ताजमहाल संदर्भात 15 रोचक तथ्य, ज्याबाबत आपल्याला माहिती नसेल…

Share :

Taj Mahal Information in Marathi – आज या लेखात आपण ताजमहाल विषयी असे काही रोचक तथ्य जाणून घेणार आहोत कि ज्याबाबत कदाचित आपल्यालाही माहिती नसेल…

Taj Mahal Information in Marathi

जगातील 7 आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहाल संदर्भात काही रोचक तथ्य आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. हे रोचक तथ्य ज्याबाबत आपल्यालाही माहिती नसेल. ताजमहाल हे भारतातील आग्रा शहरात यमुना नदीकाठी स्थित आहे. हे एक स्मारक असून त्याच्या विशेष सौंदर्यामुळे ते जगातील सात आश्चर्यांपैकी एक मानले गेले आहे.

आपल्यापैकी बहुतेक जणांनी ताजमहाल कधी ना कधी प्रत्यक्षात बघितलाच असेल. काही जणांचा भविष्यात ताजमहालला भेट देण्याचा नियोजित प्लॅन असेल. काहींनी कुठेतरी नक्कीच ताजमहालविषयी ऐकले तरी असेल.

Taj-Mahal-Information-in-Marathi
Taj Mahal Information in Marathi

चला तर मग जाणून घेऊया ताजमहाल विषयी काही रोचक तथ्य, ज्याबाबत तुम्ही कधी ऐकलेही नसेल…

ताजमहालची निर्मिती करण्यासाठी एकूण 22 वर्ष लागले. ताजमहालच्या निर्मितीसाठी जवळजवळ 22 हजार मजुरांचे योगदान आहे. ताजमहाल बांधण्याची सुरुवात 1632 मध्ये होऊन त्याचे काम 1654 मध्ये पूर्ण झाले.

आपल्याला हे वाचून तर आश्चर्याचा धक्का बसेल कि, ताजमहाल हा लाकडांच्या आधारावर उभा आहे. तर मित्रांनो हि गोष्ट खरी आहे. हि लाकडे टिकण्यासाठी आर्दतेची गरज भासते कि जी यमुना नदीच्या पाण्यातून मिळते.

ताजमहाल हे जगातील सर्वाधिक जास्त भेटी दिले जाणारे स्थळ आहे. ताजमहाल बघण्यासाठी जगभरातून दररोज जवळजवळ 12 हजार पर्यटक येत असतात.

ताजमहालच्या शेजारी 41.6 मीटर उंचीचे एकूण 4 मिनार आहेत. ते बाहेरच्या बाजूस थोडेसे झुकलेले आहेत, जेणेकरून जर भुकंपासारखी परिस्थिती उद्भवली तर ते मकबऱ्यावर न पडता बाहेरच्या बाजूस पडेल व मुख्य मकबऱ्याचे संरक्षण होईल.

पांढराशुभ्र ताजमहालची निर्मिती केल्यावर शहाजहानचा अजून एक काळा ताजमहाल बांधण्याचा विचार होता. जेणेकरून पांढराशुभ्र ताजमहालाचे सौंदर्य अजून खुलून दिसेल. परंतु पुढे शहाजहानला त्याच्याच पुत्राने औरंगजेबाने कैद केली आणि त्याचा तो मनसुबा फक्त मनसुबाच राहिला.

ताजमहालची निर्मिती करण्यासाठी त्यावेळी एकूण 3.2 कोटी रुपये खर्च आला होता. जर ताजमहालची निर्मिती आताच्या काळात केली असती तर त्यासाठी जवळपास 7000 कोटी रुपये खर्च आला असता.

ताजमहालचा रंग वेगवेगळ्या वेळी बदलत असतो. सकाळी पाहिल्यावर तो गुलाबी रंगाचा दिसतो. रात्री पाहिल्यावर तो पांढऱ्या रंगाचा दिसतो तर चांदण्या रात्री तो सोन्यासारखा दिसतो.

ताजमहालचे सर्व कारंजे एकाचवेळी कार्यरत होतात. त्या सर्व कारंजाच्या खाली तांब्याच्या टाक्या आहेत. त्या सर्व टाक्या एकाचवेळी भरतात व त्यावर दाब आल्यावर त्या एकत्रच पाणी सोडतात.

दुसरे महायुद्ध, 1971 चे भारत-पाक युद्ध आणि अमेरिकेतील 9/11 च्या हल्ल्यावेळी ताजमहालाची सुरक्षा लक्षात घेऊन व त्यावर कोणताही हल्ला होऊ नये म्हणून त्यावर बांबूच्या लाकडांचे आच्छादन बांधण्यात आले होते.

ताजमहाल बांधतेवेळी 28 प्रकारच्या किमती दगडांनी त्याला सजवण्यात आले होते. पुढे ते दगड इंग्रजांनी काढून घेतले होते.
ताजमहाल पाहण्यासाठी दरवर्षी जवळपास 40 लाख पर्यटक येत असतात.

आपल्याला जर हा प्रश्न विचारला कि ताजमहाल उंच कि कुतुबमिनार? तर आपल्यापैकी बहुतेक लोक कुतुबमिनार उंच आहे असे उत्तर देतील. मात्र आपल्याला हे वाचून आश्चर्य वाटेल कि ताजमहाल हा कुतुबमिनारपेक्षा जवळपास 5 फुटांनी उंच आहे.

आपण लहानपणापासून हे ऐकत आलो आहे कि, ताजमहाल बांधणाऱ्या मजुरांचे हात शहाजहानने कापून टाकले होते, जेणेकरून त्यांनी असा ताजमहाल पुन्हा बांधू नये. परंतु या गोष्टीचे समर्थन करणारा एकही पुरावा सध्यातरी उपलब्ध नाहीये. उलट “अहमद लौहरी” ज्याने ताजमहाल निर्मितीमध्ये योगदान दिले होते, त्यानेच पुढे लाल किल्ल्याच्या निर्मितीतही योगदान दिले होते.

ताजमहाल एखाद्या श्रीमंत व्यक्तीला खरेदी करता येईल का? या प्रश्नाचे उत्तर आहे, “नाही”. कारण ताजमहाल हे एक स्मारक असल्यामुळे त्याची खरेदी करता येणार नाही.

ताजमहालच्या निर्मितीत एकूण 1000 हत्ती वापरण्यात आले होते.

तर मित्रांनो, आम्हाला खात्री आहे कि ताजमहाल संदर्भात आम्ही दिलेल्या माहितीने आपल्या ज्ञानात भर पडली असेल. आम्हाला खात्री आहे कि हि माहिती आपल्याला नक्की आवडली असेल. हि माहिती आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. जेणेकरून त्यांनादेखील ताजमहालासंबंधी रोचक तथ्य माहिती होईल.

अशाच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी आमच्या www.Netmarathi.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.


Share :

Leave a Comment