लग्न हे माणसाच्या जीवनातील अतिशय महत्वाचा क्षण आहे. लग्नाचे बंधन प्रत्येक व्यक्तीला हवेहवेसे असते. लग्न म्हणजे एका नवीन जीवनाच्या प्रवासाची सुरुवात असते, मग तो मुलगा असो किंवा मुलगी. प्रत्येक जण या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतो. लग्न झाल्यावर मुलगा असो कि मुलगी, त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते.
त्यामुळे लग्न करताना बहुतेक तरुणांची हि इच्छा असते कि, मला साजेशी लाईफ पार्टनर मिळाली तर खूप चांगले होईल? कारण प्रत्येक तरुणाला नवे घर, नवी नाती सांभाळून घेणारी अशी लाईफ पार्टनर हवी असते.
आपल्या सामाजिक जीवनात लग्न हि खूपच मोठी जबाबदारी मानली गेली आहे. त्यामुळे अरेंज मॅरेज करताना प्रत्येक तरुणाच्या मनात हाच प्रश्न असतो, कि मी मुलीला असे कोणते प्रश्न विचारू? जेणेकरून 5 मिनिटांच्या चर्चेतच मला समोरील मुलीचा स्वभाव माहिती पडेल.
मुलीला प्रश्न विचारण्यात काहीही वावगे नाही. कारण मुलगा असो किंवा मुलगी, दोघांनाही त्यांचे संपूर्ण आयुष्य एकमेकांबरोबर व्यतीत करायचे असते, त्यामुळे एकमेकांच्या स्वभावाची ओळख जर लग्नाअगोदरच झाली तर भविष्यात येणाऱ्या समस्या वेळीच टाळता येईल.
एखाद्या व्यक्तीबरोबर फक्त थोडा वेळ केलेल्या चर्चेतून आपल्याला त्या व्यक्तीचा स्वभाव माहिती पडेल का? याबाबत बहुतेक जण साशंक असतील. परंतु आम्ही याठिकाणी असे काही प्रश्न सांगणार आहोत, कि ज्याच्या मदतीने आपण एका निर्णयाप्रत येऊन पोहचाल.
तर ते कोणते प्रश्न आहेत कि जे प्रत्येक मुलाने आपल्या होणाऱ्या लाईफ पार्टनरला नक्की विचारायला हवे, चला ते जाणून घेऊया.
करिअर
बहुतेक मुलींना स्वतःचे करिअर करावयाचे असते, त्यामुळे त्या लग्नाला टाळाटाळ करत असतात. त्यामुळे तुम्ही त्यांना करिअरबद्दल प्रश्न विचारू शकता. तुम्ही मुलीला विचारू शकता कि, लग्न झाल्यावर तिला जॉब करायचा आहे का? कशा प्रकारच्या जॉबमध्ये तिला स्वारस्य आहे? जर लग्नानंतर तिने जॉब करण्यावर तुमची कुठलीही हरकत नसेल, तर तुम्ही तिला तसे सांगू शकता. तुम्ही तिच्या करिअरविषयी अधिक माहिती जाणून घेऊ शकता. यावरून तुम्हाला तिचे दूरगामी विचार, ध्येय, दृष्टीकोन समजण्यास मदत होईल.
अपेक्षा
तुमच्याकडून तिला काय अपेक्षा आहेत? आणि तुम्हाला तिच्याकडून काय अपेक्षा आहेत? हे तुम्ही विचारू शकता. कारण यामुळे तुम्हा दोघांना एकमेकांबद्दल अधिक जाणून घेण्याची संधी प्राप्त होईल. लग्न झाल्यावर प्रत्येक मुलीला आपल्या जोडीदाराकडून काही ना काही अपेक्षा असते आणि मुलालादेखील मुलीकडून काही अपेक्षा असतात, त्यामुळे जर तुम्ही तिची अपेक्षा काय आहे, हे अगोदरच जाणून घेतले तर त्यादृष्टीने तुम्हाला विचार करता येईल.
आहार
सर्वात महत्वाचा असलेला असा हा प्रश्न आहे. कधी कधी मुलगा मांसाहारी असतो, परंतु मुलगी शाकाहारी असते. अशावेळी तुम्ही तिला याची पूर्वकल्पना देऊ शकता. याबद्दल तिला काही आक्षेप आहे का? हे देखील तुम्ही तिला विचारू शकता. कारण लग्न झाल्यावर जर आपल्याला मांसाहारी भोजन करण्याची इच्छा झाली तर तिची यावर काही हरकत असेल का? हे देखील तुम्ही विचारू शकता. तसेच जर एखादा मुलगा शाकाहारी असेल आणि मुलगी मांसाहारी असेल तर तुम्ही याबाबतही प्रश्न विचारू शकता.
आई-वडिलांविषयी विचार
प्रत्येक मुलीला आपल्या आई-वडिलांची खूपच काळजी असते. त्यामुळे आपण तिला हा प्रश्न विचारू शकता कि लग्न झाल्यावर तुझ्या आई-वडिलांची काळजी कोण घेईल? तसेच तुमच्या आई-वडिलांविषयी तिच्या काय भावना आहेत, हे हि आपण जाणून घ्या. जेणेकरून भविष्यात आपल्याला काही समस्या उद्भवणार नाही.
तर मित्रांनो, हे होते ते काही प्रश्न जे तुम्ही तुमच्या होणाऱ्या जोडीदाराला विचारू शकता. लग्न करणे हि खूपच मोठी जबाबदारी मानली जाते. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याअगोदर योग्य विचार करणे योग्य ठरते. वर दिलेल्या प्रश्नातून थेट एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाचा थांगपत्ता लागेल असे आम्ही म्हणणं थोडेसं धाडसाचं ठरेल, मात्र आपल्याला एक अंदाज घेण्यासाठी हे प्रश्न महत्वाचे ठरू शकतात.
जर आपल्याला वाटत असेल कि अजूनही काही प्रश्न आहेत कि जे महत्वाचे आहेत, तर ते तुम्ही खाली कमेंट करून आम्हाला कळवू शकता. आम्ही त्याचा इथे जरूर उल्लेख करू.
हा लेख जर आपल्याला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रीणींना, नातेवाईकांना अवश्य शेअर करा. अशाच दर्जेदार व इंटरेस्टिंग माहितीसाठी वेळोवेळी आमच्या www.Netmarathi.com या वेबसाईटला भेट द्या.
टिप्पणी पोस्ट करा
आपला अभिप्राय (Comment) येथे नोंदवा. आपल्या अभिप्रायांचे स्वागतच आहे...*