आपल्याला जांभई येणे ही तशी अतिशय सर्वसामान्य बाब आहे. आपण कंटाळल्याचे किंवा आपल्याला झोप लागल्याचे ते एक लक्षण आहे. तसेच भूक लागली तरीही जांभई येते. मात्र ज्यावेळी आपण चारचौघात असतो किंवा एखाद्या मिटिंग, समारंभात असतो त्यावेळी जर जांभई आली तर आपली चांगलीच पंचाईत होते.
तसेच आपण एखाद्या व्यक्तीबरोबर गप्पा मारत असू आणि त्यावेळी आपल्याला जांभई आली तर त्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल चुकीचा समज निर्माण होतो. जर ती व्यक्ती अगदीच जवळची असेल तर 😍 मग आपली चांगलीच पंचाईत होते.
अशावेळी आपल्याला आम्ही देत असलेल्या टिप्सचा नक्कीच फायदा होईल. या टिप्सच्या मदतीने आपण जांभईवर मात करू शकतो.
सर्वप्रथम आपण जांभई येण्याची कारणे अभ्यासूया…
जांभई येण्याची कारणे । Causes of Yawn
- आपली झोप पूर्ण न झाल्याने
- शरीरात ऑक्सिजनची कमतरता असल्याने
- औषधे घेण्याने
- थकवा आल्यामुळे
- झोप येत असल्यास
- मेंदूच्या कार्यात बिघाड झाल्यास
- शरीराचे तापमान कमी झाल्यास
- मेंदूचे कार्य मंदावल्यानेही जांभई येते.
वरीलप्रमाणे जांभई येण्याची कारणे सांगता येतील.
आता आपण जांभईवर मात करण्यासाठी असलेल्या टिप्स जाणून घेऊया.
जांभईवर मात करण्यासाठी काही खास टिप्स । Tips to Overcome Yawn
- विनोदी व्हिडीओ किंवा कार्यक्रम पाहणे – जर आपल्याला जास्त प्रमाणात जांभई येत असेल तर आपण विनोदी व्हिडीओ किंवा एखादा विनोदी कार्यक्रम पहा. कारण हसण्याने जांभई येण्याचे प्रमाण कमी होते.
- थंड पाणी प्या – थंड पाणी प्यायल्यानेदेखील जांभई येण्याची तीव्रता कमी होते.
- दीर्घ श्वास घ्या – दीर्घ श्वास घेऊन त्यावर लक्ष केंद्रित करा. यामुळेही आपणास जांभई येण्याचे प्रमाण कमी होईल.
- आईस टी / आईस कॉफी – आईस टी किंवा आईस कॉफीचे सेवन केल्याने जांभईचे प्रमाण कमी करता येते.
- काही काळ एसीमध्ये बसा – जर आपल्याकडे एसी उपलब्ध असेल तर काही काळ एसीमध्ये बसा. असे केल्याने जांभई येण्याचे प्रमाण कमी होते.
तर या होत्या जांभईवरील काही टिप्स. या टिप्सचा वापर करून आपण जांभईवर मात करू शकतो. तसे पाहिले तर जांभई येणे हि एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे ती वारंवार दाबण्याचा प्रयत्न करू नका.
जर आपण अशा ठिकाणी असाल कि जेथे जांभई दिल्यावर आपल्याबद्दल लोकांच्या मनात गैरसमज निर्माण होतील, अशा वेळी आम्ही सांगितलेल्या टिप्सच्या मदतीने आपण जांभईवर मात करू शकाल.
आपल्याला हि माहिती कशी वाटली ते आम्हाला खाली कमेंट करून कळवा. अशाच दर्जेदार माहितीसाठी आमच्या www.Netmarathi.com या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्या.