Garam Pani Pinyache Fayde in Marathi - या लेखात आपण गरम किंवा कोमट पाणी पिण्याचे अद्भुत फायदे जाणून घेणार आहोत. अधिक माहितीसाठी लेख काळजीपूर्वक वाचा.
कोमट पाणी पिण्याचे अद्भुत फायदे
मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या शरीराला विविध पदार्थांपासून वेगवेगळे फायदे मिळतच असतात. त्या पदार्थांच्या सेवनाची आपल्याला व आपल्या शरीराला एक सवयच लागून जाते. हल्लीच्या धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनात आपण प्रत्येकजण आपल्या शरीराची विशेष काळजी घेण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतो.
आयुर्वेदात रोज किमान 8 ते 10 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिलेला आहे, हे तुम्हीं वाचले असेलच किंवा कोणाच्या तरी तोंडून ऐकले असेल. पाण्याला आपण जीवन असे नाव दिले आहे. कारण पाणी आपल्या शरीरासाठी अतिशय महत्वाची भूमिका निभावत असते. आपल्याला हे माहितीच असेल कि पाण्याशिवाय आपण जास्त काळ जिवंत राहू शकत नाही. पाण्याचे आपल्या शरीराच्या विकासकामात महत्वाचे योगदान असते.
Garam Pani Pinyache Fayde in Marathi |
हे झाले मित्रांनो साधे पाणी पिण्याचे फायदे... हे आपल्याला माहितीच असेल, परंतु मित्रांनो जसे आपल्याला साध्या पाण्याचे फायदे माहित असतील, तसेच गरम पाणी पिण्याचे खूप सारे व अद्भुत फायदे आहेत, कि ज्यांच्याबद्दल आपल्याला कदाचित माहिती नसेल.
आजच्या या लेखात आपण गरम पाणी पिण्याचे अद्भुत फायदे जाणून घेणार आहोत, कि जे वाचल्यावर आपलादेखील यावर विश्वास बसणार नाही आणि आपणही असे म्हणाल कि, खरच...! फक्त गरम पाणी पिण्याचे एवढे सारे फायदे...!
1. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
आजकाल अवास्तव वजनवाढ हि जवळजवळ प्रत्येकाचीच एक मोठी समस्या बनली आहे. आपणही हा अनुभव घेतलाच असेल कि, आपले वजन हे नकळतपणे अतिशय वेगाने वाढत असते. मात्र ज्यावेळी हि बाब आपल्या लक्षात येते, त्यावेळी एकतर खूपच उशीर झालेला असतो किंवा वजन कमी करणे हि आपल्यासाठी एक वेगळीच डोकेदुखी होऊन बसलेली असते. वजन वाढण्याचे सर्वात मोठे व महत्वाचे कारण म्हणजे आजची जीवनशैली.
आज आपल्यापैकी बहुतेक व्यक्तींना जेवणासाठीही वेळ नसतो. त्यामुळे जसा वेळ मिळेल, त्या पद्धतीने आपण अधाशासारखे पटापट खाण्याचा प्रयत्न करतो तसेच जेवण झाल्यावरही आपण भरपूर चुका करतो. याचाच नकारात्मक परिणाम आपल्या शरीरावर होतो. आजची बैठी जीवनशैली देखील आपले वजन वाढण्यास कारणीभूत ठरते.
जर आपल्याला वजन कमी करण्याची इच्छा असेल तर आपण रोज सकाळी उठल्यावर गरम पाणी पिण्याची सवय लावून घ्या. याचा आपल्या शरीराला खूपच जबरदस्त फायदा होईल. गरम पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. त्यामुळे वजन नियंत्रणाबरोबरच आपल्या इतर काही समस्या सुटण्यास मदत होते. काही दिवसानंतर आपल्याला देखील आपले वजन कमी होत असल्याचे निदर्शनास येईल. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी गरम पाणी पिणे हा रामबाण उपायच मानता येईल.
2. पचनक्रिया सुधारण्यास गुणकारी
बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या पोटाच्या विकाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असल्याचे आपल्याला दिसून येत असेलच किंवा आपणही हा अनुभव करत असालच. धावपळीच्या व दगदगीच्या जीवनशैलीमुळे आपल्या पाचनसंस्थेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे अपचन, ऍसिडिटी, बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो.
जर आपलीही पचनक्रिया खराब झाली असेल किंवा आपल्याला पचनक्रिया मजबूत करावयाची असेल तर आपल्यासाठी गरम पाणी अतिशय गुणकारी ठरू शकते. कारण गरम पाणी आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर फेकण्यास मदत करते. त्यामुळे आपल्याला वरील समस्यांचा सामना करावा लागणार नाही व पचनक्रियेवर त्याचा सकारात्मक परिणाम होईल.
3. चेहरा उजळण्यास मदतगार
प्रत्येकालाच आपण सुंदर दिसावे असे वाटत असते. मात्र सध्याच्या जीवनशैलीमुळे व दिवसभराच्या दगदगीने आपण पूर्णतः थकून जातो. जर आपण गरम पाणी पिण्यास सुरुवात केली तर काही दिवसातच आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारची चमक (ग्लो) आलेला आपल्याला दिसून येईल. गरम पाणी पिण्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील मॉइश्चराइझर टिकून राहण्यास मदत मिळते.
