Business Ideas in Marathi – जर आपण व्यवसाय करू इच्छित असाल तर आम्ही आपल्याला याठिकाणी कमीतकमी खर्चात सुरु करता येणारे काही व्यवसाय व त्याची माहिती दिली आहे. नक्की वाचा…
Business Ideas in Marathi
बहुतेक व्यक्तींचं हे स्वप्न असत कि आपलाही काहीतरी व्यवसाय असावा. कारण सध्या नोकरी मिळविणे हि खूपच अवघड बाब होऊन बसली आहे. काही जणांचे असेही म्हणणे असते कि, नोकरी करून म्हणावी तशी प्रगती करता येत नाही. काही अंशी हे खरेदेखील आहे.
![]() |
Business Ideas In Marathi |
कमी कालावधीत जास्त प्रगती जर करावयाची असेल तर व्यवसायाशिवाय पर्याय नाही, असे म्हटले तर ते काही चुकीचे ठरणार नाही.
व्यवसाय सुरु करण्याआधी सर्वच जणांना हा प्रश्न पडतो कि, कोणता व्यवसाय सुरु केलेला चांगला राहील? काही जण अगोदरच आपल्या व्यवसायाचे क्षेत्र निवडतात, मात्र बहुतेक लोक असे असतात कि त्यांना कोणता व्यवसाय सुरु करावा हेच मुळी समजत नाही. अशावेळी आपण गोंधळून जातो आणि आपल्या व्यवसाय सुरु करण्याच्या कल्पनांना तेथेच खरा सुरुंग लागतो.
स्वतःचा व्यवसाय सुरु करताना नेहमीच दोन समस्या आपल्यासमोर उभ्या ठाकलेल्या असतात, त्या म्हणजे,
- व्यवसायासंबंधी ज्ञान
- भांडवलाची कमी
जर आपल्यालाही व्यवसाय सुरु करावयाचा असेल तर आम्ही येथे आपल्यासाठी कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त नफा देणाऱ्या व्यवसायांबद्दल माहिती देणारच आहोत.
व्यवसाय सुरु करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेण्याची गरज असते. कारण काही बाबी समजून न घेता व्यवसाय सुरु केला तर त्यामध्ये नुकसानच होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे काही गोष्टींचे ज्ञान किंवा त्याबद्दलची माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे. त्या बाबी खाली दिलेल्या आहेत, व्यवसाय सुरु करण्यापूर्वी त्याचे काळजीपूर्वक अवलोकन करा…
- आपली व्यवसायातील आवड लक्षात घ्या.
- आपण ठरविलेल्या व्यवसायासंबंधी अधिक संशोधन करा.
- संबंधित व्यवसायातील आपल्या भक्कम बाजू आणि कमकुवत बाजू समजून घेऊन त्यावर काम करा.
- संबंधित व्यवसायाची भविष्यातील मागणी लक्षात घ्या.
- संबंधित व्यवसायासाठी किती भांडवल लागेल याची माहिती घ्या.
- व्यवसाय सुरु केल्यावर आपल्याला काय करायचे आहे व कधी करायचे आहे, ते ठरवून घ्या.
आता अधिक वेळ न दवडता ते कोणते व्यवसाय आहेत, कि जे अतिशय कमी खर्चात सुरु करता येईल ती माहिती जाणून घेऊया…
Table of Contents
चहा किंवा कॉफी शॉप
जर आपल्याला कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त नफा मिळवून देणारा व्यवसाय सुरु करावयाचा असेल तर सर्वात वरचा नंबर लागतो तो चहा किंवा कॉफी शॉपचा. कारण हा एक चांगला व्यवसाय आहे आणि यासाठी खूपच नाममात्र भांडवल गुंतवण्याची गरज असते.
![]() |
Small Business Ideas in Marathi |
आजकाल चहा व कॉफी हे सर्वच लोकांचे अति प्रिय पेय आहे. त्यामुळे ग्राहकांची संख्या हि लक्षणीय आहे. आपल्याला फक्त आपण देत असलेल्या सेवेची गुणवत्ता टिकवून ठेवावी लागेल, जेणेकरून आलेला प्रत्येक ग्राहक हा परत-परत आपल्याकडे येईल.
चहा किंवा कॉफी शॉपसाठी खूपच मोठे भांडवल लागेल असे नाही. चहा किंवा कॉफी शॉप हा खूपच कालबाह्य प्रकार आहे, असे तुम्ही मानत असाल तर ती तुमची मोठी चूक ठरेल. कारण सध्या बाजारात चहाचे सुद्धा नवनवीन प्रकार पहावयास मिळतात. त्याची किंमत हि ५ रुपयांपासून हजारो रुपयांपर्यंत असते. त्यामुळे कमी भांडवल गुंतवून जर आपल्याला जास्तीचा नफा देणारा व्यवसाय सुरु करावयाचा असेल तर आपण चहा किंवा कॉफी शॉप सुरु करावयास काहीही हरकत नाही.
केक शॉप्स
सध्या आपण बघतच असाल कि तरुण मंडळींबरोबरच विविध वर्गवारीतील व्यक्तींमध्ये केक कापून आनंद साजरा करण्याचे प्रमाण वाढतच आहे. मग त्यात वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, एखादी नवीन आनंददायी घटना, नवीन अचिव्हमेंट, पार्टी इ. ठिकाणी केक कापून आनंद साजरा करण्याचा ओघ दिवसेंदिवस वाढतच आहे.
