PM-Kisan Yojana Marathi - पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत जर आपण नोंदणी केली नसेल किंवा नोंदणी करण्याचा विचार करत असाल तर आपण अगदी योग्य ठिकाणी आला आहात.

आपण PM-Kisan योजनेमध्ये नोंदणी करण्याचा विचार करत असाल किंवा नोंदणी केली नसेल तर आपण या लेखाच्या मदतीने अगदी सहजपणे PM-Kisan योजनेशी संबंधित सर्व माहिती जाणून घेऊ शकता. चला तर मग PM-Kisan योजनेशी संबंधित महत्वपूर्ण माहिती जाणून घेऊया...

PM-Kisan Yojana Marathi
PM-Kisan Yojana Marathi

सर्वप्रथम आपण PM Kisan योजनेविषयी थोडीशी माहिती पाहूया... !

PM-Kisan योजनेविषयी थोडेसे...
 • PM-Kisan योजना म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी. याअंतर्गत देशातील प्रत्येक शेतकऱ्यांना प्रति महिना 500 रु. याप्रमाणे वर्षाला 6000 रु. ची आर्थिक मदत दिली जाते.
 • केंद्र सरकारने देशातील प्रत्येक शेतकऱ्याला एक ठराविक उत्पन्न मिळण्यासाठी या योजनेची सुरुवात 01 डिसेंबर 2018 पासून सुरु केली आहे.
 • योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 4 महिन्याच्या अंतराने दोन हजार रु. रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.


वरील योजना हि सर्व शेतकऱ्यांसाठी असली तरी काही व्यक्ती या योजनेसाठी अपात्र आहेत, त्यामध्ये खालील व्यक्तींचा समावेश होतो.

PM-Kisan योजनेसाठी अपात्र व्यक्ती

 • सर्व घटनात्मक पदावरील व्यक्ती
 • आजी-माजी लोकप्रतिनिधी
 • आजी-माजी सरकारी अधिकारी व कर्मचारी [वर्ग ड वगळता]
 • करदाते
 • डॉक्टर
 • वकील
 • सनदी लेखापाल

अधिकच्या तपशीलासाठी येथे क्लिक करा.

PM-Kisan योजनेसाठी नोंदणी कशी करावी

PM-Kisan योजनेसाठी आपण 3 प्रकारे नोंदणी करू शकतो, त्यात
 • कागदपत्रे तलाठी कार्यालयात जमा करून. कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, बँक पासबुक, जमिनीचे उतारे इ. समावेश होतो.
 • कॉमन सर्व्हिस सेंटर [CSC] च्या माध्यमातूनही आपण PM-Kisan योजनेसाठी नोंदणी करू शकतो. त्यासाठी वरीलप्रमाणेच कागदपत्रे जमा करावी लागतील. CSC मार्फत नोंदणी केल्यास आपल्याला एक ठराविक शुल्क द्यावे लागेल.
 • शेतकरी स्वतः वैयक्तिकपणे pmkisan.gov.in या वेबसाईटवर जाऊन आपली नोंदणी करू शकतात.

जर आपण शेतकरी असाल आणि आपण PM-Kisan Yojana या योजनेसाठी नोंदणी केली नसेल तर आपण आजच यासाठी नोंदणी करून घ्या. त्यासाठी आपले तलाठी कार्यालय, CSC केंद्र किंवा www.pmkisan.gov.in या वेबसाईटला भेट द्या.

शासकीय योजनेच्या अशाच माहितीसाठी वेळोवेळी आमच्या Netmarathi.com या वेबसाईटला भेट द्या. हा लेख आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.

Post a Comment

आपला अभिप्राय (Comment) येथे नोंदवा. आपल्या अभिप्रायांचे स्वागतच आहे...*

थोडे नवीन जरा जुने