मराठी कोडी व त्याची उत्तरे – Marathi Kodi | Puzzles in Marathi

Share :

Marathi Kodi | Puzzles in Marathi – या लेखात आपण नवनवीन आणि मजेदार मराठी कोडी वाचणार आहोत. हे Marathi Puzzles वाचून नक्कीच आपल्या ज्ञानात भर पडेल.

Marathi Kodi | Puzzles in Marathi

नमस्कार, आज या लेखाच्या माध्यमातून आपण मराठी भाषेतून मजेदार व जबरदस्त कोडी सोडविण्याचा प्रयत्न करणार आहोत. या मराठी कोड्यांच्या सहाय्याने निश्चितच आपल्या सामान्य ज्ञानात भर पडेल. शक्यतो आपण उत्तर न बघताच त्या कोड्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आम्ही प्रत्येक कोड्याच्या खाली त्याचे उत्तर दिलेले आहे.

Puzzles-in-Marathi
Puzzles in Marathi

चला तर मग सुरु करूया…

Marathi Kodi

1. अशी कोणती जागा आहे,
जिकडे रस्ता आहे पण गाडी नाही,
जंगल आहे पण झाड नाही,
आणि शहर आहे पण पाणी नाही?

उत्तर – नकाशा 🗺

2. दात आहेत पण चावत नाही,
गुंता होतो काळ्या शेतात,
सगळे माझ्यावर सोपवतात.
सांगा पाहू मी कोण?

उत्तर – कंगवा

3. मी हिरवा आहे पण मी पान नाही.
मी अनुकरण करणारा आहे परंतु मी वानर नाही.
सांगा पाहू मी कोण?

उत्तर – पोपट 🦜

4. असे काय आहे ज्याचं येणं पण खराब आहे
आणि
ज्याचं जाणे पण खराब आहे?

उत्तर – डोळे

5. सांगा बर असे कोण आहे,
जे फाटते पण त्यातून आवाज येत नाही?

उत्तर – दूध

6. अशी कोणती गोष्ट आहे,
जिला माणूस लपवून चालतो,
पण स्त्रिया दाखवून चालतात?

उत्तर – पर्स 😉

7. जर रामराव हे काजलचे वडील आहे,
तर मग रामराव हे काजलच्या वडिलांचे काय आहे?

उत्तर – नाव

8. असे काय आहे जे,
तुम्ही झोपता तेव्हा ती सुद्धा झोपते
आणि
जेव्हा तुम्ही उठता तेव्हा ती सुद्धा उठते?

उत्तर – डोळ्याची पापणी

9. असे काय आहे जे पंखापेक्षा अधिक हलका आहे,
परंतु जगातील सर्वाधिक बलवान माणूस देखील
त्याला जास्त काळ रोखून धरू शकत नाही?

उत्तर – श्वास

10. एका रिकाम्या बॉक्स मध्ये आपण
किती सफरचंद ठेवू शकतो?

उत्तर – एक, कारण त्यानंतर बॉक्स रिकामा राहणार नाही.

11. अशी कोणती गोष्ट आहे,
जिला आपण कापतो, पिसतो आणि वाटतो सुद्धा
पण आपण खात नाही?

उत्तर – खेळायचे पत्ते

12. एक मुलगा 100 फुटाच्या शिडीवरून पडला.
पण त्याला काहीच दुखापत झाली नाही.
हे कसे शक्य झाले असेल?

उत्तर – तो पहिल्याच पायरीवर होता.

13. असे कोणते फळ आहे,
जे बाजारात विकले जात नाही?

उत्तर – मेहनतीचे फळ

14. एक मुलगा आणि एक अभियंता बाजार करण्यासाठी जातात.
तो मुलगा अभियंताचा मुलगा आहे, पण अभियंता त्या मुलाचे बाबा नाहीयेत.
हे कसे शक्य आहे?

उत्तर – त्या मुलाची आई अभियंता आहे.

15. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार
किंवा रविवार हे शब्द न वापरता
आपण सलग तीन दिवसांची नावे सांगू शकतो का?

उत्तर – हो. काल, आज आणि उद्या. 😛

16. असा कोण आहे,
जो आपली सगळी कामे हाताऐवजी नाकाने करतो?

