Makar Sankranti Wishes in Marathi | मकर संक्रांतीच्या शुभेच्छा 2021

Makar Sankranti Wishes in Marathi - येथे आम्ही आपल्यासाठी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा घेऊन आलो आहोत. Makar sankranti chya hardik shubhechha डाऊनलोड करा.


मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 2021 | Makar sankranti chya hardik shubhechha

मकर संक्रांत हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण म्हणून ओळखला जातो. यादिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या दिवसाला मकर संक्रांत असे म्हटले जाते. यादिवशी लोक व्रत करणे, कथा वाचन करणे, दान करणे व सूर्याची उपासना करण्याबरोबरच मित्र व नातेवाईकांना शुभेच्छा देतात.


याठिकाणी आम्ही आपल्यासाठी एकापेक्षा एक दर्जेदार मकर संक्रांतीचे संदेश उपलब्ध करून दिले आहे. याच्या मदतीने आपण आपल्या प्रियजनांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊ शकतात.


Makar Sankranti Wishes in Marathi


Makar Sankranti Wishes in Marathi

तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. मकर संक्रातीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!



तिळगुळ घ्या गोड गोड बोला !! मराठी अस्मिता, मराठी मन, मराठी परंपरेची मराठी शान, आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण !! तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!


वर्ष सरले डिसेंबर गेला, हर्ष घेऊनी जानेवारी आला, निसर्ग सारा दवाने ओला, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला...!


तिळ आम्ही आहोत, तर गुळ तुम्ही, मिष्टान्न आम्ही आहोत, तर त्यातील गोडवा तुम्ही .. वर्षाच्या पहिल्या सणापासून होत आहे सुरवात आमच्याकडून तुम्हास आनंदी मकर संक्रांत !!!


गगनात उंच उडता पतंग 🪁 संथ हवेची त्याला साथ, मैत्रीचा हा नाजूक बंध नाते अपुले राहो अखंड... मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!


तिळाची उब लाभो तुम्हाला, गुळाचा गोड़वा येवो जीवनाला, यशाचा पतंग उड़ो गगना वरती तुम्हास अणि तुमच्या परिवारास शुभ मकरसंक्रांती...!


आठवण सूर्याची साठवण स्नेहाची, कणभर तीळ मनभर प्रेम, गुळाचा गोड़वा स्नेह वाढवा...! “तिळगुळ घ्या गोड गोड बोला”


नाते अपुले हळुवार जपायचे… तिळगुळाच्या गोडी सोबत अधिकाधिक दॄढ करायचे… आपल्याला व आपल्या परिवारास मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!


एक तिळ रुसला, रडत-रडत गुळाच्या पाकात पडला, खुद्कन हसला व हातावर येताच बोलू लागला... तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला...!


Sankranti Wishes in Marathi

गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या… मनातील कडवापणा बाहेर पडू द्या… या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या… उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे…!! सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे…!! श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे…!! शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे…!! दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा, जीवन असावे तिळगुळासारखे, “भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”!!



Sankranti Wishes in Marathi


Sankranti Wishes Marathi

विसरुनी जा दुःख तुझे हे, मनालाही दे तू विसावा.. आयुष्याचा पतंग तुझा हा, प्रत्येक क्षणी गगनी भिडवा...! मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा...!



आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तिळ, मनभर प्रेम, गुळाचा गोडवा सोबत ऋणानुबंध वाढवा...! तिळगुळ घ्या, गोडगोड बोला...!


नभी उंचच उंच लहरू दे पतंग, आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग आणि आयुष्यात पसरू दे आनंद तरंग मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...!


मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!


माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून आपणास व आपल्या परिवारास मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!


मनात असते आपुलकी म्हणून स्वर होतो ओला तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला...! मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...!


नभी उंचच उंच लहरू दे पतंग आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग आणि आयुष्यात पसरू दे आनंद तरंग मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...!


दिवस संक्रांतींचा, मधुर वाणीचा, रंग उडत्या पतंगांचा, बंध दाटत्या नात्यांचा. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...!


म......मराठमोळा सण, क......कणखर बाणा, र.......रंगीबेरंगी तिळगुळ, सं......संगीतमय वातावरण, क्रां.....क्रांतीची मशाल, त......तळपणारे तेज...! मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...


Makar Sankranti Wishes Marathi

कणभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा तिळगुळ घ्या, गोड गोड बोला... मकर संक्रातीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा...!




Makar Sankranti Wishes in Marathi

मित्रांनो, आम्हाला आशा आहे कि, आम्ही दिलेल्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा संदेश आपल्याला नक्की आवडतील. जर आपल्याला हे आवडले असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींना अवश्य शेअर करा.



अशाच नवनवीन व दर्जेदार शुभेच्छा संदेशासाठी वेळोवेळी आमच्या www.Netmarathi.com या वेबसाईटला भेट द्या.