Farmer Pension Scheme in Marathi - देशातील शेतकऱ्यांसाठी प्रति महिना 3000 रुपये याप्रमाणे दरवर्षी 36000 रुपये मिळवून देणारी योजना मोदी सरकारने सुरु केली आहे.

मोदी सरकारने शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल अशी देशातील पहिली पेन्शन योजना अर्थात प्रधान मंत्री किसान मानधन योजना [Pradhan Mantri Kisan Maandhan yojana] सुरु केली आहे.

Farmer Pension Scheme in Marathi
Farmer Pension Scheme in Marathi

ज्या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह फक्त शेतीवर अवलंबून आहे, अशा शेतकऱ्यांसाठी हि योजना फायदेशीर ठरणार आहे. योजना सुरु झाल्यापासून हजारो शेतकऱ्यांनी यासाठी नोंदणी केली आहे.

योजनेचा फायदा काय?

शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नोंदणी केली तर शेतकऱ्यांना प्रति महिना 3000 रु. याप्रमाणे प्रतिवर्षी 36,000 रु. थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे.


योजनेसाठी आवश्यक पात्रता

  • या योजनेस पात्र ठरण्यासाठी तुम्ही शेतकरी असणे आवश्यक आहे.
  • पीएम शेतकरी मानधन योजनेसाठी शेतकऱ्याचे वय 18 ते 40 वर्ष यामधील असणे आवश्यक आहे.
  • इच्छुक शेतकऱ्याच्या नावे जास्तीत जास्त 5 एकर [2 हेक्टर] पर्यंत जमीन असणे आवश्यक आहे.

योजनेसाठी खर्च किती येईल ?

या योजनेसाठी शेतकऱ्यांना काही ठराविक रक्कम अगोदर जमा करावी लागेल. किती रक्कम जमा करावी लागेल, याच्या मार्गदर्शनासाठी खालील दिलेला तक्ता काळजीपूर्वक अभ्यासा.


लाभार्थी शेतकऱ्याचे योजनेत भाग घेतानाचे वय

लाभार्थी शेतकऱ्याने भरावयाचा मासिक हप्ता रुपये
18 55
19 58
20 61
21 64
22 68
23 72
24 76
25 80
26 85
27 90
28 95
29 100
30 105
31 110
32 120
33 130
34 140
35 150
36 160
37 170
38 180
39 190
40 200

योजनेसाठी नोंदणी कशी कराल ?

  • जर आपणास या योजनेसाठी नोंदणी करावयाची असेल तर आपण आपल्या गावातील किंवा शेजारील कॉमन सर्व्हिस सेंटर [CSC] केंद्रावर जाऊन याची नोंदणी करू शकता.
  • नोंदणीसाठी आपल्याकडे स्वतःचे Aadhar Card, 2 पासपोर्ट साईज फोटो आणि बँक पासबुक असणे आवश्यक आहे.
  • नोंदणी झाल्यावर प्रत्येक शेतकऱ्याचा एक पेन्शन युनिक नंबर व पेन्शन कार्ड बनवण्यात येईल.

काही महत्वपूर्ण सूचना

  • नॅशनल पेन्शन स्कीम, कर्मचारी राज्य वीमा निगम आणि कर्मचारी भविष्य निधि [EPFO] योजनेअंतर्गत येणारे लोक प्रधान मंत्री किसान मानधन योजना [Pradhan Mantri Kisan Maandhan yojana] साठी पात्र असणार नाही.
  • वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यावर नोंदणीकृत शेतकऱ्याला प्रति महिना 3000 रुपये म्हणजेच 36,000 रुपये प्रति वर्ष पेन्शन सुरु होईल.
  • जर एखाद्या शेतकऱ्याला प्रधान मंत्री किसान मानधन योजना [Pradhan Mantri Kisan Maandhan yojana] मध्येच खंडित करण्याची इच्छा असेल तर त्या शेतकऱ्याचे पैसे बुडणार नाही. त्या शेतकऱ्याची जितकी रक्कम या खात्यात जमा झाली असेल ती रक्कम व त्यावर बँकांच्या बचत खात्याच्या समान व्याज देखील मिळेल.

तर मित्रांनो जर आपणही शेतकरी असाल तर लवकरात लवकर या योजनेसाठी नोंदणी करा. शेतकऱ्यांना वृद्धापकाळात एक निश्चित आर्थिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी हि योजना [Farmer Pension Scheme in Marathi] अतिशय महत्वपूर्ण आहे.

अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी आपण आपल्या जवळच्या CSC केंद्राला भेट द्या.

हि माहिती आपल्या शेतकरी मित्रांना अवश्य शेअर करा. शासकीय योजनेसंबंधी अशाच माहितीसाठी वेळच्यावेळी www.Netmarathi.com या वेबसाईटला भेट द्या.

1 टिप्पण्या

आपला अभिप्राय (Comment) येथे नोंदवा. आपल्या अभिप्रायांचे स्वागतच आहे...*

टिप्पणी पोस्ट करा

आपला अभिप्राय (Comment) येथे नोंदवा. आपल्या अभिप्रायांचे स्वागतच आहे...*

थोडे नवीन जरा जुने