रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय | Increase Immunity Power in Marathi

Share :

How to Increase Immunity Power in Marathi – विविध आजारांना आपल्यापासून दूर ठेवण्यास रोगप्रतिकारक शक्ती मदत करते. ती वाढवण्यासाठीचे उपाय जाणून घ्या.

एक चांगली रोग प्रतिकारक क्षमता आपल्याला विविध आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करते. कोरोना व्हायरसचे संक्रमण जगभरात वाढतच चाललेले आपल्याला दिसून येतच असेल. या व्हायरसमुळे जगभरात हजारो लोकांचे बळी गेलेले आहेत तसेच यामुळे करोडो लोक बाधितही झालेले आहेत. अशावेळी या व्हायरसपासून आपला बचाव कसा करावा? यासंबंधी विविध लोक शोध घेताना आपल्याला दिसून येत असेल.

विविध संशोधकांच्या मते या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी आपली इम्युनिटी सिस्टीम अर्थात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असायला हवी.

How-to-Increase-Immunity-Power-in-Marathi
How to Increase Immunity Power in Marathi

आज या लेखाच्या माध्यमातून आपण आपली इम्युनिटी सिस्टीम चांगली ठेवण्यासाठी काय काय उपाययोजना करता येईल याची माहिती अभ्यासणार आहोत. या सर्व उपाययोजना अगदी साध्या आणि सोप्या आहेत. यासाठी आपल्याला काहीही विशेष काही करण्याची गरज नाही.

Table of Contents

जर आपण काही गोष्टींचे भान राखले आणि आपल्या दिनचर्येत काही बद्दल केले तर त्याचा निश्चितच आपल्याला फायदा होईल.

चला तर मग जाणून घेऊया त्या कोणत्या उपाययोजना आहेत ते…

दररोज व्यायाम करावा

दररोज व्यायाम केल्याने आपल्याला फक्त शारीरिकच नव्हे तर मानसिकही फायदे मिळतात. रोजच्या रोज व्यायाम केल्याने आपल्याला चांगले आरोग्य प्राप्त होते. तसेच आपल्या फुफ्फुस, हृदय यांना व्यवस्थितपणे ऑक्सिजन मिळण्यात मदत होते. त्यामुळे जर आपल्याला आपली इम्युनिटी सिस्टीम मजबूत करावयाची असेल तर रोजच्या रोज व्यायाम करणे गरजेचे आहे.

ताण-तणावाचे योग्य व्यवस्थापन

आजच्या स्पर्धेच्या व धावपळीच्या युगात स्वतः चे अस्तित्व टिकविण्यासाठी प्रत्येक व्यक्तिला मोठी धावपळ करावी लागते. आपले स्थान टिकविण्याचा मोठा दबाव प्रत्येक व्यक्तीवर असतो. यामुळे प्रत्येक व्यक्ती मोठ्या ताणतणावाखाली जीवन जगत असतात. ताण-तणाव हा काही अंशी फायदेशीर जरी असला तरी नेहमीचा आणि अवास्तव ताण-तणाव आपल्या शरीराला खूपच हानिकारक असतो. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा जास्त ताण न घेता त्याचे योग्य व्यवस्थापन करून आपले जीवन शांततामय बनवा.

अति जास्त प्रमाणात ताण-तणाव घेतल्याने आपल्या शरीरावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो, जे थेट आपल्या इम्युनिटी सिस्टीमला हानी पोहचवते. त्यामुळे चांगल्या रोगप्रतिकार शक्तीसाठी ताण-तणावाचे योग्य व्यवस्थापन जरुरी आहे.

शांत झोप

आपल्या सर्वांना हि गोष्ट डॉक्टरांनी देखील सांगितलीच असेल, कि चांगल्या रोगप्रतिकार शक्तीसाठी चांगली व शांत झोप आवश्यक असते.

Immunity-Power-in-Marathi
Immunity Power in Marathi

सध्याच्या धावपळीच्या युगात निद्रानाश ही देखील भरपूर लोकांची मोठी समस्या बनली आहे. यामुळे आपल्या शरीराला चांगला आराम मिळाला नाही तर त्याचा थेट परिणाम आपल्या इम्युनिटी सिस्टीमवर होतो. त्यामुळे शांत झोप हि आपल्या शरीराला आवश्यकच आहे.

धुम्रपान टाळाच

चांगल्या रोगप्रतिकार शक्तीसाठी धुम्रपान टाळण्याचा सल्ला नेहमी दिला जातो. भरपूर लोक या बाबीकडे दुर्लक्ष करतात. परंतु यामागे असे कारण सांगितले जाते, कि ज्यावेळी आपण धुम्रपान करतो त्यावेळी आपल्या फुफ्फुस आणि श्वसनप्रणाली यावर याचा अतिशय वाईट परिणाम होतो. ज्यामुळे आपली प्रतिकार शक्ती अतिशय कमजोर होते.

