Gudi Padwa Information in Marathi | गुढीपाडवा का साजरा केला जातो? गुढीपाडवा सणाची माहिती

Share :

Gudi Padwa Information in Marathi – या लेखात आपण गुढीपाडवा का साजरा केला जातो? तसेच गुढीपाडवा सणाची माहिती जाणून घेणार आहोत. सर्व माहिती अवश्य वाचा…

Gudi Padwa Information in Marathi

आपल्या भारत देशात प्रत्येक महिन्यात कोणता ना कोणता सण-वार असतोच असतो. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी गुढीपाडवा हा भारतीय सण प्रत्येक वर्षी साजरा केला जातो. याच दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात होते. विशेषकरून गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त 2 एप्रिल 2022, वार शनिवार रोजी आहे.

Table of Contents

गुढीपाडवा या सणाला साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानत असल्या कारणाने लोक यादिवशी नवीन  वस्तूंची खरेदी, आपल्या नवीन व्यवसायाचा प्रारंभ, सोने-चांदी यांची खरेदी करण्याला प्राधान्य देतात. आपल्या दारात उभारलेली गुढी हे समृद्धी आणि सुखाचे प्रतिक मानले जाते.

Gudi-Padwa-Information-in-Marathi
Gudi Padwa Information in Marathi

गुढीपाडवा हा सण फक्त महाराष्ट्रातच साजरा करतात असे नाही…! हा सण देशाच्या विविध भागात साजरा केला जातो, फक्त काही ठिकाणी या सणाचे नाव आणि स्वरूप ठराविक बाबतीत भिन्न असते. कर्नाटकमध्ये आणि आंध्रप्रदेशमध्ये हा सण चेटी चंड, उगादी या नावानी ओळखला जातो.

गुढीपाडवा का साजरा करतात? Gudi Padwa Information in Marathi

गुढीपाडवा सण साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कारणे सांगितली जातात.  त्यापैकीच काही खालीलप्रमाणे…

महाभारतात आदिपर्वात उपरिचर या राजाला इंद्राने एक कळकाची काठी दिली. राजा उपरिचर याने इंद्राचा सन्मान आणि आदर म्हणून ती काठी जमिनीत रोवली आणि कळकाच्या काठीला शेल्यासारखे वस्र बांधून आणि त्याला हारतुरे लावून तिची मनोभावे पूजा केली. त्यामुळे तिथपासून गुढीपाडवा या सणाची सुरुवात झाली अशी आख्यायिका आहे.

दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार गुढीपाडवा साजरा करण्याचे एक दुसरे कारण सांगितले जाते. ब्रह्मदेवाने याच दिवशी विश्वाची निर्मिती केली होती, असे सांगितले जाते. त्यामुळे देखील आनंद साजरा करण्यासाठी गुढीपाडवा हा सण साजरा करतात, असे मानले जाते.

प्रभू रामचंद्र यांनी रावणाचा वध केला आणि ते अयोध्येला परत आले. ते चौदा
वर्षांचा वनवास भोगून आणि लंकाधिपती रावणाचा वध करून ते या दिवशीच
अयोध्येला परत आल्यामुळे तेथील लोकांना खूपच आनंद झाला. आपला आनंद व्यक्त
करण्यासाठी त्यांनी प्रत्येकाच्या घरावर एक लाकडी काठी बांधून त्याला
हारतुरे बांधले. त्यामुळे या दिवशीपासूनच गुढीपाडवा सणाची सुरुवात झाली असे
मानले जाते.

अजून एका मान्यतेनुसार भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह ज्यादिवशी ठरला त्यादिवशी पाडव्याचा मुहूर्त होता. पुढे तृतीयेला त्यांचा विवाह झाला. त्यामुळे माता पार्वतीची पूजा यादिवशी केली जाते.

गुढी हा शब्द तेलुगु भाषेतील आहे, त्याचा अर्थ ‘लाकूड किंवा काठी’ असा होतो. बहूतेक त्यापासूनच गुढीपाडवा या शब्दाची रचना झाली असे मानले जाते.

गुढीपाडव्याचे महत्व | Gudi Padwa Marathi Mahiti

गुढीपाडवा हा सण साजरा करण्यामागची कारणे आपण वर बघितलीच आहे. आता आपण गुढीपाडवा सण साजरा करण्यामागचे महत्व जाणून घेऊया…

यादिवशी लोक मीठ, हिंग, मिरी, साखर कडूनिंबाच्या पानाबरोवर वाटून जो पदार्थ बनतो त्याचे सेवन करतात. या पदार्थाच्या सेवनाने आपली पचनक्रिया सुधारते, त्वचारोग असेल तर तो देखील बरा होतो. कडूनिंब या वनस्पतीला आयुर्वेदात खूपच मानाचे स्थान आहे. कडूनिंबाच्या पानांचे सेवन आरोग्याच्या दृष्टीने खूपच हितकारक मानले जाते.

