तीळ खाताय…! जाणून घ्या तीळ खाण्याचे फायदे…

Share :

Benefits of Til in Marathi – In this article we will learn about Benefits of Eating Sesame Seeds. If you Eat Sesame, then you must Read this Article.

आपल्याकडे प्रत्येक घरात तीळ वापरला जातो. तीळ हा पदार्थ सहजासहजी उपलब्ध होणारा असा आहे. तिळाचे सेवन करणे आपल्या प्रकृतीसाठी अतिशय फायदेशीर ठरत असते. आयुर्वेदानुसार, तीळ हा पदार्थ बलवर्धक मानला जातो. आयुर्वेदात तिळाचं महत्व विषद केलेले आहे. या छोट्याश्या दिसणाऱ्या तिळात अनेक पौष्टिक घटक असतात. जे आपल्या शरीराला विविध महत्वाचे घटक प्रदान करतात.

Benefits of Til in Marathi

तीळ खाण्याचे फायदे…

मकर संक्रांति या सणाच्या दिवशी तिळाला खूपच महत्वाचे स्थान प्राप्त झालेले आपल्याला दिसून येते. यादिवशी हमखासपणे तिळाचे सेवन केले जाते. इतर वेळेस जरी तीळ खाण्याचे प्रमाण कमी असले तरी थंडीच्या दिवसात तिळाला मोठे महत्व प्राप्त होते.

अशा या तिळाचे खूप मोठे मोठे फायदे सांगता येतील. ते खालीलप्रमाणे…

लोहाच्या अभिशोषणास मदत

तिळात लोह व कॉपर हे घटक मोठ्या प्रमाणात असतात. ते आपल्या शरीरातील लोहाचे अभिशोषण करण्यास मदत करतात. तीळ हे संधिवातासारख्या आजारांवर अतिशय उपयुक्त ठरते. तसेच तिळाच्या तेलाने मसाज केल्यास संधिवात असलेल्या व्यक्तींना आराम पडतो.

हाडांसाठी उपयुक्त

तिळात कॅल्शियम हा घटक मोठ्या प्रमाणात असतो. याशिवाय तिळात मँगनीज, लोह, फॉस्फरस, ब गटातील जीवनसत्त्वे आणि तंतुमय पदार्थ यांचे अस्तित्वदेखील असते. आपल्या सर्वाना हे माहितच असेल कि हाडांच्या पोषणासाठी कॅल्शियम हा घटक महत्वाची भूमिका पार पाडतो. तसेच तिळात असलेला झिंक हा घटक आपल्या हाडांचा ठिसूळपणा दूर करण्यास मदत करतो. त्यामुळे तीळ हा घटक आपल्या हाडांच्या पोषणासाठी व बळकटीसाठी अतिशय उपयुक्त आहे.

मधुमेह व उच्च रक्तदाब यावर गुणकारी

तिळात मोठ्या प्रमाणात फायबर आणि इतर उपयोगी घटक असतात, जे इन्सुलिन आणि ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे ज्या व्यक्तींना मधुमेहाचा त्रास आहे, त्यांच्यासाठी तीळ हे वरदानच ठरतात. तसेच ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांच्यासाठीही तीळ हे फायदेशीर ठरतात. आहारात तिळाचा समावेश करून उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून मुक्ती मिळू शकते, हे बऱ्याच संशोधनातून सिध्द झाले आहे.

थंडीपासून शरीराचे रक्षण

आपल्या भारतीय संस्कृतीत तिळाला अतिशय महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. आपल्याकडे मकर संक्रांतीला आवर्जून तिळाचे सेवन केले जाते, हे आपल्याला माहिती असेलच. तीळ हे उष्ण असतात, त्यामुळे थंडीपासून आपल्या शरीराचे रक्षण करण्याचे बहुमूल्य कार्य तीळ करत असतात. त्यामुळेच मकर संक्रांतीला तिळगुळ खाण्याची परंपरा पूर्वीपासून आपल्याकडे चालत आलेली आहे. ज्यांना थंडीचा अति जास्त प्रमाणात त्रास होतो त्यांनी तर थंडीत अवश्य तिळाचे सेवन केले पाहिजे.

हृदय बळकटीकरण करण्यास उपयुक्त

तिळाचे सेवन केल्यास आपल्या हृदयाला त्याचा मोठा फायदा होतो. कारण तिळात असणारे अगणित पौष्टिक घटक हृदय बळकट करण्यास मदत करतात. त्यामुळे जर एखाद्याला हृदयरोग असेल तर तीळ खाण्यास हरकत नाही. तीळ खाल्ल्याने कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित राखण्यास मदत मिळते. तोदेखील तिळाचा एक फायदा आपल्याला सांगता येईल.

चांगली झोप येण्यास उपयुक्त

हिवाळ्यामध्ये तिळाचे सेवन केल्यास शरीरात उर्जा संक्रमित होते. तसेच तिळाच्या तेलाने मालिश केल्यास चांगली झोप येते. त्यामुळे आपल्याला चांगला आराम मिळून आपल्या शरीराला त्याचे फायदे मिळतात.

दातांसाठी फायदेशीर

तीळ हे दातांसाठी अतिशय फायदेशीर ठरतात. कारण तिळात कॅल्शियम हा घटक असतो. तो आपल्या दाताना बळकटी प्रदान करण्यास मदत करतो. रोज सकाळी आणि संध्याकाळी ब्रश केल्यावर थोडेसे तीळ चावले तर त्यामुळे दात मजबूत होण्यास मदत मिळते.

मानसिक विकार कमी करण्यास मदत

दररोज थोड्या प्रमाणात तिळाचे सेवन केल्यास आपण आपल्याला असणाऱ्या मानसिक समस्यापासून मुक्ती मिळू शकतो. तिळाचे सेवन आपल्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते. कारण त्यामुळे आपल्याला असणारे मानसिक विकार, तणाव, नैराश्य यापासूनही मुक्ती मिळू शकते.

तर मित्रांनो, हे होते तीळ खाण्याचे काही फायदे. (Benefits of Til in Marathi) तीळ हा घटक खूपच महत्वाचा आहे. कारण त्यामध्ये विविध उपयुक्त व पौष्टिक घटक आपल्या शरीराला उर्जा व बळकटी प्रदान करतात. त्यामुळे तिळाचे सेवन करणे आपल्यासाठी हितावह ठरते.

अतिजास्त प्रमाणात तिळाचे सेवन आपल्यासाठी हानिकारक ठरू शकते. कारण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा हानिकारक ठरू शकतो. तसेच जे व्यक्ती कमी रक्तदाब या समस्येचा सामना करत आहेत, त्यांनी तीळ खाणे टाळावे किंवा याबाबतीत त्यांनी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

जर आपल्याला हि माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. अशाच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी आमच्या www.Netmarathi.com या वेबसाईटला भेट द्या.

❝सदर लेखातील माहिती ही विविध माध्यमातून संशोधन करून केवळ आणि केवळ प्राथमिक माहितीसाठी उपलब्ध करून दिली आहे. वाचकांनी कोणताही निर्णय किंवा उपचार घेण्याअगोदर त्या त्या क्षेत्रातील विशेषज्ञाचा सल्ला घ्यावा.❞

Share :

Leave a Comment