उत्तर – हत्ती 🐘

17. एक माणूस आपल्या बायकोला मारतो
आणि तिच्या शरीराला झाडा-झुडुपात लपवतो.
दुसऱ्या दिवशी पोलिस त्या व्यक्तीला फोन करून सांगतात की,
त्याच्या बायकोची हत्या झाली आहे
आणि त्या व्यक्तीला लगेचच गुन्हा घडलेल्या घटनास्थळी येण्यास सांगतात.
तो माणूस घटनास्थळी पोहचताच पोलीस त्याला अटक करतात.
पोलीस त्या व्यक्तीला अटक का करतात?

उत्तर – त्या माणसाच्या बायकोचे शरीर ज्याठिकाणी लपवलेले असते,
त्याचा पत्ता पोलिसांनी त्या माणसाला सांगितलेला नसतो. 👮

18. आपण कोणत्या प्रकारचे टेबल खाऊ शकतो?

उत्तर – व्हेजिटेबल 😉

19. मुकुट याच्या डोक्यावर
जांभळा झगा अंगावर
काटे आहेत जरा सांभाळून
चवीने खातात मला भाजून
ओळखा पाहू मी कोण?

उत्तर –  वांगे

20. एका कोंबड्याने घराच्या छतावर एक अंडे दिले,
तर ते घराच्या कोणत्या बाजूला पडेल?

उत्तर – कोंबडा अंडे देत नाही, कोंबडी देते. 😂

हे वाचा : भारतातील प्रसिद्ध व्यक्तींची समाधी स्थळे

Marathi Puzzles

21. एका संगणकाच्या वर बॉम्ब आहे;
संगणकाभोवती हेअर ब्रश, चावी, फोन
आणि एक चहाचा कप आहे.
जर बॉम्बचा स्फोट झाला तर
सर्वप्रथम कोणत्या वस्तूचा नाश होईल?

उत्तर – बॉम्बचा

22. एका वडिलांनी आपल्या मुलाला एक वस्तू भेट दिली
आणि सांगितले कि जर तुला भूक लागली तर ती वस्तू खा,
तहान लागली तर पाणी पी
व थंडी वाजली तर ती वस्तू जाळून टाक.
तर मग वडिलांनी आपल्या मुलाला कोणती वस्तू भेट म्हणून दिली असेल?

उत्तर – नारळ 🥥

23. रामच्या वडिलांना एकूण चार मुले आहेत.
पहिल्या मुलाचे नाव – ABC
दुसऱ्या मुलाचे नाव – DEF
तिसऱ्या मुलाचे नाव – GHI
तर मग चौथ्या मुलाचे नाव काय?

उत्तर – राम

24. एकदा एका कैद्याला तुरुंगातून पळून जाण्याची मुभा दिली जाते,

परंतु त्यासाठी त्याला तीनपैकी एका खोलीतून प्रवेश करायचा असतो.

पहिल्या खोलीत भयंकर अशी आग आहे,
दुसऱ्या खोलीत विस्फोटक आहे,
कि ज्यांचा त्याच्या पाय ठेवण्याने भयानक स्फोट होऊ शकतो.

तिसऱ्या खोलीत एक सिंह आहे, कि ज्याने मागच्या तीन वर्षांत काहीही खाल्लेलं नाही.
तर त्या कैद्याने कोणत्या खोलीतून गेले पाहिजे?

उत्तर – तिसऱ्या खोलीतून.
कारण मागच्या तीन वर्षापासून काहीही न खाल्लेला सिंह जिवंतच नसेल. 😀

25. अशी कोणती जागा आहे
जिथे माणूस गरीब असो वा श्रीमंत,
दोघांना सुद्धा प्लेट घेऊन उभा राहावे लागते?

उत्तर – पाणी पुरी खाताना 😋

26. एकदा एक माणूस रस्त्यावरून चालत असताना अचानक पाउस सुरु झाला.
तो माणूस छत्री आणायचे विसरला होता, तसेच त्याच्याकडे कोणतीही टोपी नव्हती.
त्याचे सर्व कपडे ओले झाले, मात्र डोक्यावरील एकही केस ओला झाला नाही.
असे का?

