घरांची नावे | घराच्या नावांची यादी मराठी | Home Names in Marathi

Share :

घरांची नावे | घराच्या नावांची यादी मराठी | Home Names in Marathi – याठिकाणी आपण Gharanchi Nave यांची यादी वाचू शकता. आपल्या घरासाठी छानसे नाव शोधा…

Gharanchi Nave in Marathi

एक छानसे सुंदर, टुमदार घर असावे, असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. प्रत्येकाने आपल्या मनात आपल्या घराविषयी काहीतरी कल्पना रचलेल्या असतातच. त्यात सर्वात महत्वाची बाब असते ती म्हणजे आपल्या घराचे नाव. बहुतेक व्यक्ती घराचे नामकरण करताना खूपच गोंधळून जातात. त्यांना त्यांच्या घरासाठी एक छानसे, सुंदर नाव शोधताना नाकी नऊ येतात.

Table of Contents

जर आपणही आपल्या घरासाठी एखादे छानसे सुंदर नाव शोधत असाल तर आपण अगदी योग्य ठिकाणी आला आहात. आम्ही आपल्यासाठी याठिकाणी भरपूर व सुंदर घरांच्या नावाची एक भलीमोठी यादीच दिली आहे. आपण त्यातून आपल्या घरासाठी एक छानसे नाव शोधा…

Home-Names-in-Marathi
Home Names in Marathi

जर आपल्याला आपल्या घरासाठी नाव शोधताना काही मदत हवी असेल तर या पोस्टच्या सर्वात शेवटी जो कमेंट बॉक्स दिला आहे, त्यामध्ये आपण आपल्याला येणारी अडचण लिहून आम्हाला कळवा. आम्ही लवकरात लवकर त्याचे उत्तर देऊ किंवा आमच्याशी संपर्क साधा…

घराचे नाव शोधताना उपयोगी येणाऱ्या काही टिप्स

आपल्या घराचे सुंदर व गोंडस नाव शोधताना जर आपल्याला अडचणी येत असतील तर आम्ही आपल्यासाठी काही टिप्स देत आहोत, त्याच्या मदतीने व आम्ही आपल्याला घरांची नावे व त्याच्या दिलेल्या यादीने आपण नक्कीच आपल्या घरासाठी एक छानसे नाव शोधण्यास यशस्वी व्हाल.
  • आडनावाप्रमाणे – घरासाठी नाव शोधताना भरपूर व्यक्तींचा आग्रह असतो कि, आडनावाप्रमाणे घरांचे नामकरण करणे. उदा. देशमुख, काळे इ.
परंतु जर आपल्याला आपल्या घराचे नामकरण आपल्या आडनावाप्रमाणे करावयाचेच असेल, तर आपण आपल्या आडनावापुढे इतर काही भारदस्त शब्द जोडू शकता. जेणेकरून आपल्या घरासाठी एक छानसे नाव तयार होईल. त्यासाठी काही उदाहरणे खाली दिली आहेत.
  1. देशमुख – देशमुख सदन, देशमुख निवास
  2. काळे – काळे सदन, काळे निवास
  3. देशपांडे – देशपांडे पॅलेस
अशा पद्धतीने आपण आपल्या पद्धतीने किंवा आम्ही दिलेल्या यादीतून आपल्या आडनावाप्रमाणे आपल्या घरासाठी एक सुंदर छानसे नाव शोधू शकता.
  • आई-वडिलांच्या नावाप्रमाणे – आई किंवा वडिलांच्या नावाप्रमाणे जर आपल्याला घराचे नाव ठेवावयाचे असेल तर, शक्यतो आई आणि वडिलांच्या नावाचा एकत्रित समावेश करून किंवा आई वडिलाच्या नावाचा एकच जोडशब्द तयार करून जे चांगले नाव तयार होईल, ते नाव देण्याचा प्रयत्न करा.
उदा. जर वडिलांचे नाव अनुप असेल आणि आईचे नाव प्रिया असेल तर घराचे नामकरण करताना अनुपप्रिया असे करण्याच्या ऐवजी अनुप्रिया असे केलेले नक्कीच चांगले.
  • आपल्या घराचे नाव शक्यतो सोपे ठेवण्याचा प्रयत्न करा.

या होत्या काही टिप्स ज्या आपल्याला आपल्या घराचे नाव शोधताना मदतगार सिद्ध ठरतील.

