होळी का साजरी करतात? Holi Information in Marathi

Share :

Holi Information in Marathi – या लेखात आपण होळी सणाची माहिती मराठीत जाणून घेणार आहोत. तसेच होळी का साजरी करतात? याचीही माहिती याठिकाणी अभ्यासणार आहोत.
 

आपल्या भारत देशात विविध प्रकारचे व विविध धर्माचे सण-समारंभ मोठ्या उत्साहात वर्षभर साजरे केले जातात. प्रत्येक धर्मियांच्या सणाचे एक वेगळे धार्मिक तसेच सामाजिक वेगळेपण आणि महत्व असते. विविध धार्मिक ग्रंथांत आणि प्राचीन पुस्तकात भारतातील विविध सणांचा उल्लेख आपल्याला दिसून येतो.

संपूर्ण भारतभर तसेच इतर काही देशातही मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा एक सण म्हणजेच होळी. होळी हा वसंत ऋतूमध्ये साजरा केला जाणारा एक महत्वपूर्ण सण आहे. यावेळी रंगाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होते. होळी हा सण रंगांचा सण म्हणूनही ओळखला जातो.

Holi Information in Marathi
होळी का साजरी करतात?

वेगवेगळ्या मान्यतेनुसार आणि कथेनुसार होळी का साजरी करतात यांच्याविषयी विविध मतप्रवाह आढळतात. यामध्ये काही धार्मिक तसेच वैज्ञानिक कारणे आढळतात. त्याच कारणांची याठिकाणी आपण माहिती अभ्यासुया…

Holi Information in Marathi

प्रत्येक सण साजरा करण्यामागे काही ना काही कारण, त्या सणाचा इतिहास असतोच. होळी हा सण साजरा करण्यामागे असेच एक कारण सांगितले जाते.

Why is Holi Celebrated in Marathi

प्रल्हाद, होलिका आणि हिरण्यकश्यपू

प्राचीन काळात हिरण्यकश्यपू नावाचा एक राजा होता, जो स्वतःला खूपच श्रेष्ठ समजत असे. देवीदेवतांविषयी त्याला खूपच घृणा, तिरस्कार होता. त्याच्या समोर कोणी देवाचे नाव जरी उच्चारले तरी त्याला हिरण्यकश्यपू भयानक शिक्षा देत असे. पुढे हिरण्यकश्यपूला एक पुत्र झाला, त्याचे नाव प्रल्हाद. मात्र प्रल्हाद हा भगवान विष्णूचा मोठा भक्त होता. प्रल्हाद दिवस-रात्र भगवान विष्णूच्या नामाचे स्मरण करत असे.

हि गोष्ट हिरण्यकश्यपूला अजिबात पचनी पडली नाही. त्याने प्रल्हादाची भगवान विष्णूच्या नामस्मरणाची सवय सुटावी यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र प्रत्येकवेळी हिरण्यकश्यपूला त्यामध्ये अपयश आले. शेवटी वैतागून हिरण्यकश्यपूने प्रल्हादाचा वध करण्याची योजना आखली.

हिरण्यकश्यपूची बहिण जिचे नाव होलिका होते, या होलीकेला अग्नीने न जळण्याचा आशीर्वाद मिळाला होता. हिरण्यकश्यपूने होलिकेला फर्मान सोडले कि तिने प्रल्हादाला स्वतःच्या मांडीवर घेऊन अग्नीच्या चितेवर बसावे. जेणेकरून जळत्या अग्निचीतेवर प्रल्हादही भस्मसात होईल. त्याप्रमाणे होलिका अग्नीच्या चितेवर बसली. कारण तिला अग्नीने न जळण्याचा आशीर्वाद मिळाला होता. प्रल्हाद भगवान विष्णूच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झाला.  मात्र आता प्रल्हादाऐवजी होलीकाच जळायला सुरुवात झाली.

भक्त प्रल्हादाला या अग्नीने कोणतीही इजा झाली नाही. मात्र होलिका या अग्निचीतेवर जळून भस्म झाली. भगवान विष्णूने भक्त प्रल्हादाचे अग्नीपासून संरक्षण केले होते. त्यादिवशी लोकांनी खूप मोठा आनंद साजरा केला. त्यादिवसापासूनच होळी हा सण साजरा केला जातो, अशी मान्यता आहे.