जर आपल्याला मुरुमांची समस्या असेल तर ते देखील दूर होतात. आपल्याला कोरड्या त्वचेची समस्या असेल तर ती समस्या देखील सुटण्यास मदत होते. गरम किंवा कोमट पाणी पिण्याचा हा देखील एक फायदा सांगता येईल.
4. आपली इम्युनिटी सिस्टीम मजबूत होते
आपल्या सर्वानांच माहिती असेल कि सध्याच्या काळात जगभर कोरोना व्हायरसने अक्षरक्षः धुमाकूळ घातला आहे. कोरोना विषाणूपासून स्वतः चे रक्षण करावयाच्या उपायातील एक उपाय म्हणजे स्वतः ची इम्युनिटी सिस्टीम (रोगप्रतिकारक क्षमता) वाढवणे किंवा मजबूत करणे. जर आपण रोजच्या रोज गरम पाणी पीत असाल तर त्याचा आपली इम्युनिटी सिस्टीम मजबूत होण्यास मोठा फायदा होतो. त्यामुळेच डॉक्टरसुद्धा कोरोनाच्या काळात आपल्याला कोमट किंवा गरम पाणी पिण्याचा सल्ला हमखास देतात.
5. ताण तणावापासून मुक्ती
आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्तीला वाढत्या स्पर्धेत स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवावयाचे असते. त्यामुळे सध्या जवळ जवळ प्रत्येक व्यक्ती ताण तणावयुक्त जीवन जगते. ताण तणावामुळे आपल्याला इतर समस्या देखील उद्भवतात. त्यात मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार तसेच इतर शारीरिक व्याधी यांचा समावेश होतो. जर आपण गरम पाण्याचे सेवन वेळोवेळी केले तर आपल्या शरीरातील काही विषारी घटक बाहेर पडतात. त्यामुळे आपल्याला ताण तणावापासून मुक्ती मिळून एकप्रकारचे तणावमुक्त जीवन आपल्याला जगता येईल.
6. थकवा दूर करण्यास मदतगार
आजकाल बहुतेक लोकांना खूपच कामाचा ताण असतो, दिवसभराच्या दगदगीने ते अगदी थकून जातात. अशावेळी इतर नवीन कोणतेही काम करताना आपल्याला आळस हा नक्की येतोच. आपण आपल्या दैनंदिन कामाव्यतिरिक्त इतर कामे टाळण्याचा प्रयत्न करतो. जसे कि, बायको, मुलांबरोबर बाहेर जेवायला जाणे, चित्रपट पाहणे, एखाद्या पर्यटन स्थळी भेट देणे.
जर आपल्यालाही विनाकारण थकवा येत असेल तर आपण सकाळी उठल्याबरोबर 1 ते 2 ग्लास कोमट किंवा थोडेसे गरम पाणी पिण्यास सुरुवात करावी. असे केल्याने आपण आळस आणि थकव्यापासून लांब राहू शकाल व आपल्या जीवनाचा आनंद घेऊ शकाल.
7. बद्धकोष्ठता व ऍसिडिटी पासून सुटका
आजकाल बहुतेक लोकांना बद्धकोष्ठता व ऍसिडिटीची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवलेली आपल्याला दिसून येते. अशावेळी यापासून दूर राहण्यासाठी आपण रोज सकाळी कोमट किंवा थोडेसे गरम पाणी पिण्यास सुरुवात करा. यामुळे आपली बद्धकोष्ठता व ऍसिडिटीपासून हमखास सुटका होईल.
8. केसांच्या आरोग्यासाठी गुणकारी
आज वाढत्या प्रदूषणामुळे बहुतेक पुरुषांना व स्रियांनादेखील केसांच्या समस्येला सामोरे जावे लागते. जर आपण सकाळी गरम पाणी पिण्यास सुरुवात केली तर केसांच्या ग्रंथीची व्यवस्थित वाढ होते, त्यामुळे केसांना व्यवस्थित पोषण मिळून ते चमकदार बनतात. त्यामुळे केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी गरम पाणी पिणे फायदेशीर व गुणकारी ठरू शकते.
तर मित्रांनो आम्हाला खात्री आहे कि, आम्ही दिलेल्या माहितीने आपले पूर्ण समाधान झाले असेल. गरम किंवा कोमट पाणी पिण्याचे अतिशय महत्वपूर्ण फायदे (Garam Pani Pinyache Fayde in Marathi) आपण वरीलप्रमाणे अभ्यासले आहे.
गरम पाणी पिण्याचे जसे काही अद्भुत फायदे आहेत, तसेच अति जास्त प्रमाणात गरम पाणी पिण्याचे काही तोटे सुद्धा आहेत. त्यामुळे शक्यतो सकाळी पाणी पिताना अति जास्त गरम पाणी पिणे टाळावे. जर आपण हलकेसे गरम किंवा कोमट पाणी पिलात तर त्याचा आपल्या शरीराला काही तोटाही होणार नाही आणि आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरण्यास ते मदतगार सिध्द होईल.
जर आपल्याला हि माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा.