उन्हाळा सुरु होतोय…! मग या पद्धतीने करा उन्हापासून स्वतःचा बचाव

Share :

Unhapasun Sanrakshan – आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे, त्यामुळे उन्हापासून आपल्या स्वतः चा बचाव कसा करायचा याच्या काही टिप्स आपण या लेखात वाचणार आहोत.

दिवसेंदिवस तापमान वाढतच चाललेलं आपल्याला दिसून येत असेलच. आज ऊन जरा जास्तच चटकतय र…! हे वाक्यही उन्हाळ्यात हमखास आपल्याला ऐकू येत असेलच. आता उन्हाची जरा जास्तच झळ बसायला सुरुवातच होत आहे. हि तर उन्हाळा सुरु होण्याची फक्त सुरुवात आहे, मार्च ते मे महिन्यात उन्हाचा तडाखा जरा जास्तच असतो. सध्या तर अशी परिस्थिती आहे कि, सकाळच कोवळ ऊनही नको नको वाटतंय.

अशा वेळी या कडक उन्हापासून स्वतः चा बचाव कसा करायचा हा सर्वात मोठा प्रश्न आपल्यापैकी सर्वांनाच नक्कीच भेडसावत असेल.

Unhapasun-Sanrakshan
उन्हापासून संरक्षण करण्याच्या टिप्स

बाहेर ऊन जास्त असले तरी आपल्याला कोणत्या ना कोणत्या कामासाठी घराबाहेर पडावेच लागते. तसेच घरातदेखील उन्हाचा त्रास आपल्याला होत असतोच. अशावेळी आम्ही काही टिप्स आपल्याला सांगणार आहोत कि ज्याच्या मदतीने आपण उन्हापासून आपले संरक्षण नक्कीच करू शकाल.

Table of Contents

उन्हापासून आपल्या स्वतः चा बचाव कसा करायचा याच्या काही टिप्स

भरपूर पाणी प्यावे

उन्हाळ्यात सर्वच ठिकाणचे तापमान वाढलेले असते. आपल्या शरीराचे तापमान देखील वाढलेले असते. अशावेळी आपल्याला थकवा आल्यासारखे जाणवते. त्यामुळे शरीराला पाणी कमी पडू नये म्हणून भरपूर पाणी पिण्याची सवय लावा.

पाणी पिताना ते एकदाच न पिता ठराविक अंतराने प्यावे. यामुळे आपल्या शरीरात पाण्याची कमतरता जाणवणार नाही. त्यामुळे उन्हाळ्यातच नव्हे तर प्रत्येक ऋतूत योग्य प्रमाणात पाणी प्यावे.

गॉगल, टोपी, रुमाल, छत्री यांचा वापर

कडक उन्हात शक्यतो घराबाहेर जाणे टाळाच. मात्र जरी महत्वाच्या कामानिमित्त घराबाहेर पडण्याची वेळ आलीच तरी गॉगल, टोपी, रुमाल, छत्री यांचा जरूर वापर करा. या गोष्टी उन्हाच्या तीव्र झळांपासून आपल्या शरीराचे संरक्षण करतील.

सुयोग्य आहार

उन्हाळ्यात आपल्या शरीराला पाण्याची सर्वात जास्त गरज असते. आपल्याला त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे आपल्या आहारात टरबूज, खिरे, काकडी, खरबूज, द्राक्ष, आंबा यांचा समावेश करावा. या फळांच्या माध्यमातून आपल्या शरीराला योग्य प्रमाणात पाणी मिळल्यास मदत होईल. तसेच वेळोवेळी दही, ताक यांचाही आहारात समावेश असू द्या.

तळलेले व तुपकट पदार्थ टाळा

आपल्या आहारात शक्य असेल तर संपूर्णपणे तळलेले व तुपकट पदार्थ टाळाच. कारण त्यामुळे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होण्याची शक्यता बळावते. त्यामुळे शक्य असेल तर जास्तीत जास्त फळांचा आपल्या आहारात समावेश असू द्यावा व तळलेले आणि तुपकट पदार्थ टाळावे.