 

राधाकृष्ण

दुसऱ्या एका मान्यतेनुसार असे सांगितले जाते, कि ज्यावेळी एका राक्षसीने श्रीकृष्णाला आपले विषारी दुध पाजले, त्यावेळी त्या विषामुळे श्रीकृष्णाचे शरीर निळ्या रंगाचे झाले. पुढे श्रीकृष्णाला शंका आली कि आपल्या या निळ्या रंगामुळे राधा आणि इतर गोपिका आपल्याशी बोलणार नाहीत. त्यामुळे त्याने हि गोष्ट माता यशोदेजवळ व्यक्त केली.

माता यशोदेने भगवान श्रीकृष्णाला असे सांगितले कि, तुला जो रंग आवडतो तो घे आणि तो रंग राधाला लावून ये. त्यामुळे श्रीकृष्णाने राधेला खरच रंग लावला आणि तिथून पुढेच त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली. त्यामुळे तेव्हापासून होळी आणि धुळवड या सणाची सुरुवात झाली अशी मान्यता आहे.

वसंत ऋतूची सुरुवात

ज्यावेळी होळी हा सण असतो, त्यावेळी हिवाळा नुकताच संपलेला असतो आणि उन्हाळा सुरु होण्याची वेळ असते. याकाळात आपल्याला थोडासा थकवा आल्यासारखे वाटते. हिवाळा संपून उन्हाळा सुरु होण्याच्या बदलाला आपल्या शरीराने देखील स्वीकारावे यासाठी देखील होळी हा सण साजरा केला जातो. कारण होळी दहनामुळे आपल्या शरीराला एका प्रकारची उष्णता व चैतन्य प्राप्त होत असते.

होळी कशी साजरी केली जाते? How to Celebrate Holi in Marathi

आपण वर माहिती अभ्यासल्याप्रमाणे होळी हा सण संपूर्ण भारतभर मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. होळीचा सण याची देही याच डोळा अनुभवण्यासाठी लोक वृंदावन, गोकुळ अशा ठिकाणी आवर्जून जातात. बहुतेक ठिकाणी लोक एकमेकांना रंग लावून हा सण अगदी मोठ्या आनंदाने साजरा करतात. काही ठिकाणी रंगांऐवजी फुलांचा देखील वापर केला जातो.

महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी या दिवशी लोक रात्री कचरा, लाकूड यांना एकत्रित करून त्याचे दहन करतात. यामागे असे कारण सांगितले जाते कि, ज्याप्रमाणे वाईट प्रवृत्तीची होलिका या अग्नीमध्ये जळून नष्ट झाली, त्याचप्रमाणे वाईट विचार, वाईट गोष्टी यांचा त्याग करून आपले जीवन अधिक सुख समाधानाचे बनवणे.

तर मित्रांनो, आम्हाला खात्री आहे कि, आम्ही आपल्याला दिलेल्या माहितीने होळी का साजरी करतात? (Holi Ka Sajari Kartat) या आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळालेच असेल. आम्ही याठिकाणी होळी सणाबद्दल सर्व माहिती अगदी सविस्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

होळी हा सण भारतीय पारंपारिक महत्वपूर्ण सण म्हणून ओळखला जातो आणि साजरा केला जातो. होळी आणि धुलीवंदन हा सण उत्साह, आनंद आणि चैतन्याचा सण आहे. हा सण साजरा करताना आपण नेहमी विशेष काळजी घेतली पाहिजे.

जर मित्रांनो, आपल्याला आम्ही दिलेली हि माहिती आवडली असेल तर हि माहिती आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. जरा त्यांनादेखील समजू द्या कि होळी हा सण का साजरा करतात? 

आपल्या या लेखाबद्दल काही शंका असतील तर खालील कमेंट बॉक्समध्ये आपण आपले म्हणणे मांडा. आम्ही लवकरात लवकर त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू. अशाच प्रकारच्या नवीन आणि दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी आमच्या www.Netmarathi.com या वेबसाईटला भेट द्या.


Share :

Leave a Comment