जरी विविध व्यक्तींना Instagram काय आहे हे माहित असले तरी ते कसे कार्य करते? त्याचा वापर कसा करावा? हे बहुतेक व्यक्तींना माहित नसेल…

What is Instagram in Marathi
आज आपण Instagram या बहुचर्चित व लोकप्रिय सोशल मिडिया वेबसाईट किंवा Social Media App बद्दल अधिक सविस्तर व दर्जेदार माहिती अभ्यासणार आहोत. ज्याने आपल्या सामान्यज्ञान मध्ये निश्चितच भर पडेल.
सर्वप्रथम आपण Instagram काय आहे ते बघू.(What is Instagram in Marathi)
Instagram हे खूपच लोकप्रिय Social Media App आहे. Instagram ची सर्वप्रथम सुरुवात 2010 मध्ये Kevin Systrom आणि Mike Krieger या दोघांनी मिळून केली होती. या दोघांनीच या App ची डिझाईन व लोगो तयार करून ती लोकांसाठी मोफतपणे उपलब्ध करून दिली.
Instagram चे वैशिष्ट्ये
✔️ Instagram चे कार्य जवळ जवळ Youtube सारखेच आहे. ज्या पद्धतीने आपण Youtube वर व्हिडिओ अपलोड करून ते आपल्या Followers ला दाखवू शकतो त्याच प्रमाणे ते Instagram वरील आपल्या फोटो व व्हिडिओला लाईक करू शकतात तसेच ते आपल्याला Follow देखील करू शकतात.
✔️ Instagram वर देखील आपण Facebook सारखेच आपल्या मित्रांसोबत कनेक्ट होऊ शकता. त्यासाठी आपल्याला आपल्या मित्र किंवा मैत्रिणीचे खाते (Account) शोधून त्यांना Follow कराव लागेल.
✔️ हे App लोकांच्या पसंतीस उतरले. त्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे लोक यावर आपली वैयक्तिक माहिती न दाखवतही यावर आपले फोटो व व्हिडिओ शेअर करू शकत होते. त्यामुळे या App ने सुरुवातीलाच डाऊनलोडचे खूप मोठे मोठे विक्रम रचले.
✔️ फेसबुकने देखील हे अनुभवले कि लोक आपले फोटो व व्हिडिओ शेअर करण्यासाठी फेसबुक ऐवजी Instagram ला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे फेसबुकचे संस्थापक Mark Zuckerberg यांनी Instagram ला खरेदी करण्याचा प्लान आखला आणि त्यांनी तो यशस्वी देखील केला.
इंस्टाग्राम खाते कसे सुरु करावे? (How to Create Instagram Account in Marathi)
बहुतेक व्यक्तींना असा प्रश्न नेहमीच पडतो कि इंस्टाग्राम कसे वापरावे, किंवा त्याचा वापर कसा करावा? तर चला ते हि आपण जाणून घेऊया…
- सर्वप्रथम आपण www.instagram.com या वेबसाईटला भेट द्या.
- आता आपल्यापुढे खालीलप्रमाणे एक वेबपेज दिसेल.
- त्यामध्ये आपण आपली वैयक्तिक माहिती भरून तसेच फेसबुकच्या साहाय्याने देखील लॉग इन करू शकता.

- आता त्यामध्ये व्यवस्थितपणे माहिती भरा व सबमिट या बटनावर क्लिक करा.
आता आपले इंस्टाग्राम खाते तयार झालेले असेल.
Instagram App कसे व कोठून डाऊनलोड करावे. (How to Download Instagram App in Marathi)
✅ Instagram काय आहे?
Instagram हे एक लोकप्रिय सोशल मिडिया वेबसाईट आणि App आहे, ज्याच्या मदतीने आपण आपले फोटो, व्हिडिओ शेअर करू शकतो.
✅ Instagram ची सुरुवात कधी झाली?
Instagram ची सुरुवात 2010 मध्येच झाली.
✅ Instagram चे संस्थापक कोण आहेत?
Kevin Systrom आणि Mike Krieger हे दोघे Instagram चे संस्थापक आहेत. Instagram च्या App ची डिझाईन आणि लोगो यांनीच तयार केला होता.
✅ सध्या Instagram ची मालकी कोणाकडे आहे?
सन 2012 मध्येच फेसबुकने Instagram संपूर्णपणे विकत घेतले. त्यामुळे Instagram ची मालकी फेसबुककडे आहे.
✅ Instagram खाते तयार करण्यासाठी कशाची आवश्यकता आहे?
आपण थेट तुमच्या फेसबुक खात्याच्या सहाय्यानेदेखील Instagram वर लॉग इन करू शकता किंवा मोबाईल क्रमांक, ईमेल आयडीच्या मदतीने नवीन खाते तयार करू शकता.