आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात खूप साऱ्या अशा गोष्टी घडत असतात कि ज्याबद्दल आपण नेहमी कधी ना कधी विचार केला असेल. आपल्याला नेहमी या गोष्टीचे कुतूहल वाटत असते. अशाच एका मजेदार परंतु माहितीपूर्ण गोष्टीबद्दल आम्ही आज याठिकाणी माहिती सांगणार आहोत.
मित्रांनो, माशी ही आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाच्या घरात असेलच. कारण कितीही स्वच्छता ठेवली तरी कुठूनतरी हि येणार म्हणजे येणार…!
![]() |
Mashi Pay ka Ghasate |
आपल्यापैकी बहुतेक लोक त्यामुळे खूपच वैतागलेले असतील. विशेषतः स्रीवर्ग तर या माशीला खूपच कंटाळलेला असेल. मित्रांनो, जरी माशी हि किळसवाणी असली तरी तिच्या एका सवयीबद्दल आपणही कधी ना कधी नक्कीच विचार केला असेल… तो म्हणजे ती स्वतः चे पुढचे दोन्ही पाय एकमेकांवर का घासते?
तर चला जाणून घेऊया कि अशी काय कारणे आहेत कि ज्यामुळे माशी स्वतः चे पाय नेहमी एकमेकांवर घासत असते.
ज्यावेळी आपण एखादा पदार्थ बनवतो, त्यावेळी जर त्यावर माशी बसली तर आपण तो पदार्थ खाण्यायोग्य नाही असे म्हणतो. जर एखाद्या पदार्थात माशी पडली तर आपण तो पदार्थ फेकून देण्यासही मागे पुढे पाहत नाही. मग तो चहा असो, कॉफी असो कि दुध असो…
सर्वात अस्वच्छ वर्ग म्हणून माशीकडे पाहिले जाते. ज्यावेळी माशी एखाद्या पृष्ठभागावर बसते त्यावेळी ती नेहमी एक कृती करत असते. तुम्हीही हे नक्की पाहिले असेल. ती एखाद्या पृष्ठभागावर बसते तेव्हा ती तिचे स्वतः चे पुढचे दोन पाय एकमेकांवर घासते. ती असे का करते? याचे अनेकांना कुतूहल असते.
माशीच्या शरीराची रचनाच अशी आहे कि, तिला सभोवतालच्या जगाची जाणीव होण्यासाठी विविध अवयव निसर्गाने दिलेले आहेत. माशीच्या डोळ्यावर, तिच्या अँटेनावर तसेच तिच्या शरीर व पायांवर असलेल्या ब्रिस्टल्स म्हणजे बारीक केसांमुळे तिला नेहमी सभोवतालच्या जगाची जाणीव होत असते. माशीचे डोळे हे सभोवताली काय चालले आहे, हे बघण्यासाठी असतात, तर ब्रिस्टल्स हे पदार्थ ओळखण्यासाठी असतात. म्हणजेच पदार्थ गोड आहे कि कडू आहे, तो विषारी तर नाही ना…! तो पदार्थ खाण्यायोग्य आहे का? हे ओळखण्यासाठी हे ब्रिस्टल्स माशीला मोलाची मदत करतात. म्हणून माशी योग्य अन्न शोधण्यासाठी व इतर शत्रूपासून वाचण्यासाठी तिचे ज्ञानेंद्रिये अर्थात ब्रिस्टल्स नेहमी स्वच्छ करत असते.
आता ते ब्रिस्टल्स पायावर असतात, म्हणून त्या त्यांचे पाय नेहमी एकमेकांवर घासत असतात. माशा फक्त पायच स्वच्छ करतात असे नाही, तर त्या त्यांचे डोके व पंखही नेहमी साफ करत असतात.
त्यांच्या पायावर एक प्रकारचे चिकट द्रव असते. या द्रवामुळे विविध जीवाणू व विषाणू त्यांच्या पायाला चिकटून राहतात. मग ज्यावेळी त्या एका पदार्थावरून दुसऱ्या पदार्थावर जातात, त्यावेळी या जीवाणू व विषाणूचे देखील वहन करतात. त्यामुळे हे अन्नपदार्थ लवकर खराब होतात. हे जीवाणू व विषाणू दूर करण्यासाठी देखील माशा आपले पाय एकमेकांवर घासत असतात. त्यामुळे ते विषाणू व जीवाणू आपल्या खाद्यपदार्थात मिसळून रोगराई पसरण्याचा धोका निर्माण होतो. तर हि काही कारणे आहेत, ज्यामुळे माशा नेहमी त्यांचे स्वतः चे पाय एकमेकांवर घासत असतात.
तर मित्रांनो आम्हाला खात्री आहे कि आपल्याला जो प्रश्न पडला होता कि, माशी हि तिचे स्वतः चे पाय नेहमी का घासते? या लेखाच्या माध्यमातून आपल्या या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळालेच असेल.
जर आपल्याला हि माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांनादेखील शेअर करा. म्हणजे त्यांच्याही सामान्य ज्ञानात भर पडेल.
अशाच प्रकारचे मजेशीर, रंजक परंतु माहितीयुक्त लेख वाचण्यासाठी वेळोवेळी www.Netmarathi.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या.