आपल्या देशात आजही अनेक रहस्यमयी व ऐतिहासिक जागा पहावयास मिळतात. भारतात आजही अनेक ठिकाणे अशी आहेत, जेथील दंतकथा प्रचलित आहेत. अशा दंतकथामुळे अशा जागा या रहस्यमयी बनून राहिल्या आहेत. जर आपणास गूढ रहस्यमयी राजवाडे, प्राचीन विहिरी यांची आठवण झाली तर सर्वप्रथम आपल्याला राजस्थानचे नाव लगेच लक्षात येते.
अशीच एक रहस्यमयी विहीर मध्य प्रदेशात आहे. या विहिरीचे पाणी पिताच पाणी पिणारे लोक भांडण करण्यास सुरुवात करतात. हि रहस्यमयी विहीर मध्यप्रदेशातील शोपूर शहराजवळ आहे. सुमारे 250 वर्षांपूर्वी ह्या विहिरीचे बांधकाम करण्यात आले होते. एका भव्य राजवाड्यात असलेली हि विहीर "तांत्रिक विहीर" या नावानेदेखील ओळखली जाते.
विहिरीचा इतिहास
हि विहीर सुमारे 250 वर्षांपूर्वी एका भव्य राजवाड्यात अतिशय सुरेख पद्धतीने बांधण्यात आली होती. तत्कालीन राजा गिरीधर सिंह यांनी या विहिरीचे बांधकाम करवून घेतले होते. याच विहिरीबरोबर अजूनही एकूण 8 विहिरींचे बांधकाम करण्यात आले. यातलीच हि एक "तांत्रिक विहीर" म्हणून ओळखली जाणारी विहीर आहे.
तांत्रिक विहीर असे नाव का पडले?
या विहिरीला तांत्रिक नाव पडण्यामागे व लोक या विहिरीचे पाणी पिताच भांडण करण्यामागे एक कारण सांगितले जाते. एका नाराज मांत्रिकाने आपल्या तंत्र-मंत्रांच्या सहाय्याने या विहिरीवर जादूटोणा केला आणि तेंव्हापासूनच लोक या विहिरीचे पाणी पिताच आपले संतुलन गमावून बसत आणि एकमेकांशी भांडणे करत असत. तत्कालीन राजाच्या हि गोष्ट लक्षात येताच त्यांनी हि विहीर वापरण्यासाठी बंद करून टाकली. राजपरिवारात भांडणे होण्याचेही हि विहीर एक कारण बनली होती.
तर मित्रांनो, आम्हाला आशा आहे कि, आम्ही दिलेल्या या माहितीने आपले समाधान झाले असेल. हि विहीर शापित विहीर म्हणूनही ओळखली जाऊ लागली. जर कोणी या विहिरीचे पाणी पिले तर ते लोक भांडण्यास व झगडण्यास सुरुवात करीत असत. त्यामुळे या विहिरीचा वापर बंद करण्यात आला. त्यामुळे आजही हि विहीर वापरण्यासाठी बंद आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. अशाच दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी आमच्या www.Netmarathi.com या वेबसाईटला भेट द्या.