जर आपल्या शरीराला ऑक्सिजन कमी प्रमाणात मिळाला तर त्याचा थेट आपल्या रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे जर आपल्याला आपली इम्युनिटी सिस्टीम मजबूत ठेवावयाची असेल तर आपण धुम्रपान करणे टाळलेच पाहिजे.

आहारात दह्याचा समावेश

दही हे आपल्या शरीरासाठी खूपच मोलाची भूमिका अदा करते. दह्याच्या सेवनाने आपल्या पाचन शक्तीवरही सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे आपल्या आहारात दह्याचा समावेश निश्चितपणे असायलाच हवा. दही आपल्या रोग प्रतिकारक क्षमतेवर सकारात्मक परिणाम करते. जर आपण रोज एक वाटी दही खाल्ले तर त्याचा आपली प्रतिकारशक्ती वाढण्यास मोठा फायदा होतो, तसेच पोटांचा विकार, वजन कमी करणे, दात व हाडे यांच्यासाठीही चांगला फायदा होतो.

जास्त पाणी पिणे

रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी हा सर्वात सोपा उपाय आहे. ज्यावेळी आपण जास्त पाणी पितो, त्यावेळी शरीरातील काही विषारी घटक आपल्या शरीराबाहेर फेकले जातात. त्यामुळे आपले रोगापासून संरक्षण होते. दिवसभरात किमान 6 ते 8 ग्लास पाणी पिणे आयुर्वेदानुसार आवश्यकच मानले जाते. पाणी पिताना ते अतिशय थंड पिण्याऐवजी थोडेसे कोमट पाणी प्या. कोमट पाणी पिण्याचे खूप सारे अद्भुत फायदे आहेत.

फळे व भाज्यांचे सेवन

सध्या लोक धावपळीच्या नादात सकस आहार जसे कि, फळे, भाजीपाला यांचा आहारात समावेश करत नाहीत. भरपूर लोक बाहेरच्या अन्नपदार्थावर जास्तच ताव मारतात. याचा अतिशय वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतो. त्यामुळे जर आपल्याला आपली इम्युनिटी सिस्टीम मजबूत ठेवायची असेल तर रोजच्या आहारात फळे व भाज्यांचा समावेश करायलाच हवा. शक्यतो जीवनसत्व क युक्त फळे व भाज्यांचा आहारात समावेश असू द्यावा.

विविध रोगांपासून बचाव करण्यासाठी जीवनसत्व क हे अतिशय महत्वपूर्ण भूमिका निभावते, हे आपण नक्कीच कुठेतरी ऐकले असेल किंवा वाचले असेल. त्यामुळे आपल्या रोग प्रतिकारक शक्तीच्या मजबुतीसाठी आहारात लिंबू, आवळा, संत्री या फळांचा समावेश करावा. हि फळे आपल्याला अगदी सहजासहजी उपलब्ध होणारी आहेत. त्यामुळे त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल.

हळदयुक्त दुधाचे सेवन

रोज कमीतकमी एक ग्लास भरून दुध व त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून ते प्यायल्याने आपल्या इम्युनिटी सिस्टीमवर अतिशय चांगला परिणाम होईल. हळदयुक्त दुधामुळे आपल्या शरीरातील कफ तसेच सर्दीवर याचा चांगला परिणाम होतो. आपली रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास यामुळे मदत होते. हळदीयुक्त दुध प्यायल्यावर मात्र लगेच काहीही खाऊ अगर पिऊ नका.

जीवनसत्व ड

शरीराच्या रोगप्रतिकारक क्षमतेत वाढ करण्यासाठी ड जीवनसत्वदेखील महत्वाचे मानण्यात आले आहे. सूर्यप्रकाश हा जीवनसत्व ड चा मुख्य व सहजासहजी उपलब्ध होणारा स्रोत मानला जातो. सकाळच्या कोवळ्या उन्हातून आपल्या शरीराला जीवनसत्व ड मिळते. त्यामुळे सकाळी सकाळी थोडा वेळ कोवळ्या उन्हात बसणे हे आपल्या रोगप्रतिकार शक्तीत वाढ करण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे.

तर मित्रांनो, हे होते रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काही सोपे उपाय. आपली रोगप्रतिकार शक्ती म्हणजेच इम्युनिटी सिस्टीम जर मजबूत असेल तर आपले विविध रोगांपासून संरक्षण होते. आपण विविध आजारांना बळी पडत नाही. जेव्हापासून जगात व देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे, तेव्हापासून तर रोग प्रतिकारक प्रणालीला खूपच महत्व प्राप्त झाले आहे. आम्ही दिलेल्या उपाययोजनांचा वापर करून आपण आपली रोग प्रतिकारक शक्ती मजबूत बनवू शकता.

जर हि माहिती आपल्याला आवडली असेल तर नक्कीच आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, आप्तस्वकीयांना शेअर करा. जेणेकरून त्यांनादेखील त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवता येईल.

अशाच प्रकारच्या नवनवीन व दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी आमच्या www.Netmarathi.com या वेबसाईटला भेट द्या.


Share :

Leave a Comment