसा होतो, ते आपल्याला माहितच आहे !

Common Mistakes After Bath
Common Mistakes After Bath

त्यामुळे रोजच्यारोज अंघोळ झाल्यावर आपण आपल्या केसाच्या वाढीप्रमाणे तेल लावलेच पाहिजे. त्यासाठी आपण नारियल तेल, बदाम तेल किंवा तिळाचे तेल वापरू शकता.

केसांना व तोंडाला साबण लावणे

आपण नेहमीच अंघोळ करताना आपल्या केसांना व तोंडाला साबण लावतो. मात्र आपल्याला माहित आहे का, केसांना व चेहऱ्याला साबण लावल्याने ते डॅमेज होण्याचा धोका कैकपटींनी वाढतो. कारण बहुतेक साबण हे खूपच हार्ड असतात. त्या तुलनेत आपली त्वचा व केस हे खूपच नाजूक व सेन्सिटिव्ह असतात. त्यामुळे साबण लावायचीच असेल तर आपल्याला अंगाला लावा. चेहरा व केसांना साबण लावू नका.

तर मित्रांनो या होत्या काही चुका [Mistakes After Bath] ज्या आपण अंघोळ झाल्यावर करतो. आपण या चुका टाळून आपल्या केसांची व आपल्या त्वचेची व्यवस्थितपणे काळजी घेऊ शकतो. जर आपल्याला हि माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा.

अशाच टिप्स आणि ट्रिक्ससाठी वेळोवेळी आमच्या www.netmarathi.com या वेबसाईटला भेट द्या.

Post a Comment

आपला अभिप्राय (Comment) येथे नोंदवा. आपल्या अभिप्रायांचे स्वागतच आहे...*

थोडे नवीन जरा जुने