नाताळ म्हणजेच ख्रिसमस सण का साजरा केला जातो? | Christmas Information in Marathi

Share :

Christmas Information in Marathi – तुम्हाला माहिती आहे का, नाताळ (Christmas) हा सण का साजरा करतात? जर नाही, तर हा लेख जरूर वाचा…

Christmas Information in Marathi

दरवर्षी 25 डिसेंबर रोजी नाताळ किंवा ख्रिसमस हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नाताळ हा सण ख्रिश्चन बांधवांचा वर्षातील सर्वात मोठा सण / उत्सव आहे. ख्रिश्चन बांधव दरवर्षी मोठ्या आनंदाने हा सण साजरा करत असतात. मात्र सर्वसामान्य व्यक्तीला हा प्रश्न नेहमीच पडत असतो कि, नाताळ किंवा ख्रिसमस हा सण का साजरा केला जातो? किंवा काय कारणे आहेत ख्रिसमस किंवा नाताळ हा सण साजरा करण्यामागे?

Christmas-Information-in-Marathi
Christmas Information in Marathi

जर आपल्यालाही हा प्रश्न पडला असेल आणि आपण या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत असाल तर आपण अगदी योग्य ठिकाणी आला आहात. आजच्या या लेखात आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत कि नाताळ हा सण का साजरा केला जातो?

Table of Contents

ख्रिसमस कधी साजरा केला जातो?

जसे कि आम्ही वर सांगितल्याप्रमाणे ख्रिसमस किंवा नाताळ हा सण दरवर्षी 25 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. यादिवशी ख्रिस्ती बांधव एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त करत असतात. काही ठिकाणी हा सण 6, 7 किंवा 19 जानेवारी यादिवशीही साजरा केला जातो. परंतु बहुतेक ठिकाणी हा सण 25 डिसेंबर रोजीच साजरा केला जातो. काही ठिकाणी हा सण मध्यरात्री तर काही ठिकाणी हा सण सायंकाळीदेखील साजरा केला जातो.

हे वाचाबॉक्सिंग डे टेस्ट मॅच म्हणजे काय? तुम्हाला आहे का माहित…

ख्रिसमस का साजरा करतात?

नाताळ हा सण ख्रिश्चन बांधवांचा वर्षातील सर्वात मोठा सण आहे. हा सण हे बांधव मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करत असतात. या दिवशी प्रभू येशू यांचा जन्म झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे हा दिवस ख्रिसमस किंवा नाताळच्या स्वरुपात साजरा केला जातो.

प्रभू येशू हे एक महान व्यक्ती होते. त्यांनी समाजाला प्रेम व मानवता या महान संकल्पनांची शिकवण दिली. त्यांनी संपूर्ण जगाला परस्परांशी प्रेमाने व सद्भावनेने राहण्याचा मोलाचा संदेश दिला.

ख्रिसमस किंवा नाताळ सण कसा साजरा केला जातो?

ख्रिसमस हा सण ख्रिश्चन बांधव मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करत असतात. यादिवशी लोक चर्चमध्ये जातात. कॅरॉल्सचे गायन करतात. एकमेकांना शुभ संदेशांच्या कार्डसची देवाण घेवाण करतात. यावेळी चर्चमध्ये मंगल कामनेचे प्रतिक म्हणून ख्रिसमस ट्री ची सजावट केली जाते. तसेच यादिवशी मिठाई व भेट वस्तूंचे वाटपही केले जाते.

हे वाचादिवाळी का साजरी करतात? काय आहे दिवाळी सणाचे महत्व…

तर मित्रांनो आम्हाला खात्री आहे कि आमच्या या लेखाने ख्रिसमस का साजरा करतात? (Christmas Information in Marathi) आपले नक्कीच समाधान झाले असेल. आमचा हा नेहमीच प्रयत्न असतो कि Netmarathi च्या वाचकांना दर्जेदार व उत्तम माहिती उपलब्ध करून देणे. जर आपल्याला हि माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींना अवश्य शेअर करा.

अशाच प्रकारच्या दर्जेदार व नवीन माहितीसाठी आमच्या www.Netmarathi.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.

FAQ’s –


ख्रिसमस हा सण कधी साजरा केला जातो?

ख्रिसमस हा सण दरवर्षी 25 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.

ख्रिसमस हा सण का साजरा करतात?

या दिवशी प्रभू येशू यांचा जन्म झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे हा दिवस ख्रिसमस किंवा नाताळच्या स्वरुपात साजरा केला जातो.

ख्रिसमस किंवा नाताळ सण कसा साजरा केला जातो?

चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करून तसेच एकमेकांना शुभेच्छा देऊन हा सण साजरा केला जातो.


Share :

Leave a Comment