रागावर नियंत्रण कसे मिळवावे? How To Control Anger in Marathi

Share :

How To Control Anger in Marathi – या लेखात आपण रागावर नियंत्रण कसे मिळवावे? याच्या काही टिप्स जाणून घेणार आहोत, नक्की वाचा…

राग, संताप हि वाटते तितकी साधी बाब नक्कीच नाही. कारण रागाच्या भरात आपल्या हातून मोठा अनर्थही घडू शकतो. त्यामुळे रागावर नियंत्रण मिळविणे महत्वाचे ठरते. या लेखात आपण रागावर नियंत्रण कसे मिळवावे? याच्या काही टिप्स जाणून घेणार आहोत, नक्की वाचा…

How To Control Anger in Marathi

सध्याच्या धकाधकीच्या व धावपळीच्या युगात आपले अस्तित्व टिकविण्यासाठी नेहमीच आपली चढाओढ व जिकीरीचे प्रयत्न चाललेले असतात. आपणही हा अनुभव नक्कीच घेतला असेल. राग येणे किंवा क्रोध हि मानवी भावना आहे. ज्यावेळी आपल्या मनाविरुद्ध काही गोष्टी घडतात, त्यावेळी निश्चितच आपल्याला राग येतो. परंतु ज्यावेळी राग अनावर होतो, त्यावेळी खूप मोठमोठ्या समस्येला सामोरे जावे लागते.

आपण पहिलेच असेल कि अति संतापामुळे वर्षानुवर्षे सांभाळलेली नाती एका क्षणात तुटतात. कधी कधी रागामुळे स्वतःला सुद्धा शारीरिक, मानसिक त्रास होतच असतो.

How-To-Control-Anger-in-Marathi
How To Control Anger in Marathi

कधी कधी आपण रागाच्या भरात एखाद्या व्यक्तीचे मन दुखावतो, परंतु ज्यावेळी आपण काही वेळाने शांतपणे विचार करतो त्यावेळी आपल्याला असे जाणवते कि, मला त्या व्यक्तीस असे बोलायला नाही पाहिजे होते. परंतु कधी कधी या गोष्टीस खूपच उशीर झालेला असतो.

असे आपण नेहमीच म्हणतो कि, कधी कधी हाताने मारलेल्या खुणा भरून निघतात, परंतु जिभेने झालेल्या जखमा (दुसऱ्याला रागाच्या भरात वाईट बोलण्याची स्थिती) कधीच भरून येत नाहीत. या सर्व बाबींचा परिणाम नकारात्मक असतो.

आता आपल्या लक्षात आले असेलच कि, राग किंवा संताप हि बाब वाटते तितकी साधी किंवा सोपी नक्कीच नाही. रागाच्या भरात आपल्या हातून खूप मोठा अनर्थही घडू शकतो. त्यामुळे रागावर वेळीच नियंत्रण मिळविणे आपल्यासाठी फायद्याचे ठरू शकते. परंतु रागावर नियंत्रण मिळविणे हि वाटते तितकी सोपी बाब नक्कीच नाही. बहुतेक वेळा आपल्याला राग आवरण्यासाठी खूपच प्रयत्न करावे लागतात. परंतु त्यातही बहुतेक व्यक्तींना यश मिळत नाही.

आपण रागावर नियंत्रण मिळविण्यासाठीच्या काही टिप्स जरूर अभ्यासणार आहोत, परंतु तत्पूर्वी आपण राग येण्याची कारणे अभ्यासुया…

राग येण्याची कारणे / Causes of Anger in Marathi

अनेक वेळा काही गोष्टी या आपल्या हातात नसतात. त्यावर आपले नियंत्रण नसते, त्यामुळे आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडू लागल्या कि, आपला राग अनावर होतो. आपल्याला मग ती परिस्थिती खूपच असह्य वाटू लागते. राग येणे हि एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, परंतु राग येऊन रागावरील आपले नियंत्रण सुटणे यामागे इतरही काही कारणे असू शकतात. ती थोडक्यात खाली दिलेली आहेत, खालील दिलेल्या कारणाव्यतिरिक्त ही अनेक कारणे असू शकतात, मात्र येथे काही महत्वपूर्ण कारणांचा उल्लेख केला आहे.

  • मानसिक आजार – जर आपल्याला काही मानसिक त्रास असेल किंवा आपण डिप्रेशनमध्ये असाल तर आपल्याला राग येण्याची पातळी हि अत्युच्च असू शकते. या कारणामुळे एखाद्या क्षुल्लक कारणामुळे राग येऊ शकतो, आणि यावर नियंत्रण मिळविणे खूपच अवघड होऊन बसते.
  • व्यसन – जर आपल्याला धूम्रपान, मद्यपान आदींची सवय असेल तर या व्यक्तींमध्ये राग येण्याचे प्रमाण इतर व्यक्तींपेक्षा जास्त असते.
  • थायरॉईड – जर आपल्याला थायरॉईडसारखा आजार असेल तरीही राग येण्याचे प्रमाण हे जास्त असते.
  • तणावपूर्ण जीवन – सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. यामध्ये आपले अस्तित्व टिकविण्यासाठी आपल्याला जीवापाड मेहनत करावी लागते. त्यामुळे आपल्याला नेहमीच तणावपूर्ण जीवन जगावे लागते. नेहमीच तणावपूर्ण जीवन जगतानादेखील राग येण्याचे प्रमाण वाढते.
  • अहंकार – कधी कधी काही व्यक्तींमध्ये अहंकाराचे प्रमाण जास्तच असते. अशावेळी एखादी गोष्ट त्यांच्या मनासारखी झाली नाही तर त्या व्यक्तींमध्ये राग येण्याचे प्रमाण वाढते.

