दिवाळी का साजरी करतात? काय आहे दिवाळी सणाचे महत्व | Diwali Information in Marathi

Diwali Information in Marathi - If you do not know why Diwali is celebrated / Diwali ka Sajri Kartat, we will find out today in this article. Read Now

Diwali Information in Marathi 

भारतात वर्षभर विविध सण-समारंभ साजरे केले जातात. विविध सणांचे धार्मिक तसेच सामाजिक स्तरावर एक वेगळेच महत्व असते. लोक नेहमीच उत्साही व आनंदी वातावरणात विविध सण साजरे करत असतात.

भारतभर साजऱ्या केल्या जाणाऱ्या सर्व सणात दिवाळी हा सण हिंदूंचा प्रमुख सण म्हणून ओळखला जातो. दिवाळी किंवा दीपावली हा सण संपूर्ण भारतभरच नाही तर विदेशातही साजरा केला जातो.

Diwali-Information-in-Marathi
Diwali Information in Marathi

काय आपल्याला माहित आहे का कि दिवाळी हा सण का साजरा केला जातो?  जर आपल्याला हे जाणून घ्यायचे असेल कि दिवाळी हा सण का साजरा केला जातो (Diwali ka Sajri Kartat) तर हा लेख आपली निश्चितच मदत करेल.

दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा केली जाते. या दिवशी लोक आपल्या घरासमोर विविध आकर्षक रांगोळ्या काढतात. आपले घरदार सुशोभित करतात. भारतात बहुतेक ठिकाणी या सणाच्या दिवशी शासकीय सुट्टीच असते.

हा सण रोषणाई आणि आनंदाचे प्रतिक असल्याने यादिवशी सर्व लोक खूपच उत्साहित व आनंदी असतात. त्यामुळे हा सण सर्व लोकांचा आवडीचा सण असतो. विशेषतः लहान मुलांचा दीपावली हा सण जरा जास्तच आवडीचा असतो. कारण लहान मुलांना विविध प्रकारचे फटाके वाजवणे निश्चितच आवडत असते.

हे वाचा : गुढीपाडवा का साजरा केला जातो? गुढीपाडवा सणाची माहिती

यादिवशी घरात विविध प्रकारचे चविष्ट व खमंग पदार्थ बनवले जातात. त्यात लाडू, करंज्या, अनारसे, चिवडा, शंकरपाळे, गुलाबजामबरोबरच इतरही विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात.

यादिवशी लोक नवीन कपडे परिधान करतात तसेच आपल्या जवळचे व्यक्ती, नातेवाईक, मित्रपरिवार यांना विविध प्रकारच्या भेटवस्तू प्रदान करतात. दिवाळीच्या दिवशी अमावास्या असल्याकारणाने लोक आपल्या घरावर व घरापुढे दिवे लावतात. त्यामुळे घर व वातावरण उजळून निघते.

दिवाळी हा सण प्रत्येकाच्याच दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण सण मानला जातो. परंतु बहुतेक व्यक्तींना हे माहित नसते कि दीपावली हा सण का साजरा केला जातो? आजच्या या लेखात आपण अतिशय सविस्तरपणे हे जाणून घेणार आहोत कि दिवाळी का साजरी करतात?

दिवाळी साजरी करण्याचे अनेक कारणे सांगितली जातात, ती पुढीलप्रमाणे सांगता येतील...

Diwali Information in Marathi

दिवाळी सण साजरा करण्यामागे सर्वाधिक सांगितले जाणारे कारण म्हणजे रावणाचा वध करून भगवान राम 14 वर्षांचा वनवास करून अयोध्येत आले, त्यामुळे त्यादिवशी संपूर्ण अयोध्यावासी खूपच आनंदित झाले, त्यामुळे त्या दिवशी लोकांनी पानाफुलाचे तोरण घराला बांधले, सुंदर व मनमोहक रांगोळ्या आपल्या घरापुढे काढल्या, त्यादिवशी अमावास्या असल्याने आपल्या घरावर व घरापुढे दिवे लावून संपूर्ण अयोध्या उजळून टाकली.

त्यामुळे या दिवसापासूनच दिवाळीची सुरुवात झाली असे मानले जाते.

अजून एका कथेनुसार असे सांगितले जाते कि, जेंव्हा भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून संपूर्ण द्वारकेला नरकासुराच्या जाचातून मुक्त केले तेंव्हा संपूर्ण द्वारकावासियांनी दिवे लावून आपला आनंद व्यक्त केला. तेव्हापासूनदेखील दिवाळीची सुरुवात झाली असे मानले जाते.

हिंदू संस्कृतीत दिवे लावणे हे आनंद प्रकट करण्याचे उत्तम माध्यम आहे, त्यामुळे वातावरणात एक प्रकारचे वेगळेच नवचैतन्य पसरत असते. असेही मानले जाते कि जास्त प्रमाणात दिवे लावल्याने एक प्रकारची शारीरिक आणि आध्यात्मिक शक्ती प्राप्त होत असते. त्यामुळेच दिवाळी हा सण संपूर्ण भारतभरच नव्हे तर विदेशातही साजरा केला जातो.

हे वाचा : मकर संक्रांति का साजरी केली जाते?

तर मित्रांनो, आता आपल्याला माहिती झालेच असेल कि दिवाळी हा सण का साजरा केला जातो ते. आम्हाला आशा आहे कि दिवाळी हा सण का साजरा करतात? या प्रश्नाचे उत्तर आता आपल्याला नक्कीच मिळाले असेल. जर आपल्याला हि माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र व नातेवाईकांना जरूर शेअर करा.

अशाच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी आमच्या www.Netmarathi.com या वेबसाईटला भेट द्या.