विमानाचा रंग हा पांढरा का असतो? Why Color of Airplane is White

Share :

Why Color of Airplane is White – When you see a plane You may be wondering why this is white. Here is the answer to your question.

आपण आकाशात किंवा विमानतळ, टीव्ही इ. ठिकाणी नेहमीच विमान पाहत असतो. आपण पाहिलेल्या विमानांपैकी जवळपास काही अपवाद वगळता सर्वच विमाने हि पांढऱ्या रंगाची असतात. अशावेळी आपल्या मनात हा विचार नक्कीच आला असेल कि विमाने हि नेहमी पांढऱ्या रंगाचीच का असतात? यामागे काय कारणे असू शकतात? असा विचार हमखास प्रत्येक व्यक्तीच्या मनात नक्की आलाच असेल…

Why-Color-of-Airplane-is-White

आज या लेखाच्या माध्यमातून आपल्या या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊया कि नेमके काय कारण असेल कि विमानांचा रंग हा पांढराच असतो.

हे देखील वाचा – पावसात DTH Set Top Box बंद पडण्यामागील कारण तुम्हाला माहित आहे का?

1. सूर्यप्रकाश परावर्तीत करण्यासाठी 

पांढरा रंग हा उष्णतेचा सर्वोत्तम परावर्तक आहे. आपणही हा अनुभव घेतलाच असेल कि, ज्यावेळी आपण उन्हात विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात काळ्या रंगाचे कपडे परिधान करतो, त्यावेळी आपल्याला जास्तच गरम जाणवते व त्याच जागी जर आपण पांढऱ्या रंगाचे कपडे घातले तर आपल्याला उन्हाचा जास्त त्रास होत नाही.

त्यामुळेच विमानाचे तापमान मर्यादित ठेवण्यासाठी विमानाला पांढरा रंग दिला जातो. कारण इतर रंग दिला तर सूर्यप्रकाश परावर्तित होणार नाही. याचा विमानातील अंतर्गत यंत्रणेवर वाईट परिणाम होऊ शकतो. हेच लक्षात घेऊन विमानाला शक्यतो पांढराच रंग दिला जातो.

2. कमी खर्चिक 

पांढरा रंग हा इतर रंगांच्या तुलनेत खूपच स्वस्त असतो. साधारणतः एका विमानास रंग देण्यासाठी लाखो रुपये खर्च येतो. जर इतर रंग द्यायचा झाल्यास या खर्चात भरमसाठ वाढ होऊ शकते. याचाच विचार करून कमी खर्च होण्यासाठी विमान कंपन्या पांढऱ्या रंगाचा वापर करतात असे सांगितले जाते.

3. यंत्रणेतील बिघाड दर्शविण्यासाठी

पांढऱ्या रंगामुळे विमानामध्ये झालेली खराबी किंवा ऑईल गळतीचे प्रकार लवकर लक्षात येतात. याच जागेवर दुसरा कलर असेल तर हि बाब लवकर लक्षात येणार नाही. विमानाच्या यंत्रणेतील एक छोटासा बिघाडसुद्धा खूप मोठी हानी करू शकतो, म्हणून ऑईल गळतीचे प्रकार, एखादा क्रॅक लवकर लक्षात येण्यासाठी विमानासाठी पांढरा रंग वापरला जातो.

4. लवकर फिका पडत नाही

विमानास नेहमीच वेगवेगळ्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. कधी कडक ऊन, कधी जोरदार वारा, कधी पाउस, बाह्य वातावरण अशा परिस्थितीत विमान नेहमीच असते. अशावेळी इतर रंग लवकर फिके होतात, मात्र याउलट पांढरा रंग हा लवकर फिका होत नाही. त्यामुळे विमान कंपन्यांचा विमानाच्या रंगरंगोटीवरील खर्च वाचतो. हे देखील विमानाच्या पांढऱ्या रंगामागचे कारण सांगितले जाते.

तर मित्रांनो आता आपल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळाले असेल कि विमानाचा रंग हा पांढरा का असतो? (Why Color of Airplane is White) आता जेंव्हा तुम्हाला कधी विमानात बसण्याची संधी मिळेल तेंव्हा हे लक्षात असू द्या कि विमानाचा रंग पांढरा का असतो?

हे देखील वाचा – मोबाईलच्या बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे? काही टिप्स

जर आपल्याला हि माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींना अवश्य शेअर करा. तसेच अशा नाविन्यपूर्ण व दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी आमच्या www.Netmarathi.com या वेबसाईटला भेट द्या.


Share :

Leave a Comment