नुकतीच भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला मेलबर्न येथे सुरुवात झाली आहे. मात्र हा कसोटी सामना त्याला देण्यात आलेल्या नावाने चांगलाच चर्चेत आला आहे. आपल्या सर्वाना हे माहितच असेल कि, मेलबर्न येथे सुरु झालेल्या या कसोटी सामन्याला "बॉक्सिंग डे टेस्ट मॅच" असे देखील संबोधले गेले.
आता सर्वांनाच हा प्रश्न पडला कि नेमके "बॉक्सिंग डे टेस्ट मॅच" म्हणजे काय? असे काय कारण असेल या कसोटी सामन्याला "बॉक्सिंग डे टेस्ट मॅच" असे नाव देण्याचे. जर आपल्यालाही हा प्रश्न पडला असेल तर आम्ही कशाला आहोत? आजच्या या लेखात आम्ही आपल्या या प्रश्नांचे निराकरण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. चला तर मग सुरु करूया आजच्या लेखाला...
ज्या ज्या वेळी बॉक्सिंग डे कसोटी सामन्याची चर्चा होते, त्यावेळी प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो कि हे "बॉक्सिंग डे टेस्ट मॅच" प्रकरण आहे तरी काय? अन्य टेस्ट मॅच आणि बॉक्सिंग डे टेस्ट मॅच यामध्ये काय फरक असतो? असे एक ना अनेक प्रश्न सर्वांच्याच मनात निर्माण होतात.
बॉक्सिंग डे टेस्ट मॅच म्हणजे काय?
जगभरात अनेक देशात ख्रिसमस म्हणजेच नाताळच्या दुसऱ्या दिवसाला (26 डिसेंबर) बॉक्सिंग डे असे म्हणतात. त्यादिवशी मेलबर्नमध्ये कसोटी सामन्याची सुरुवात केली जाते. म्हणूनच त्या कसोटीला 'बॉक्सिंग डे कसोटी सामना' असे संबोधले जाते. तसं बघितले तर बॉक्सिंग या खेळाचा व बॉक्सिंग डेचा काहीही संबंध नाही. बॉक्सिंग डे कसोटी सामना फक्त मेलबर्नच्याच मैदानावर खेळवला जातो, हे विशेष...! "बॉक्सिंग डे टेस्ट मॅच" ची सुरुवात इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांत 1913 मध्ये जोहान्सबर्ग येथे झाली होती.
बॉक्सिंग डे साजरा करण्यामागचे कारण
असे मानले जाते कि ख्रिसमस हा सण उत्साही व आनंदमय वातावरणात साजरा करण्यासाठी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्याना मिठाईचे मोठमोठे बॉक्स किंवा अन्य भेटवस्तू देत असतात. हे देताना ते एखाद्या बॉक्समध्ये देतात. त्यामुळेच 26 डिसेंबर हा दिवस "बॉक्सिंग डे" दिवस म्हणून साजरा केला जातो.
सर्वसाधारणपणे ख्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्त बहुतेक ठिकाणी याकाळात सुट्टी असते. त्यामुळे लोक एन्जॉय करण्यासाठी घराबाहेत पडतात. यावेळी सगळीकडे आनंदी वातावरण असते. त्यामुळे क्रिकेट सामना बघण्यासाठी येणाऱ्यांची संख्यासुद्धा जास्त असते. याचेच औचित्य साधून मेलबर्न या ठिकाणी ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 26 डिसेंबरला क्रिकेट सामना खेळवला जातो, या सामन्यालाच "बॉक्सिंग डे कसोटी सामना" असे संबोधले जाते.
जगभरात भरपूर ठिकाणी "बॉक्सिंग डे" हा दिवस ‘स्टीफन डे’म्हणूनही ओळखला जातो. कॅटलोनिया, आयर्लंड आणि स्पेन येथे हा दिवस 'सेंट स्टीफन डे' म्हणून साजरा केला जातो.
तर मित्रांनो, आम्हाला आशा आहे कि आता आपल्याला समजलेच असेल कि, बॉक्सिंग डे टेस्ट मॅच म्हणजे काय? जर आपल्या अजून काही शंका असतील तर खालील कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करू शकता. आम्ही त्याचे नक्की निराकरण करू.
जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींना अवश्य शेअर करा. अशाच प्रकारच्या नवीनतम व दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी आमच्या www.Netmarathi.com या वेबसाईटला भेट द्या.
टिप्पणी पोस्ट करा
आपला अभिप्राय (Comment) येथे नोंदवा. आपल्या अभिप्रायांचे स्वागतच आहे...*