चला तर मग मित्रांनो, आता अधिक वेळ न दडवता सुंदर, गोंडस घराच्या नावांची यादी पाहूया…

सुंदर घरांची नावे | Marathi Gharanchi Nave

सुंदर घरांची नावे
✬ गौरीनंदन – गौरीचा पुत्र, गणपती
✬ कोकणकडा – एक ठिकाण
✬ तथास्तु – इच्छापूर्तीचा आशीर्वाद
✬ मातृछाया – आईची सावली
✬ आनंदयात्री – आनंदाचा यात्री
✬ वाटिका – बाग
✬ कदंब – एक वृक्ष
✬ गिरीराज – हिमालय पर्वत
✬ पवित्र – शुद्ध, पावन
✬ खूबसूरत – सुंदर
✬ शान्ति – शांतता
✬ झुळूक – आल्हाददायक वारे
✬ लाल महाल – एक ऐतिहासिक वास्तू
✬ नाथसागर – एका जलाशयाचे नाव
✬ प्रयाग – पवित्र ठिकाण
✬ सह्याद्री – एक पर्वतरांग
✬ सौख्य – सुख
✬ इंद्रप्रस्थ – पांडवांचे राहण्याचे ठिकाण
✬ विसावा – आराम, विश्रांती
✬ स्नेह – प्रेम
✬ सुरेख – छान, सुंदर
✬ मुक्तछंद – काव्यरचना
✬ सरस्वराज
✬ कोंदण – अलंकारासाठी केलेली जागा
✬ गिरीजा – माता पार्वती
✬ प्रभात – सकाळ
✬ अपूर्व – पूर्वी कधीही झाले नाही असे
✬ देवाश्रय – देवाचे घर
✬ निवांत
✬ पितृछाया – वडिलांची सावली
✬ आशीर्वाद – शुभ कामना
✬ देवगिरी – एक पर्वत
✬ भाविक – भक्त
✬ सज्जनगड – रामदास स्वामींचे ठिकाण
✬ पावनखिंड – एक ऐतिहासिक ठिकाण
✬ आदर्श
✬ स्वस्ति
✬ अर्पित – अर्पण करणे
✬ सुकृति – चांगली, योग्य कृती
✬ गोकुल – भगवान श्रीकृष्ण यांचे ठिकाण
✬ मातृछाया – आईची सावली
✬ स्वप्नपूर्ती – पाहिलेले स्वप्न पूर्ण होणे
✬ विरंगुळा – आवड
✬ रिद्धी सिद्धी – श्री गणेशाच्या पत्नी
✬ कुटीर – लहान झोपडी
✬ वास्तू
✬ स्वप्नगुंफा – स्वप्नांची गुंफण
✬ रचना – आकार
✬ स्वामी – मालक
✬ गोकुलधाम – एक ठिकाण
✬ स्वप्न्-पूर्ती – स्वप्न पूर्ण होणे
✬ सावली –
✬ श्रमसाफल्य – कष्ठाचे फळ
शुभं करोतिशुभ होणे
✬ कल्पना – अनुमान
✬ शुभ – चांगले विचार
✬ अभिनव – अनोखी
✬ वृंदावन – तुळस
✬ एकता – एकी
✬ लक्ष्य – ध्येय
✬ अभिलाषा – इच्छा
✬ पारस – लोखंडाचे सोन्यात रुपांतर करणारा दगड
✬ निलय – हृदयाचा एक भाग
✬ आराधना – भक्ती
✬ निकुंज – वनवाटिका
✬ बैकुंठ
✬ अनमोल – किंमत न करता येण्याजोगा
✬ भवन – घर
✬ गणेश – गणपती
✬ रौनक – चमकदार
✬ हेमप्रभा – सुवर्ण प्रकाश
✬ शिव – महादेव
✬ संतुष्टि
✬ क्षणभर विश्रांती
✬ अर्पण
✬ दर्पण – आरसा
✬ छाया – सावली
✬ उत्तम – योग्य
✬ आईसाहेब – आई

