ट्विटर काय आहे आणि ते कसे वापरावे? – What is Twitter in Marathi

Share :

What is Twitter in Marathi – If you want to know more about Twitter, you have come to the right place, here you can read all the information about Twitter.

आपल्या देशात बहुतेक सर्व व्यक्तींना Twitter काय आहे हे माहित असतेच. कारण आपण सर्वांनीच कधी ना कधी Twitter चे नाव ऐकलेच असेल.

कधी या सेलेब्रिटीने वादग्रस्त ट्वीट केले, कधी या राजकारणी व्यक्तीने ट्वीटच्या माध्यमातून आपली राजकीय भूमिका मांडली, असे आपण नेहमी ऐकत असतोच. परंतु बहुतेक व्यक्ती Twitter संबंधी फक्त थोडीच माहिती जाणून असतात. त्यांना ट्विटर संबंधी अधिक माहिती नसते, किंवा ते कसे कार्य करते याची त्यांना कल्पना नसते.

आज या पोस्टच्या माध्यमातून आपण ट्विटरसंबंधी सर्व माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू, कि ट्विटर काय आहे, ट्विटर कसे कार्य करते, ट्विटरचा वापर कसा करावा, ट्विटरची वैशिष्ट्ये हि सर्व माहिती आपण आपल्या मराठी भाषेतून जाणून घेऊ.

Table of Contents

चला तर मग सुरु करूया…

What-is-Twitter-in-Marathi
What is Twitter in Marathi

जसे कि आम्ही वर सांगितल्याप्रमाणे आपण कधी ना कधी Twitter संबंधी काही ना काही बातमी नक्कीच ऐकली असेल, कि या ट्वीटमुळे मोठा हंगामा झाला आहे, त्या ट्वीटमुळे मोठी खळबळ माजली आहे.

कधी कधी वादग्रस्त ट्वीटमुळे बंद, जाळपोळ झालेलीही आपण ऐकली असेल. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीच्या मनात नेहमीच हा प्रश्न निर्माण होतो कि, Twitter म्हणजे काय?

तर आजच्या या लेखात आपण त्या संबंधी अधिक माहिती जाणून घेऊ.

Twitter काय आहे? (What is Twitter in Marathi)

सर्वात सोप्या भाषेत सांगायचे झाले तर Twitter एक Social Networking Website तसेच App आहे. हे जवळजवळ Facebook, Instagram सारखेच कार्य करते. Twitter च्या माध्यमातून आपण जगभरात काय चालले आहे, किंवा एखाद्या व्यक्तीच्या खाजगी जीवनात काय चालले आहे, याची माहिती घेऊ शकता.

एखाद्या व्यक्तीविषयी जाणून घेण्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीला Follow करावे लागेल. त्यामुळे जेंव्हा ती व्यक्ती एखादे ट्विट करेल, तेंव्हा त्याचे Notification आपल्याला मिळेल.

ट्विटरची स्थापना कोणी केली? (Who Founded Twitter in Marathi)

Twitter ची स्थापना 21 मार्च 2006 रोजी Jack Dorsey, Noah Glass, Biz Stone, Evan Williams यांनी केली. स्थापनेपासूनच ते खूपच लोकप्रिय बनले. कारण याच्या माध्यमातून लोकांना आपले विचार, भावना मनमोकळेपणाने मांडता येऊ लागल्या.

Twitter च्या टीमचे हे म्हणणे होते कि, सुरुवातीला त्यांनी याचे नाव “Twitch” असे ठेवले होते. मात्र पुढे ते बदलून “Twitter” असे केले गेले.

दिनांक 26 एप्रिल 2022 च्या एका अपडेटनुसार टेस्ला या कंपनीचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर (Twitter) कंपनी विकत घेतली आहे. तब्बल 44 अब्ज डॉलरमध्ये हा करार पार पडला आहे.
त्याविषयी अधिक वाचा… Click here

Twitter चा फुल फॉर्म (Twitter full form in Marathi)

ट्विटरचा फुल फॉर्म शक्यतो बहुतेक व्यक्तींना माहित नसेल, ट्विटरचा फुल फॉर्म खालीलप्रमाणे सांगितला जातो…

Typing What I’m Thinking That Everyone’s Reading

Twitter Account कसे तयार करावे? (How to Create Account on Twitter in Marathi)

जर आपल्यालाही Twitter वर खाते तयार करावयाचे असेल तर आम्ही देत असलेल्या टिप्स आपल्या उपयोगी पडतील. ट्विटरचे अकाऊंट उघडणे हि काही खूपच अवघड बाब नाही, परंतु खालील स्टेप्सच्या माध्यमातून आपले काम अगदीच सोपे होईल. Twitter वर आपण Browser किंवा App च्या माध्यमातूनही खाते उघडू शकतो.