उत्तर – त्या माणसाच्या डोक्यावर केसच नव्हते.

27. अशी कोणती गोष्ट आहे जी सगळी मुले खातात,
पण मुलांना ते आवडत नाही?

उत्तर –  पालकांचा मार

28. अशी कोणती गोष्ट आहे जी नेहमीच वाढत जाते
परंतु कधीही कमी होत नाही?

उत्तर – वय

29. अशी कोणती गोष्ट आहे,
जिला वापरण्याआधी तोडावे लागते?

उत्तर – अंड 🥚

30. थांबून वाजते पण घड्याळ नाही,
बारीक लांब पण काठी नाही,
दोन तोंडची पण साप नाही,
श्वास घेते पण तुम्ही नाही?

उत्तर –  बासरी

31. असं काय आहे ज्याचा रंग काळा आहे,
ते उजेडात दिसते
परंतु
अंधारात दिसत नाही…?

उत्तर – सावली

32. असं काय असत,
जे मे मध्ये असत, पण
नोव्हेंबर मध्ये नसत…
आगीत असत पण
पाण्यात नसत…?

उत्तर – गर्मी

33. हे नेहमी पुढे असते,
कधीच मागे नसते…?

उत्तर – आपले भविष्य

34. एक माकड, एक खार आणि एक पोपट
आंब्याच्या झाडाकडे जोरात धावत असतात,
तर मग कोण त्या झाडावरील पेरू सर्वप्रथम खाईल…?

उत्तर – आंब्याच्या झाडाला पेरू येणार नाहीत. 😉

35. अशी कोणती इमारत आहे,
ज्यामध्ये तुम्ही प्रवेश करत नाही,
तरीदेखील तुम्ही त्यातून बाहेर पडता…?

उत्तर – ज्याठिकाणी तुम्ही जन्माला येतात ती इमारत

36. असे काय आहे, जे पाणी पिल्याने नष्ट होते…?

उत्तर – तहान

37. असं काय आहे, जे कितीही पाऊस आला,
तरी भिजत नाही…?

उत्तर – पाणी

38. असं काय आहे, जिच्या डोळ्यात बोट
टाकली तर ती तोंड उघडते…?

उत्तर – कात्री

39. कोणत्या महिन्यात लोक सर्वात कमी झोपतात…?

उत्तर – फेब्रुवारी

40. पंख नाही तरीही उडतो,
हात नाही तरीही भांडतो…
ओळखा पाहू मी कोण…?

उत्तर – पतंग

हे वाचा : असे कोणते फळ आहे जे बाजारात विकले जात नाही?

Latest Marathi Riddles with Answers

41. एका माणसाचे चार अक्षरी नाव काय?
ज्याचे पहिले व दुसरे अक्षर म्हणजे त्याच्या बायकोचे नाव.
दुसरे व तिसरे अक्षर म्हणजे त्याच्या मुलीचे नाव.
तिसरे व चौथे अक्षर म्हणजे त्याच्या मुलाचे नाव.
व चारही अक्षर म्हणजे त्याचे नाव.
सांगा पाहु ते नाव?

उत्तर – सीताराम

42. एक-मजली घर आहे जेथे सर्वकाही गुलाबी रंगाचे आहे:
गुलाबी भिंती, गुलाबी दरवाजे, गुलाबी छत,
गुलाबी खिडक्या, गुलाबी पडदे, गुलाबी खुर्च्या आणि गुलाबी टेबल.
मग सांगा, त्या घरातील पायऱ्या कोणत्या रंगाचे असतील?

उत्तर – कोणत्याही रंगाचे नाही कारण हे एक-मजली घर आहे!

43. माझे वजन काहीही नाही, तरीही आपण मला पाहू शकता.
जर आपण मला बादलीमध्ये ठेवले तर
मी बादलीला अधिक हलके करू शकतो.
ओळखा पाहू मी काय आहे?

उत्तर – एक छिद्र

44. आपल्या डाव्या हातामध्ये आपण जे ठेवू शकता
ते आपल्या उजव्या हातावर कधीही ठेवू शकत नाही.
ओळखा काय ते?

उत्तर – आपला उजवा हात

45. मी एका टेकडीच्या शिखरावर उभा राहिलो
आणि दोन घरांच्या दरम्यान मोठ्याने घंटा वाजविले.
कोणते घर प्रथम घंटा ऐकेल?

