दही खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहे का?

Share :

Dahi Khanyache Fayde – या लेखात आपण दही खाण्याचे काही जबरदस्त फायदे जाणून घेणार आहोत. जर आपण दही खात असाल तर नक्की वाचा…

Dahi Khanyache Fayde

दही हा असा पदार्थ आहे जो प्रत्येक घरात सहजासहजी तयार केला जाऊ शकतो. त्यासाठी विशेष काही करण्याची गरज नाही. आपल्या भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून दह्याला खूपच मोलाचे स्थान आहे.

आपण पाहतच असाल कि कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करावयाची असेल तर सर्वात अगोदर आपण दही व साखरेचे सेवन करतो. यामागे असे कारण सांगितले जाते कि जेव्हा कोणतेही कार्य सुरु करण्याअगोदर दह्याचे सेवन केले तर आपल्याला त्या कामात निश्चितच सफलता प्राप्त होते.

Dahi-Khanyache-Fayde
Dahi Khanyache Fayde

तसं पाहिलं तर दह्याचा प्रयोग हा प्रत्येक घरात होतच असतो. परंतु आपल्याला माहित आहे का, कि दह्यात भरपूर प्रमाणात पौष्टिक घटक समाविष्ट असतात. त्यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन बरोबरच इतर विविध घटकांचा समावेश होतो, ज्यामुळे आपल्या शरीराला खूपच फायदा होतो.

आम्ही खाली एक तक्ता देत आहोत. त्यामध्ये आम्ही 100 ग्रॅम दह्यात किती बहुमूल्य घटक असतात, त्याची माहिती दिली आहे, त्याचा जरूर अभ्यास करा.

100 ग्रॅम दह्यात असलेले घटक
घटकाचे नाव
प्रमाण
पाणी 89 %
प्रोटीन 03 %
फॅट 04 %
खनिज 01 %
कार्बोहायड्रेटस 03 %
कॅल्शियम 149 ml
लोह 0.2 ml
व्हिटामिन ए 102 unit
व्हिटामिन बी अल्प प्रमाण
व्हिटामिन सी 01 ml
कॅलरोफिक 60

पाहिलेत मित्रांनो, फक्त 100 ग्रॅम दह्यामध्ये इतके सारे घटक असतात, कि जे आपल्या शरीराला फायदेशीर ठरतात.

आजच्या या लेखात आपण दही खाण्याचे सर्व फायदे जाणून घेणार आहोत, कि जे आपल्यालाही माहित नसतील. चला तर मग सुरु करूया…

दही खाण्याचे फायदे | Dahi Khanyache Fayde

प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते

जर आपली प्रतिकारशक्ती कमी झाली असेल तर दही आपल्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते. सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे प्रतिकारशक्तीकडे विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. जर आपण रोज एक वाटी दही खाल्ले तर आपली प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे दह्याच्या सेवनाने आपली प्रकृती उत्तम राहण्यास मदत मिळते. हा एक दही खाण्याचा सर्वात मोठा फायदा सांगता येईल.

पोटाच्या विकारांपासून आराम

सध्याच्या धावपळीच्या युगात आपण शांतपणे जेवण करत नाही. त्याचा वाईट परिणाम आपल्या पोटावर होतो. मग त्यातून अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठतासारख्या समस्या निर्माण होतात. जर आपल्यालाही बद्धकोष्ठता, अपचन, गॅसेससारख्या समस्या असतील तर आपण निश्चितच दह्याचे सेवन केले पाहिजे. दह्याच्या सेवनाने आपल्याला नक्कीच आराम मिळेल.

लठ्ठपणा कमी करण्यास मदतगार

आपल्या सर्वाना हे माहितच असेल कि लठ्ठपणा हा त्याच्याबरोबर इतर अनेक समस्यांना आमंत्रण देत असतो. मग त्यामुळे मधुमेह, हृदयविकार, दम लागणे अशा समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. जर आपण वेळोवेळी दह्याचे सेवन केले तर दही आपल्या शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे आपल्या शरीरात अतिरिक्त चरबी जमा होत नाही. त्यामुळे हादेखील एक दही खाण्याचा फायदा सांगता येईल. तसेच वेळोवेळी दही खाल्याने ब्लड प्रेशर या समस्येपासुनही आपल्याला मुक्ती मिळू शकते.

उर्जायुक्त आहार

दही हा असा पदार्थ आहे जो प्रत्येक घरात अगदी आरामात मिळतो. त्यासाठी काही विशेष कष्ट करण्याची आवश्यकता नाही. दह्यामध्ये विविध पाचक घटक असतात जे आपल्या शरीराला उर्जा प्रदान करतात. त्यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन इ. घटकांचा समावेश होतो. त्यामुळेच आपल्या आहारात आपण उर्जायुक्त दह्याचा वापर करायलाच हवा.

शरीरासाठी फायदेशीर

आपल्या सर्वाना हे माहितच असेल कि दही हा आपल्या शरीराची उष्णता कमी करण्यास मदत करतो. जर आपल्या शरीराची उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली तर आपल्याला विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. जर आपण वेळोवेळी दही सेवन केले तर दही हे आपल्या शरीराची उष्णता मर्यादित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे नक्कीच आपल्याला फायदा होतो.

दात व हाडे यांसाठी फायदेशीर

दह्यामध्ये कॅल्शियम व इतर काही महात्वूर्ण घटक असतात. तसेच व्हिटामिन सी व व्हिटामिन डी हे घटकसुद्धा दह्यात असतात. या घटकांमुळे आपले दात व हाडे मजबूत होतात. त्यामुळे हादेखील दही खाण्याचा एक फायदा सांगता येईल.

तर मित्रांनो हे होते दही खाण्याचे काही फायदे. (Dahi Khanyache Fayde). आपल्याला हि माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. दही खाण्याचे खूप मोठे फायदे आहेत. अधिक माहितीसाठी व अधिक तपशीलासाठी आपण आपल्या आहारतज्ञाबरोबर जरूर चर्चा करा.

अशाच प्रकारच्या नवनवीन व दर्जेदार माहितीसाठी आपण वेळोवेळी आमच्या Netmarathi या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

महत्वपूर्ण सूचना
❝सदर लेख व त्यातील माहिती ही विविध माध्यमातून संशोधन करून केवळ आणि केवळ प्राथमिक माहितीसाठी उपलब्ध करून दिली आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. व्यावसायिक सल्ला (Professional Advice) म्हणून कोणीही या लेखांचा वापर करू नये. वाचकांनी कोणताही निर्णय किंवा उपचार घेण्याअगोदर त्या त्या क्षेत्रातील विशेषज्ञाचा सल्ला घ्यावा.❞

Share :

Leave a Comment