 • सर्वप्रथम आपण www.twitter.com या वेबसाईटला भेट द्या किंवा Google Play Store अथवा App Store वरून Twitter चे App Install करा.
 • जसेही आपण ट्विटरची वेबसाईट किंवा App उघडता त्यावेळेस Get Started किंवा Sign up या बटनावर क्लिक करा.
How-to-Create-Account-on-Twitter-in-Marathi
How to Create Account on Twitter in Marathi
 • आता आपले नाव आणि मोबाईल नंबर तेथे टाका.
 • आता आपण Sign up या बटनावर क्लिक करा. जसेही आपण Sign up बटनावर क्लिक कराल तेंव्हा आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP टाकून आपण आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय करा.
 • आता आपल्या Twitter खात्यासाठी एक कठीण Password निवडा. लक्षात ठेवा हा Password कोणाबरोबरही Share करू नका.
 • आता आपली मनपसंत Category निवडा.

आता आपले खाते तयार झालेले असेल.

अशाप्रकारे आपण अगदीच थोड्या वेळातच आपले Twitter खाते तयार करू शकता, व त्याचा आनंद घेऊ शकता.

Twitter ची काही वैशिष्ट्ये (Features of Twitter in Marathi)

जेंव्हा आपण Twitter चालवता तेंव्हा आपल्याला त्याच्याशी संबंधित काही गोष्टी किंवा त्याची वैशिष्ट्ये आपल्याला माहिती असायला हवीत. ती खालीलप्रमाणे…

 • Tweet – Tweet म्हणजे ज्यावेळी आपण Twitter वर काहीतरी लिहितो. याची मर्यादा 140 शब्दांपर्यंत मर्यादित असते.
 • Retweets – जेंव्हा एखाद्या दुसऱ्या युजरचे Massage आपण पोस्ट करतो तेंव्हा त्यालाच Retweets असे म्हटले जाते.
 • Handle – हे एकप्रकारे आपले युजरनेम असते.
 • Following – आपण किती व कोणत्या व्यक्तीला Follow करतो, ते म्हणजे Following. त्याची संख्या आपल्याला आपल्या खात्याच्या समोरच कळते.
 • Followers – आपल्याला किती लोक Follow करत आहेत, त्याची संख्या म्हणजेच Followers.
 • HashTag – जेव्हा आपण एखादी पोस्ट लिहितो, तेव्हा त्या पोस्टला एखादी Category किंवा विषय द्यावयाचा असतो त्यावेळी HashTag चा वापर केला जातो. HashTag नेहमी # या चिन्हाने दर्शवले जाते. उदा. #netmarathi, #latesttrending, #techtips

Twitter चा वापर कसा करावा? (How to Use Twitter in Marathi)

Twitter चालवणे हे खूपच सोपे आहे. जरी आपल्याला ते अवघड वाटत असले तरी आम्ही दिलेल्या माहितीने Twitter वापरणे आपल्याला खूपच सोपे जाईल. कारण आम्ही या पोस्टच्या माध्यमातून सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

 • Home – जेव्हा आपण Twitter चे App किंवा वेबसाईट लॉग इन करून ओपन करता त्यावेळी आपण ज्या पेजवर असतो, ते पेज म्हणजे होम पेज. याठिकाणी आपण ज्यांना ज्यांना Follow केले आहे, त्यांचे Twit येथे दिसतात.
 • Search – जेंव्हा आपल्याला काही सर्च करावयाचे असते किंवा एखाद्या व्यक्तीचे पर्सनल अकाऊंट शोधावयाचे असते, तेंव्हा ते आपण येथे शोधू शकतो.
 • Tweets Button – याच्या माध्यमातून आपण आपले विचार किंवा Post लिहून ती शेअर करू शकतो.

तर मित्रांनो, आम्हाला आशा आहे कि आम्ही Twitter संबंधी दिलेल्या माहितीने (What is Twitter in Marathi) आपले नक्कीच समाधान झाले असेल. आम्ही आपल्याला परिपूर्ण माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे, जर काही माहिती नजरचुकीने राहिली असेल तर आपण कमेंट करून आम्हाला कळवू शकता. आम्ही त्याचे नक्कीच निराकरण करू.

जर हि माहिती आपल्याला आवडली असेल तर आपण ती आपल्या मित्र मैत्रीणीना अवश्य शेअर करा. अशाच माहितीसाठी आपण वेळोवेळी Net Marathi या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

FAQ’s –

ट्विटरची स्थापना कोणी केली?

Twitter ची स्थापना 21 मार्च 2006 रोजी Jack Dorsey, Noah Glass, Biz Stone, Evan Williams यांनी केली.

Twitter चा फुल फॉर्म काय आहे?

Typing What I’m Thinking That Everyone’s Reading

Twitter चे अधिकृत मोबाईल App उपलब्ध आहे का?

हो. Twitter चे अधिकृत मोबाईल App Google Play Store तसेच App Store वर उपलब्ध आहे.

नुकतेच Twitter कोणी विकत घेतले?

टेस्ला या कंपनीचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर (Twitter) कंपनी विकत घेतली आहे. तब्बल 44 अब्ज डॉलरमध्ये हा करार पार पडला आहे.


Share :

Leave a Comment