भारतीय स्टेट बँकेत 8500 जागांची मेगा भरती, असा करा अर्ज

Share :

SBI Apprentice Recruitment 2020 – State Bank of India (SBI) Are Invited to Online Application form for Apprentice Post. Read Full Advertisement.


स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय स्टेट बँकेत (SBI) पदवीधर उमेदवारांसाठी 8500 जागांची भरती करण्यासाठी SBI ने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यासाठी अर्ज करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांनी 10 डिसेंबर 2020 पर्यंत अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.

 

SBI Apprentice Recruitment 2020

SBI Apprentice Recruitment 2020

ज्या उमेदवारांचे बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न आहे, अशा उमेदवारांसाठी हि सुवर्णसंधी आहे. या भरतीसंदर्भात आपण सर्वच माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया…

 

पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी (Apprentice)

अर्ज कधी ते कधीपर्यंत भरायचा आहे – दिनांक 20 नोव्हेंबर 2020 पासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 10 डिसेंबर 2020 पर्यंत आहे. दिनांक 10 डिसेंबर 2020 नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

एकूण जागा किती – तब्बल 8500 जागांसाठी हि भरती आयोजित केली जाणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात क्वचितच अशा प्रकारची भरती आयोजित केली जाते. यामध्ये जर फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रासाठी तब्बल 644 जागा आहेत.

शैक्षणिक पात्रता – या जागांसाठी शैक्षणिक पात्रतेची मर्यादा हि “मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी शिक्षण उत्तीर्ण उमेदवार” अशी आहे.

वयोमर्यादा – 31 ऑक्टोबर 2020 रोजी उमेदवारांचे वय हे 20 ते 28 वर्ष असावे अशी अट ठेवण्यात आली आहे. तसेच राखीव प्रवर्गासाठी नियमाप्रमाणे वयोमर्यादेतून सूट देण्यात आली आहे.

 

परीक्षेचा दिनांक – सर्वसाधारणपणे जानेवारी 2021 मध्ये परीक्षा आयोजित केली जाण्याची शक्यता आहे.

 

कसा करता येणार अर्जइच्छुक उमेदवार SBI च्या अधिकृत वेबसाईटवरून दिनांक 10 डिसेंबर 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. त्यासाठी आपल्याला अगोदर नोंदणी करून विचारलेली माहिती सविस्तर भरून परीक्षा शुल्क अदा करावे लागेल. फॉर्म पूर्ण भरल्यावर आपल्या फॉर्मची प्रिंट काढून ती आपल्याजवळ जपून ठेवा. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी भारतीय स्टेट बँकेच्या www.sbi.co.in या वेबसाईटला भेट द्या.

महत्वपूर्ण लिंक्स – 

अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

जाहिरात वाचण्यासाठीयेथे क्लिक करा

अशाच माहितीसाठी आमच्या www.Netmarathi.com या वेबसाईटला भेट द्या. हि माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रीणींना अवश्य शेअर करा.


Share :

Leave a Comment