राग येण्याची काही कारणे हि वरीलप्रमाणे सांगता येईल.

आता आपण रागावर नियंत्रण कसे मिळवावे याच्या काही टिप्स अभासणार आहोत.

रागावर नियंत्रण कसे मिळवावे? How To Control Anger in Marathi

जसे कि वर सांगितल्याप्रमाणे राग येणे हि एक नैसर्गिक क्रिया आहे. परंतु प्रत्येक बारीकसारीक गोष्टीमुळे जर आपल्याला राग येत असेल तर ते काहीतरी धोक्याची निशाणी असू शकते. अशावेळी आपल्याला डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला आम्ही देतो.

परंतु कधी कधी राग येण हे सुद्धा आपल्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्याविषयी आम्ही वर माहिती सांगितलीच आहे. त्यामुळे रागावर नियंत्रण मिळविणे खूपच महत्वपूर्ण ठरते. अशाच काही टिप्स आम्ही खाली दिल्या आहेत, त्याचे जरूर अवलोकन करा.

1. शांतपणे विचार करा

जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा कोणतीही क्रिया करण्याअगोदर त्याचे परिणाम काय होतील याचा शांतपणे विचार करा. कारण आपला राग हा थोड्या काळासाठी असतो, मात्र त्याचे पडसाद हे दीर्घकाळापर्यंत उमटत असतात. त्यामुळे शक्यतो शांतपणे विचार करून कृती करा.

2. अंक किंवा अक्षरे मोजा

जेंव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपले रागावरील लक्ष कमी करण्यासाठी 1 ते 100 पर्यंत अंक मोजा किंवा इंग्रजी किंवा मराठी अक्षरे मोजा. त्यामुळे आपले रागावरील लक्ष कमी होऊन होणाऱ्या नुकसानीस आपल्याला टाळता येईल.

3. आवडते छंद जोपासा

आपल्याला राग येण्याचे प्रमाण जास्त असेल किंवा रागावर नियंत्रण ठेवणे आपल्याला अवघड जात असेल तर आपण एखादा आवडता छंद जोपासा. त्यात चित्र काढणे, रंगकाम करणे, लिखाण करणे, बागकाम करणे, संगीत ऐकणे, एखादे वाद्य वाजवणे, नृत्य करणे इ. छंद जोपासा.

4. रागाचे कारण शोधा

आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे जास्त राग येतो, त्याची कारणे शोधून त्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करा. जर आपण आपल्याल राग येण्याचे कारण शोधले तर त्यावर नियंत्रण मिळविणे किंवा त्यावर अधिक संशोधन करणे सोपे जाईल.

5. मोठा श्वास घ्या

जेव्हा आपल्याला राग येतो त्यावेळी आपण मोठा श्वास घ्या, त्यामुळे आपल्या मेंदूला जास्तीचा ऑक्सिजन पुरवठा होऊन आपल्याला थोडेसे रिलॅक्स वाटेल. आणि याचा परिणाम आपल्याला येणारा राग कुठच्या कुठे पळून जाईल.

6. थंड पाणी प्या

ज्यावेळी आपल्याला राग येतो त्यावेळी आपण थंड पाणी प्या. रागावर मात करण्यासाठी हा खूपच चांगला उपाय समजला जातो. पाणी प्यायल्याने आपण शांत होतो. आपल्याला थोडेसे प्रसन्न वाटू लागते. त्यामुळे रागाची तीव्रता कमी होऊन त्यापासून होणारे नुकसान आपण टाळू शकतो.

तर मित्रांनो, या काही टिप्स होत्या ज्याच्या मदतीने आपण आपल्या रागावर नियंत्रण मिळवू शकतो. (How To Control Anger in Marathi) जरी राग येणे हि नैसर्गिक क्रिया असली तरी अतिजास्त प्रमाणात राग येणे हि एखाद्या आजाराची सुरुवात असू शकते. अशावेळी आपण त्वरित एखाद्या तज्ञाकडे जाण्याचा सल्ला आम्ही देतो.

अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी वेळोवेळी आमच्या Netmarathi या वेबसाईटला भेट द्या.

महत्वपूर्ण सूचना
❝सदर लेख व त्यातील माहिती ही विविध माध्यमातून संशोधन करून केवळ आणि केवळ प्राथमिक माहितीसाठी उपलब्ध करून दिली आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. व्यावसायिक सल्ला (Professional Advice) म्हणून कोणीही या लेखांचा वापर करू नये. वाचकांनी कोणताही निर्णय किंवा उपचार घेण्याअगोदर त्या त्या क्षेत्रातील विशेषज्ञाचा सल्ला घ्यावा.❞

Share :

Leave a Comment