हे वाचामुलांची व मुलींची आकर्षक आणि सुंदर नावे

घरांची अद्वितीय नावे | Unique House Names in Marathi

घरांची अद्वितीय नावे
✬ स्नेहकुंज – प्रेमळ
✬ योगशांती
✬ विश्रांती – आराम
✬ परिश्रम – कष्ट
✬ प्रार्थना
✬ गुरुकृपा – गुरूची कृपा
✬ वसुधा – पृथ्वी
✬ ईशावास्यम – ईश्वराचे अस्तित्व असलेली जागा
✬ मधुवन – गोडवा
✬ उपासना – प्रार्थना
✬ कर्तृत्व – कार्य
✬ नंदन – पुत्र
✬ शिवार – शेत
✬ मोक्ष – मुक्ती
✬ निवारा – आसरा
✬ मुस्कान – हसू
✬ यशस्विनी – यश मिळवणे
✬ माझा मळा
✬ नक्षत्र – आकाशातील तारा
✬ चारधाम – चार दिशा, एक पवित्र यात्रा
✬ यमुना – पवित्र नदी
✬ आनंदसागर – आनंद सागर बनून वाहतो आधी जागा
✬ तमन्ना – इच्छा
✬ प्रेरणा
✬ खुशी –आनंद
✬ माझे घर
✬ स्वरकुंज – स्वर गुंजणारे ठिकाण
✬ चिमणीपाखरं
✬ स्पंदन – हृदयाची धडधड
✬ किर्ती
✬ जन्नत – स्वर्ग
✬ भावना
✬ अमरदीप
✬ भूमिका
✬ स्वप्नपूर्ती – पूर्ण झालेले स्वप्न
✬ मुक्ताई – मुक्त
✬ जीवनधारा
✬ समृद्धी – भरभराट
✬ नियती – नशीब
✬ उदय – उगवणे
✬ वसंत विहार
✬ पद्मजा – कमळावर बसलेली
✬ रत्नगर्भ – पृथ्वी
✬ हरिहरेश्वर – शिव आणि विष्णू
✬ अनुग्रह – कृपा
✬ आस्था – विश्वास
✬ भवन – घर
✬ मिथिलापुरी
✬ ऐक्य – एकता
✬ ऋद्धी – प्रगती
✬ प्रज्ञा – बुद्धी
✬ अक्षर – नष्ट न होणारे
✬ मिथिला
✬ त्रिवेणी – तीन नद्यांचा संगम
✬ अनुमती – परवानगी
✬ कौमुदी – चंद्रप्रकाश
✬ वैकुंठ
✬ संगम – एकत्र येणे
✬ श्रीतेज – गणपतीचे तेज
✬ कृष्ण-कुंज – कृष्णाचे घर
✬ देवारा
✬ काव्या – कविता
✬ तेजस्वी – आकर्षक
✬ सूर्योदय – सूर्य उगवणे
✬ हिमालय – पर्वत
✬ स्वप्न साकार – साकारलेले स्वप्न
✬ ऐक्य – एकता
✬ पुष्पक – एका विमानाचे नाव
✬ आश्रम
✬ नक्षत्र – तारा
✬ भवन – घर
✬ हस्तिनापुरी – महाभारतातील स्थान
✬ लक्ष्य – ध्येय
✬ दिव्यश्री – अदभूत
✬ एकता – ऐक्य
✬ गोदावरी – पवित्र नदी
✬ द्वारकापुरी – द्वारका
✬ फाल्गुनी
✬ गौरीशंकरम – शंकर पार्वती

हे वाचासुंदर आणि आकर्षक मराठी कथा

घरांची नावे व त्यांचा अर्थ | House Names in Marathi with Meaning

घरांची नावे व त्यांचा अर्थ
✬ आवास – घर
✬ अनमोल – किंमत न करता येण्याजोगा
✬ अंबर – आकाश
✬ भवन – घर
✬ छाया – सावली
✬ आश्रय – अवलंबून
✬ चमन – बाग
✬ ऐक्य – एकता
✬ दर्पंण – आरसा
✬ दया – कृपा
✬ हेमप्रभा – सुवर्ण प्रकाश
✬ गोकुळ – एक शहर
✬ ममता – प्रेम, वात्सल्य
✬ कावेरी – एक पवित्र नदी
✬ काव्य – कविता
✬ दिव्यज्योती – पवित्र ज्योती
✬ गोदावरी – एक पवित्र नदी
✬ पुष्पक – भगवान विष्णूचे वाहन
✬ दिव्य – पवित्र
✬ शुभ – पवित्र
✬ एकता – एकी
✬ फाल्गुनी – सुंदर
✬ रूपल – चांदीपासून बनलेले
✬ पारस – लोखंडाचे सोन्यात रुपांतर करणारा दगड
✬ पूजा – प्रार्थना
✬ ताज – मुकुट
✬ सांज – सायंकाळ
✬ कांचन – सोने
✬ पद्म – कमळ
✬ हिम – बर्फ
✬ यमुना – एक पवित्र नदी
✬ तेजस – उज्वल

Home Names in Marathi

मित्रांनो, जर आपण आपल्या घरासाठी उत्तम दर्जाचे नाव शोधत असाल तर आमचा हा लेख आपल्याला त्याकामी नक्कीच मदत करील. घराच्या रचनेबरोबरच घराचे नावही उत्तम प्रकारचे हवे. कारण ज्याप्रमाणे घराची डिझाईन घराच्या सौदर्यात भर घालते, त्याच प्रमाणे घराचे सुंदर नाव त्या सौंदर्यामध्ये अजूनच उमटून दिसते. त्यामुळे घराचे नाव शोधताना व घराच्या नावाची निवड करताना योग्य काळजी घ्यायला हवी. आम्ही त्यासाठी एक व्हिडिओ देखील उपलब्ध करून दिला आहे. तो देखील तुम्ही पाहू शकता.

व्हिडिओ

आमच्या या लेखाच्या व व्हिडिओच्या मदतीने आपण आपल्या घरासाठी एक चांगले नाव नक्कीच शोधाल अशी आम्हाला खात्री आहे.

जर आपल्याला हि माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक व ज्यांना या नावाची सर्वात जास्त गरज आहे, अशा व्यक्तींना हि माहिती अवश्य शेअर करा. जेणेकरून त्या व्यक्तींना त्यांच्या घरासाठी एक चांगले नाव शोधताना अडचण येणार नाही.

अशाच चांगल्या माहितीसाठी आमच्या Netmarathi या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्या.


Share :

1 thought on “घरांची नावे | घराच्या नावांची यादी मराठी | Home Names in Marathi”

  1. स्वाती हेमंत समीर सलोनि मिळून नाव किंव्हा स्वाती हेमंत मिळून नाव सांगा

    Reply

Leave a Comment