आधार कार्ड मोबाईलमध्ये कसे डाऊनलोड करावे? अगदी सोपी पद्धत | How to Download Aadhaar Card in Marathi

Share :

How to Download Aadhaar Card in Marathi – If you want to download your Aadhar Card on your mobile, follow these steps. Download Aadhaar in Marathi.

सध्या सर्वात महत्वाचा दस्तऐवज कोणता असेल तर तो म्हणजे आधार कार्ड. कारण भारत सरकार व राज्य शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध सेवांचा व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. त्यामुळे आधार कार्डला एक खास महत्व प्राप्त झाले आहे.

 

कित्येक वेळेस आपण घाईगडबडीत आपले आधार कार्ड घरीच विसरतो, त्यामुळे आपण ज्या कामासाठी गेलेलो असतो, ते काम होत नाही. मात्र आम्ही आपल्याला याठिकाणी अशा काही स्टेप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने आपण आपले आधार कार्ड आपल्याच मोबाईलवर डाऊनलोड करू शकाल.

How to Download Aadhaar Card in Marathi

आता हे वाचून बहुतेक व्यक्तींना यावर विश्वास बसणार नाही. तर “हो” हे खरे आहे. आता आपण अगदी कुठेही असलात तरी आपले स्वतःचे आधार कार्ड अगदी सहजपणे डाऊनलोड करू शकता.

 

आधार कार्ड एक 12 अंकी विशिष्ट ओळख क्रमांक असतो, जो प्रत्येक भारतीय नागरिकाला प्रदान केला जातो. जसे आपल्याला माहिती असेलच कि शासनाच्या विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. उदा. पीएम किसान योजना, शेतकरी विमा योजना.

 

आधार कार्ड कसे डाऊनलोड करावे? How to Download Aadhaar Card

आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी खूपच सोपी प्रक्रिया आहे. त्यासाठी आपल्याकडे आधार कार्ड नंबर किंवा नोंदणी क्रमांक (एनरोलमेंट नंबर) असणे आवश्यक आहे.
नोंदणी क्रमांक (एनरोलमेंट नंबर) हा आपण जेंव्हा नोंदणी करतो त्यावेळी आधार केंद्राकडून आपल्याला जी पावती दिली जाते, त्यावर उल्लेखित असतो.

चला तर मग अधिक वेळ न दवडता आपण जाणून घेऊ कि आधार कार्ड कसे डाऊनलोड करावे? त्यासाठीच्या काही स्टेप्स खालीलप्रमाणे…

  • सर्वप्रथम आपण Google वर जाऊन Aadhar असे सर्च करा किंवा थेट https://uidai.gov.in/ या वेबसाईटवर भेट द्या.

How to Download Aadhar Card in Marathi

 
  • आता आपण My Aadhar या विकल्पावर क्लिक करा. My Aadhar हा विकल्प खाली बाणाने निर्देशित करण्यात आला आहे. आता आपल्यापुढे खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे Download Aadhar हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

How to Download Aadhar Card

  • आता आपल्याला खालील दर्शविल्याप्रमाणे चित्र दिसेल. त्यामध्ये Aadhar Numbar किंवा एनरोलमेंट ID यापैकी योग्य पर्याय निवडा. जर आपल्याकडे आधार नंबर उपलब्ध असेल तर Aadhar Number हा पर्याय राहू द्या व जर आपल्याकडे एनरोलमेंट ID उपलब्ध असेल तर एनरोलमेंट ID या पर्यायावर क्लिक करून विचारलेली माहिती भरा.

  • आता OTP म्हणजेच One Time Password या पर्यायावर क्लिक करा. आता आपण आधार नोंदणी करतेवेळी जो मोबाईल क्रमांक दिला होता त्यावर एक सहा अंकी OTP प्राप्त होईल. आता आपल्याला आपल्या मोबाईलवर प्राप्त झालेला OTP तेथे नोंदवून आपण डाऊनलोड आधार या पर्यायावर क्लिक करा. आता आपले आधार कार्ड डाऊनलोड होईल.

महत्वपूर्ण टीप – आपले डाऊनलोड झालेले आधार कार्ड आपण ओपन करण्याचा प्रयत्न केला तरी ते ओपन होणार नाही. कारण त्यासाठी एक विशिष्ट पासवर्ड आपल्याला तिथे टाकावा लागेल.

त्यासाठी पासवर्डची रचना खालीलप्रमाणे आहे – 

या फाईलच्या पासवर्डची रचना अगदीच सोपी आहे, फक्त ती आपल्याला लक्षात ठेवावी लागेल.

  • आपल्या आधारच्या PDF फाईलचा पासवर्ड हा आपल्या नावाची पहिली चार आद्याक्षरे व आपल्या जन्माचे वर्ष अशा पद्धतीने आहे.

उदा. जर आपले नाव ABCD EFGH IJKL असे असेल, आणि आपला जन्मदिवस 01/01/2000 असेल तर आपल्या आधारच्या PDF फाईलचा पासवर्ड हा “ABCD2000” असा असेल.

अशाप्रकारे आपले आधार कार्ड आता ओपन होईल.

 

तर मित्रांनो, आम्हाला आशा आहे कि, आमच्या या लेखाने आपल्याला निश्चितच फायदा झाला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्र व मैत्रिणींना अवश्य शेअर करा. 

अशाच स्वरूपाच्या दर्जेदार माहितीसाठी www.Netmarathi.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या.


Share :

Leave a Comment