Bird flu in Marathi | काय आहे बर्ड फ्लू – त्याची कारणे, लक्षणे व उपाय जाणून घ्या…

Share :

Bird flu in Marathi – काय आहे बर्ड फ्लूची लक्षणे, कारणे व उपाय? जाणून घ्या एका क्लिकवर…

कोरोनानंतर आता देशभरात बर्ड फ्लूने डोकं वर काढलं आहे. कारण उत्तर भारतातील बहुतेक राज्यात तसेच महाराष्ट्रातही या रोगाने आपले हातपाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. तसं बघितलं तर या रोगाबद्दल उलटसुलट चर्चा, अफवाच जास्त पसरवल्या जातात.

आज या लेखाच्या माधमातून आपण अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत कि हा नेमका बर्ड फ्लू रोग आहे तरी काय? त्याची लक्षणे तरी काय आहे? व त्यावर उपाय आहे का?

Bird flu in Marathi

चला तर मित्रांनो, सुरु करूया आजच्या लेखाला…

Bird flu in Marathi

बर्ड फ्लू काय आहे? (What is Bird flu)

सर्वप्रथम आपण जाणून घेऊया कि बर्ड फ्लू हा रोग काय आहे? तर बर्ड फ्लू हा रोग पक्ष्यांमध्ये पसरणारा एक संसर्गजन्य रोग आहे. शब्दशः अर्थ घेतला तर “बर्ड” म्हणजे पक्षी, म्हणजेच काय तर पक्षांमार्फत पसरणारा रोग. बर्ड फ्लूला वैद्यकीय भाषेत एव्हीयन इन्फ्लुएंझा (Avian Influenza) असे म्हटले जाते, तसेच याला H5N1 या नावाने देखील ओळखतात. सामान्य भाषेत या सर्वांना बर्ड फ्लू असं म्हटलं जाते.

आता सर्वांच्याच मनात असलेला प्रश्न हा असेल कि, काय हा रोग मनुष्याला होऊ शकतो का? तर याचं उत्तर आहे “हो”. बर्ड फ्लू हा रोग मानवाला देखील होऊ शकतो. यामध्ये संसर्ग झालेल्या व्यक्तीला फ्लू झाल्यासारखीच लक्षणे दिसतात व त्यावर उपचार करणे गरजेचे असते. बर्ड फ्लूची काय कारणे आहेत, ते आपण खालील चार्टच्या सहाय्याने समजून घेऊ.

बर्ड फ्लूची मुख्य कारणे (Causes of Bird flu)

बर्ड फ्लू हा रोग संसर्गजन्य रोग आहे. बर्ड फ्लू हा रोग मनुष्यास पक्ष्यांद्वारे होतो. यामध्ये कावळा, पोपट, कोंबडी, बदक, मोर यांचा समावेश होतो. बर्ड फ्लू इन्फेक्शन कोंबड्या, बदक यांसारख्या प्रजातीत सर्वाधिक प्रमाणात आढळतो. अशा पक्ष्यांच्या संपर्कात राहणाऱ्यांना याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कैकपटींनी वाढते. मानवामध्ये हा रोग डोळे, तोंड व नाकावाटे पसरू शकतो. त्यामुळे हा व्हायरस मनुष्यासाठी धोकादायक मानला जातो. असा हा बर्ड फ्लू पसरण्याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे सांगता येईल.
 • संसर्ग झालेल्या पक्ष्यांना हात लावणे किंवा त्यांच्या संपर्कात येणे.
 • संसर्गित पक्ष्याची विष्टा पडलेल्या पाण्याने अंघोळ करणे.
 • पक्ष्याचे अर्धवट शिजलेले किंवा कच्चे मांस किंवा अंडी यांचे सेवन करणे.

 (पूर्णपणे शिजलेले पक्ष्याचे मांस व अंडी खाण्यास सुरक्षित असतात.)

बर्ड फ्लू हा जरी संसर्गजन्य रोग असला तरी हा संसर्ग मनुष्याला पक्ष्यांमार्फत होतो. एखाद्या व्यक्तीमुळे दुसऱ्या व्यक्तीला बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याची खूपच कमी प्रकरणे समोर आलेली आहेत.


बर्ड फ्लूची लक्षणे (Symptoms)

आता आपण बर्ड फ्लूची लक्षणे काय आहेत, याची माहिती जाणून घेऊ. कारण मनुष्यामध्ये या व्हायरसची काही लक्षणे दिसून येतात…

बर्ड फ्लूची लक्षणे हि इन्फ्लुएंझा सारखीच असतात. त्यामध्ये काही सामान्य लक्षणे आढळतात. ती खालीलप्रमाणे –

 • घसादुखी
 • ताप
 • अतिसार
 • डोकेदुखी
 • श्वसनास त्रास
 • मळमळ
 • खोकला
 • पोटदुखी
 • थकवा जाणवणे
 • डोळे जळजळणे
 • न्यूमोनिया

बर्ड फ्लूवर उपाय काय आहे? (Remedy)

जर आपल्याला बर्ड फ्लूची लक्षणे दिसली तर आपण त्वरित आपल्या वैद्यकीय सल्लागाराशी संपर्क साधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ते उपचार घ्या. कारण बर्ड फ्लूची लक्षणे दिसल्यावर आपण त्यावर वेळ वाया न घालवता पहिल्या 48 तासातच औषधोपचार घेणे महत्वाचे असते.

आता आपण बर्ड फ्लूपासून स्वतः चे संरक्षण करण्यासाठी काय खबरदारी घेतली पाहिजे कि, जेणेकरून आपण बर्ड फ्लूपासून आपले स्वतः चे व कुटुंबाचे संरक्षण करू शकू, याची माहिती जाणून घेऊया.

बर्ड फ्लूपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. ती खालीलप्रमाणे –

 • शक्यतो घरामध्ये पक्षी पाळू नका.
 • वारंवार हात गरम पाणी व साबणाने स्वच्छ धुवा.
 • पक्षांच्या संपर्कात येणे टाळा.
 • संक्रमित भागात जाणे टाळा.
 • मांसाहार करायचा असेल तर पूर्णपणे शिजवलेलं मांस व अंडी यांचे सेवन करा.
 • कच्ची अंडी व कच्चे मांस खाऊ नका.
 • त्रास होताच किंवा लक्षणे दिसताच त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.

Bird flu in Marathi

तर मित्रांनो, बर्ड फ्लू म्हणजे नेमके काय? त्याची कारणे, लक्षणे व उपाय हि माहिती आपल्याला आवडली असेल व उपयुक्त वाटली असेल अशी आम्ही आशा व्यक्त करतो. हि माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, आप्तस्वकीयांना अवश्य शेअर करा.

या लेखाबद्दल किंवा माहितीबद्दल आपल्या काही शंका असतील तर आपण त्या येथे कमेंट करू शकता. आम्ही त्याचे नक्की निराकरण करू. अशाच दर्जेदार व अद्ययावत माहितीसाठी वेळोवेळी आमच्या www.Netmarathi.com या वेबसाईटला भेट द्या.

❝सदर लेखातील माहिती ही विविध माध्यमातून संशोधन करून केवळ आणि केवळ प्राथमिक माहितीसाठी उपलब्ध करून दिली आहे. वाचकांनी कोणताही निर्णय किंवा उपचार घेण्याअगोदर त्या त्या क्षेत्रातील विशेषज्ञाचा सल्ला घ्यावा.❞

Share :

Leave a Comment