कुतुबमिनार संदर्भात रोचक तथ्य, जे आपण यापूर्वी कधीही ऐकले नसेल...

Qutub Minar Information in Marathi - आजच्या लेखात आपण कुतुबमिनार संदर्भात काही रोचक तथ्य तसेच मराठी माहिती जाणून घेणार आहोत, जी आपल्यासाठी नवीन असेल.


जर आपण दिल्लीला भेट देण्याचा विचार करत असाल तर आपण निश्चितपणे तेथील कुतुबमिनारला अवश्य भेट दिली पाहिजे. आज या लेखात आपण कुतुबमिनारच्या संदर्भात काही रोचक तथ्य जाणून घेणार आहोत, कि ज्याच्याविषयी आपण यापूर्वी नक्कीच ऐकले नसेल.


Qutub-Minar-Information-in-Marathi


कुतुबमिनारचे नाव डोळ्यासमोर येताच आपल्या डोळ्यासमोर दिल्ली हे शहर येत असेल. दिल्लीच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या या कुतुबमिनारचे भरपूर वैशिष्ट्ये व काही रोचक तथ्य आहेत. चला तर जाणून घेऊया...


Qutub Minar Information in Marathi

1) कुतुबमिनार भारताची राजधानी दिल्ली येथे स्थित असून याची उंची जवळपास 72.5 मीटर म्हणजेच तब्बल 237.86 फुट इतकी आहे.

2) कुतुबमिनारच्या पायाचा व्यास 14.3 मीटर आहे, तर त्याच्या शिखराचा व्यास  2.75 मीटर आहे.

3) कुतुबमिनारच्या निर्मितीचे श्रेय कुतुबुद्दीन ऐबकला जाते, ज्याने 1193 मध्ये याच्या निर्माणाची सुरुवात केली.

4) सन 1505 मध्ये कुतुबमिनारचे भूकंपामुळे अतोनात नुकसान झाले होते, तेव्हा सिकंदर लोधीने त्याची डागडुजी केली होती.


5) कुतुबमिनारची निर्मिती लाल आणि पिवळसर दगडांनी केलेली आहे.

6) कुतुबमिनारच्या आसपासच्या जागेला कुतुब कॉम्प्लेक्स या नावाने ओळखले जाते.

7) कुतुबमिनारच्या जवळील परिसरात एक लोहस्तंभ उभा आहे, जो जवळजवळ 2000 वर्षापासून उभा आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, यावर अजूनही कोणत्याही प्रकारचा गंज चढलेला नाही.

8) कुतुबमिनारमध्ये जवळपास 379 पायऱ्या आहेत.


तर मित्रांनो, आम्हाला खात्री आहे कि कुतुबमिनारच्या संदर्भात काही रोचक तथ्य वाचून आपल्या सामान्य ज्ञानात नक्कीच भर पडली असेल. जर आपल्याला हि माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा.


अशाच प्रकारच्या दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी आमच्या www.Netmarathi.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0 Comments