सुती कपड्यांचा वापर

उन्हाळ्यात शक्यतो सुती किंवा खादीच्या कपड्यांचा वापर करावा. यामुळे जरी आपल्याला कडक उन्हात जाण्याची वेळ आली तरी आपल्याला उन्हाचा कमी त्रास होईल. सुती किंवा खादीच्या कपड्यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होते. शक्यतो उन्हाळ्यात पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावे. कारण पांढरा रंग हा उष्णतेचा दुर्वाहक मानला जातो. त्यामुळे सूर्याच्या उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी शक्य असेल तर पांढरेच कपडे परिधान करावे.

भडक, लाल रंगाचे, काळ्या रंगाचे कपडे उन्हाळ्यात परिधान करू नयेत, त्यामुळे आपल्याला उष्णतेचा जास्तीचा त्रास होण्याची शक्यता असते.

उपाशीपोटी घराबाहेर पडू नका

आपल्याला कामानिमित्त कडक उन्हात बाहेर पडण्याची वेळ आली तर थोडेसे काहीतरी खावून घराबाहेर पडा. उपाशीपोटी कडक उन्हात घराबाहेर पडू नका. उपाशीपोटी घराबाहेर पडल्याने आपल्याला उन्हाचा जास्तच त्रास होण्याची शक्यता असते. तसेच जर जास्त ऊन लागले तर चक्कर येणे, घबराहट होणे अशा समस्येला आपल्याला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे शक्यतो काहीतरी खावूनच घराबाहेर पडा.

उन्हातून घरी आल्यावर लगेच पाणी पिऊ नका

कडक उन्हातून घरी आल्यावर लगेच पाणी पिऊ नका किंवा जेवणही करू नका. थोडावेळ शांत बसून किंवा गार पाण्याने हातपाय धुवून अगदी शांतपणे खाली बसून आरामात व घाई न करता हळू हळू पाणी पिण्याची पद्धत योग्य आहे. जर आपण कडक उन्हातून घरी आल्यावर लगेच जास्त प्रमाणात व घाई घाईत पाणी प्यायलो, तर ते आपल्या जीवावर बेतणारे ठरू शकते.

दिवसातून दोनदा अंघोळ करावी

उन्हाळ्यात शक्य असेल तर दिवसातून किमान दोनदा अंघोळ करावी. शक्य असेल तर गार पाण्याने किंवा कोमट पाण्याने अंघोळ केली तर ते अधिक चांगले ठरेल. आपल्या शरीराचे वाढलेले तापमान कमी ठेवण्यासाठी याचा खूपच चांगल्या प्रमाणात फायदा होतो.

तसेच उन्हाळ्यात आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात घाम येत असतो, त्यामुळे शरीराला एक वेगळ्याच प्रकारची दुर्गंधी येत असते. त्यामुळे हे टाळण्यासाठी व आपल्या शरीराच्या स्वच्छतेसाठी उन्हाळ्यात दिवसातून दोनदा थंड पाण्याने अंघोळ केलेली कधीही चांगली.

मित्रांनो, नुकतीच आता उन्हाळा या ऋतूची सुरुवात झाली आहे, हवामान विभागाच्या अंदाजानुसार यावर्षीचा उन्हाळा हा अतिशय तीव्र स्वरूपाचा असणार आहे. त्यामुळे आता आपल्याला उन्हापासून स्वतः चे संरक्षण करावेच लागणार आहे. त्यासाठी वरील टिप्स आपल्याला उपयोगी पडतील अशी आम्हाला खात्री आहे.

मित्रानो आपल्याला हि माहिती आवडली असलेच. त्यामुळे हि माहिती आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना शेअर करून त्यांनादेखील उन्हापासून स्वतः चे संरक्षण कसे करावे यासंबंधी माहिती समजू द्या.

जर आपल्या काही शंका असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करा. आम्ही लवकरात लवकर तुमच्या शंकांचे निरसन करू. अशाच प्रकारच्या टिप्स आणि ट्रिक्ससाठी वेळोवेळी आमच्या www.Netmarathi.com या वेबसाईटला भेट द्या.


Share :

Leave a Comment