![]() |
Laghu Udyog Ideas in Marathi |
जर त्याप्रमाणात विचार केला तर केक शॉप्सची संख्या हि मर्यादितच आहे. केक तयार करण्यासाठी काही विशेष खर्च येत नाही. आपण चांगल्या दर्जाच्या ओव्हनसह अतिशय कमी खर्चात केक तयार करून विकू शकतो व नफा प्राप्त करू शकतो.
जर आपण नाविन्यपूर्ण पद्धतीने केकची डिझाईन करून ग्राहकांना दिलीत तर ग्राहकदेखील खुश होईल आणि आपल्या व्यवसायाला एक नवसंजीवनी प्राप्त होईल. त्यामुळे कमी खर्चात केक शॉप्स सुरु करून आपण जास्तीत जास्त नफा प्राप्त करू शकता.
कार्यक्रम नियोजन (इव्हेंट मॅनेजमेंट)
जर आपल्याला व्यवस्थापनाचे थोडेसे ज्ञान असेल तर आपल्यासाठी कार्यक्रम नियोजन (इव्हेंट मॅनेजमेंट) हा व्यवसाय चांगलच फायदेशीर ठरू शकतो. कारण सध्या कोणतीही सभा, लग्न, कार्यक्रम इ. साठी व्यवस्थापनास सर्वोत्कृष्ट प्राधान्य दिले जाते. सध्या कोणत्याही कार्यक्रमासाठी त्याचे व्यवस्थित नियोजन करणाऱ्यांची मागणी वाढली आहे.
जर आपल्याला नेटवर्क मार्केटिंग, व्यवस्थापन इ. विषयात निपुणता असेल तर आपण हा व्यवसाय सुरु करण्यास काहीही हरकत नाही. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी अतिशय नाममात्र भांडवल उभारावे लागते, मात्र जर आपल्या नावाची चांगली इमेज तयार झाली तर या व्यवसायातून आपण लाखो रुपये कमवू शकता. त्यासाठी मात्र आपल्याला अनेक बाजू सांभाळाव्या लागतील कि ज्यासाठी खूप कष्ट करावे लागतील. तसेच आपण आपल्या व्यवसायाची जाहिरात करून अतिशय कमी लोकांसह हा व्यवसाय सुरु करू शकता.
युट्युब चॅनेल
युट्युब चॅनेलच्या माध्यमातून आपण अतिशय कमी गुंतवणूक करून खूपच चांगला नफा प्राप्त करू शकतो. आता तुम्ही म्हणाल कि हे खर आहे का? तर “हो, हे खर आहे…!”. त्यासाठी आम्ही उपलब्ध करून दिलेला लेख जरूर वाचा. त्याची लिंक आम्ही खाली उपलब्ध करून दिली आहे…
हे वाचा – युट्युब काय आहे व युट्युबची काही वैशिष्ट्ये…
जर आपण एखाद्या विषयात निपुण असाल, उदा. डान्स, कुकिंग, सौंदर्य टिप्स, तंत्रज्ञान, कला इ. तर आपण आपले एक युट्युब चॅनेल तयार करून त्याद्वारे भरपूर पैसा कमवू शकता.
त्यासाठी आपल्याकडे जास्त काही साधनांची आवश्यकता नाही. आपल्याकडे फक्त एक चांगला मोबाईल असणे आवश्यक आहे. (आजकाल प्रत्येकाकडेच चांगला मोबाईल असतोच. 😉) याद्वारे आपण आपली कला सादर करून त्याचे व्हिडिओ बनवून ते युट्युब चॅनेलवर अपलोड करू शकता. जर आपल्या व्हिडिओला लोकांचा प्रतिसाद मिळाला तर आपण युट्युब चॅनेलद्वारे खूप पैसा कमवू शकता.
त्यामुळे कमी खर्चात जास्तीचा नफा देणारा व्यवसाय म्हणून युट्युब चॅनेलकडे पाहता येईल.
चिप्स आणि वेफर्स
जर आपल्याला कमी खर्चात जास्तीचा नफा देणारा व्यवसाय सुरु करावयाचा असेल तर चिप्स आणि वेफर्स व्यवसाय आपल्यासाठी उपयोगी ठरू शकतो. कारण आजकाल चिप्स आणि वेफर्सला खूपच मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
![]() |
Business Ideas Marathi |
आपण बघितलेच असेल कि सिनेमागृहात, बसस्थानक, रेल्वेस्थानक, शाळा इ. ठिकाणी चिप्सला खूपच मोठी मागणी असते. आपण बटाटे, केळी, फणस इ. पासून खूपच खमंग पद्धतीने चिप्स बनवू शकतो. त्यासाठी खूपच महागडी उपकरणे खरेदी करण्याची आवश्यकता नाही. फक्त आपल्याला सेवा देताना स्वच्छता व चांगले दर्जेदार पॅकेजिंग उपलब्ध करून द्यावे लागेल, कि ज्याने ग्राहकांचे अंतिम समाधान होईल. त्यामुळे कमीत कमी खर्चात जास्त नफा देणारा चिप्स आणि वेफर्सचा व्यवसाय हा सुद्धा आपल्यासाठी एक चांगला पर्याय ठरेल.
तर मित्रांनो, आम्हाला खात्री आहे कि आपल्याला आम्ही दिलेली Business Ideas In Marathi हि माहिती आवडलीच असेल. आम्ही दिलेल्या माहितीने आपल्याला निश्चितच फायदा होईल. जर आपल्याला हि माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींना अवश्य शेअर करा.
आपल्या अजून काही शंका असतील किंवा काही प्रश्न असेल तर आपण आम्हाला खालील बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. अशाच प्रकारच्या दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी Netmarathi या वेबसाईटला भेट द्या.