उत्तर – दोन्हीही घरे ऐकू शकत नाहीत,
कारण घरांना कान नसतात.

46. एका इमारतीच्या २५ व्या मजल्यावरील एक माणूस
खिडकी स्वच्छ करीत आहे.
अचानक त्याचा तोल जातो आणि तो पडतो.
पण त्याला दुखापत होत नाही.
हे कसे शक्य आहे?

उत्तर – कारण तो इमारतीच्या आतून खिडक्या स्वच्छ करीत आहे.

47. सात अक्षरी जिल्हा महाराष्ट्रात
ना असे काना नावात
ना असे मात्रा नावात
ना असे नी वेलांटी नावात
नांव सांगा त्याचे ?

उत्तर अहमदनगर

48. चार खंडाचा आहे एक शहर
चार आड विना पाण्याचे
18 चोर आहेत त्या शहरात
एक राणी आणि एक शिपाई
मारून सर्वांना त्या आडात टाकी
ओळख पाहू मी कोण

उत्तर – कॅरम

49. गोष्ट आहे मी अशी
मला घेता तुम्ही खाण्यासाठी
मात्र मला तुम्ही खात नाही
सांगा पाहू मी कोण ?

उत्तर – ताट

50. दिवसा झोप काढुनी मी
फिरतो बाहेर रात्रीला मी
आहे असा प्रवासी मी
पाठीला दिवा बांधून मी
कोण आहे मी ?

उत्तर – काजवा

51. पाच अक्षराचा एक पदार्थ
पहिल्या तीन अक्षराचे होते फुलाचे नाव
पाचवे आणि चौथे अक्षराचा अर्थ मौज
पहिल्या दुसऱ्या आणि शेवटच्या अक्षराचा अर्थ नोकर
सांगा पाहू मी कोण?

उत्तर :- गुलाबजाम

52. एका माणसाला बारा मुले
काही छोटी काही मोठी
काही तापट तर काही थंड
ओळखा पाहू मी कोण?

उत्तर – वर्ष

53. कोकणातून आली एक नार
आहे तिचा पदर हिरवागार
आहे तिचा कंबरेला पोर
सांगा मी आहे तरी कोण

उत्तर – काजू

54. माझ्याकडे बऱ्याच Keys आहेत
तरीही मी कोणते कुलूप उघडू शकत नाही
सांगा मी आहे कोण

उत्तर – कीबोर्ड

55. अशी कोणती गोष्ट आहे
पती आपल्या पत्नीला देऊ शकतो?
परंतु पत्नी आपल्या पतीला देऊ शकत नाही.
उत्तर – आडनाव

56. मी आहे तरी कोण
तिच्या डोळ्यात बोटे टाकली की
माझं तोंड उघडते

उत्तर – कात्री

57. प्रश्न असा की उत्तर काय?

उत्तर – दिशा

58. हिरव्या पेटीत बंद मी
काट्यात मी पडलेली
उघडून पहा मला
मी आहे मोत्याने भरलेली

उत्तर – भेंडी

59. बारा जण आहेत जेवायला
एक जण आहे वाढायला
ओळखा पाहू मी कोण?

उत्तर – घड्याळ

60. पाय नाहीत मला
चाके नाहीत मला
तरी मी खूप चालतो
काही खात नाही मी
फक्त रंगीत पाणी पितो
ओळखा पाहू मी कोण

उत्तर – पेन

हे वाचा : काही गमतीदार तथ्य, जे ऐकून आपला त्यावर विश्वास बसणार नाही…

Marathi Kodi | Puzzles in Marathi

तर मित्रांनो, आपल्याला हे मराठी कोडी कसे वाटले ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. जर आपल्याला हि माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींना अवश्य शेअर करा. आम्हाला आशा आहे कि, आमच्या या माहितीने आपल्या ज्ञानात नक्कीच भर पडेल.

अशाच प्रकारच्या नवनवीन व दर्जेदार माहितीसाठी आपण वेळोवेळी आमच्या Netmarathi या वेबसाईटला अवश्य भेट द्या.


Share :

Leave a Comment