गुढीपाडव्याच्या सणाच्या वेळी खूपच ऊन असते. अशावेळी उन्हाची काहिली कमी करण्यासाठी मीठ, हिंग, मिरीबरोबर कडुनिंबाची पाने वाटून तो पदार्थ आवर्जून खाल्ला जातो. कडुनिंबाच्या पानात शरीराला थंडावा देण्याची क्षमता असते. त्यामुळे आपल्या शरीराला त्याचा खूपच लाभ होतो.

गुढीपाडवा कसा साजरा केला जातो? How to celebrate Gudi Padwa

गुढीपाडवा हा सण मराठी नववर्ष म्हणून देखील ओळखला जातो. यादिवशी लोक एक स्वच्छ काठी घेऊन त्याला रेशमी साडी किंवा रेशमी वस्र नेसवून त्यावर चांदीचा किंवा इतर धातूचा कलश चढवून त्याला कडुनिंबाची पाने, आंब्याची पाने, हार-तुरे, साखरेची माळ (गाठी – बहुतेक ठिकाणी याला गाठी असे म्हणतात) लावून सजवतात. हि तयार झालेली गुढी आपल्या घराच्या अंगणात किंवा खिडकीत उभारतात व नैवेद्य दाखवून तिची मनोभावे पूजा करतात. शक्यतो हि गुढीची काठी एका पाटावर उभी केलेली असते.

गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. लोक यादिवशी नवीन कपडे घालतात. काही लोक यादिवशी पारंपारिक वेशभूषा देखील करतात. तसेच घरासमोर सुबक व आकर्षक रांगोळ्या काढून घराला फुलाचे तोरण बांधतात. हा सण लोक आपल्या मित्रमंडळी, कुटुंबियांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करत असतात. यादिवशी घरी चांगले पदार्थदेखील बनवले जातात. त्यात पुरणपोळी, श्रीखंड, पुरी या पदार्थांचा समावेश होतो. यादिवशी लोक गुढीला नैवेद्य दाखवून मगच जेवण करतात.

लोक यादिवशी आनंद साजरा करत असताना आपल्या नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, आप्तस्वकीयांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देऊन अभीष्टचिंतन व्यक्त करतात. जर आपणही आपल्या नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांना शुभेच्छा देऊ इच्छित असाल तर आम्ही आपल्यासाठी खाली एक लिंक उपलब्ध करून दिली आहे. त्यामध्ये आम्ही 100 पेक्षा जास्त गुढीपाडवा शुभेच्छा संदेश दिलेले आहेत.

समारोप

तर मित्रांनो, आम्हाला खात्री आहे कि, आम्ही आपल्याला गुढीपाडवा सणाची माहिती (Gudi Padwa Mahiti) दिली ती आपल्याला नक्कीच आवडली असेल. आम्ही याठिकाणी गुढीपाडवा या सणाबद्दल सर्व सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर आमच्याकडून कोणतीही माहिती नजरचुकीने राहिली असेल तर आपण आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा.

गुढी पाडवा हा सण मराठी नववर्षाची सुरुवात म्हणून ओळखला जातो. हा सण संपूर्ण भारतात विशेषतः महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गुढीपाडवा का साजरा केला जातो? या आपल्या प्रश्नाचे उत्तर या लेखाच्या माधमातून आपल्याला मिळालेच असेल, अशी आम्ही खात्री बाळगतो.

जर आपल्याला हि माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, आप्तस्वकीयांना हि माहिती अवश्य शेअर करा. त्यांना देखील गुढीपाडवा का साजरा केला जातो? याबद्दल माहिती द्या किंवा हि माहिती त्यांना शेअर करा.

अशाच प्रकारच्या नवनवीन व लेटेस्ट माहितीसाठी वेळोवेळी आमच्या www.Netmarathi.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

Gudi Padwa FAQ’s | नेहमी विचारली जाणारी प्रश्न व उत्तरे –

गुढीपाडवा का साजरा करतात?

मराठी नववर्षाची सुरुवात म्हणून गुढीपाडवा हा सण साजरा करतात.

गुढीपाडवा सण यंदा किती तारखेला आहे?

गुढीपाडवा सण यंदा 2 एप्रिल 2022 वार शनिवार यादिवशी आहे.

गुढीपाडवा हा सण कसा साजरा करतात?

यादिवशी चांगले पदार्थ बनवून, नवीन कपडे परिधान करून व नातेवाईक, मित्रपरिवार यांना गोड गोड शुभेच्छा देऊन गुढीपाडवा हा सण साजरा करतात.

गुढीपाडवा हा सण कुठे साजरा करतात?

गुढीपाडवा हा सण विशेषकरून महाराष्ट्रात साजरा केला जातो. तसेच इतर राज्यात व परदेशातही काही ठिकाणी हा सण साजरा केला जातो.


Share :

Leave a Comment