या गावात प्रवेश करण्यापूर्वी काढावा लागतो चक्क शरीराचा हा अवयव...

A Village with Strange Rules - पृथ्वीतलावर एक गाव आहे, जेथे प्रवेश करण्यापूर्वी चक्क शरीराचा एक अवयवच काढावा लागतो. आपल्याला आहे का माहिती याविषयी...

आपले जग हे विविध अचंबित करणाऱ्या रोचक बाबींनी भरलेले आहे. आपल्याला रोजच्या रोज अशा काही बातम्या ऐकू येत असतात कि ज्या ऐकून क्षणभर आपण त्यावर विश्वासच ठेवत नाही. आजचा हा लेख वाचूनही आपण असेच म्हणाल कि "हे खरंय का?" 🤔

मित्रांनो ज्यावेळी आपण पर्यटन करण्यासाठी निघतो त्यावेळी आपण शक्यतो ज्याठिकाणी आपल्याला जायचे आहे, त्या ठिकाणाची माहिती करून घेतो. कधी कधी आपण त्या स्थळाची माहिती न घेताही प्रवासाला सुरुवात करतो. परंतु जर आम्ही आपल्याला हे सांगितले कि पृथ्वीतलावर एक गाव असे आहे, कि ज्याठिकाणी प्रवेश केल्यावर आपल्याला आपल्या शरीराचा एक अवयवच काढावा लागतो तर... तर आपण कधीच त्या गावात जाण्याचा विचार करणार नाही. आपण त्या गावापासून दूर राहणेच पसंत कराल. 😅

A-Village-with-Strange-Rules
A Village with Strange Rules

आजच्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत कि, पृथ्वीतलावर असे कोणते गाव आहे कि जेथे प्रवेश करण्यापूर्वी चक्क आपल्या शरीराचा एक अवयवच काढावा लागतो...!

अंटार्क्टिका म्हणजेच दक्षिण धृवावरील एक गाव असे आहे, कि जेथे गावात प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला आपल्या शरीरातील अपेंडिक्स हा शरीरातील आतड्याचा भाग काढून टाकावा लागतो. या गावाचे नाव आहे, "व्हिलास लास एस्ट्रेलास".

या गावात चिली या देशातील लोक राहतात. याठिकाणी हा नियम मोठ्या लोकांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांना सक्तीचा करण्यात आला आहे. याठिकाणी जगभरातील विविध लोक भेट देत असतात. ज्या व्यक्तींना इथे काही दिवसाचा मुक्काम करायचा आहे, त्यांना तिथे राहण्यापूर्वी आपली शस्रक्रिया करून आपले अपेंडिक्स काढून टाकावे लागते.

हे वाचा : ताजमहाल संदर्भात 15 रोचक तथ्य, ज्याबाबत आपल्याला माहिती नसेल...

खरे तर असे म्हटले जाते कि, आपल्या आतड्याचा भाग असणाऱ्या अपेंडिक्सचा मानवी शरीराला काहीच उपयोग नसतो. हे अपेंडिक्स काढून घेतले तरी त्याचा कोणताही नकारात्मक परिणाम शरीरावर होत नाही. त्याचा काहीही उपयोग नसूनही तो आपल्या शरीरात असतो. जर अपेंडिक्सचा त्रास सुरु झाला तर मात्र तो खूपच वेदना देणारा असतो. त्यामुळे हे अपेंडिक्स शस्रक्रिया करून काढून टाकावे लागते.

व्हिलास लास एस्ट्रेलास या गावाची गोष्ट थोडीशी वेगळी आहे. आपण वर बघितलेच आहे कि, हे गाव अंटार्क्टिकामध्ये आहे. येथे खूपच मोठ्या प्रमाणात हाडे गोठवणारी थंडी असते. अशा या हाडे गोठवणाऱ्या थंडीत अपेंडिक्सचे साधे दुखणेही जीवघेणे ठरू शकते. या गावापासुनचे सर्वात जवळचे हॉस्पिटल तब्बल एक हजार किलोमीटर अंतरावर किंग जॉर्ज आयलंडवर आहे. त्या हॉस्पिटलपर्यंत पोहचण्याचा मार्गही अतिशय कठीण, दुर्गम आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या जिवाला अपेंडिक्समुळे धोका उद्भवू नये, यासाठी या गावात असा नियम करण्यात आला आहे. या गावात यापूर्वी अशा घटना घडल्यामुळे असा नियम करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

मित्रांनो पाहिलेत आपल्या पृथ्वीतलावर अतिशय रंजक अशी ठिकाणे आहेत, हे "व्हिलास लास एस्ट्रेलास" ठिकाण त्यापैकी एक आहे. जेथे जाण्यापूर्वी आपल्याला चक्क शरीराचा अवयवच काढावा लागतो. आपण या गावात जाणे पसंत कराल का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

हे वाचा : माशी नेहमी तिचे समोरील दोन्ही पाय का घासते? तुम्हाला आहे का माहिती...

हि रंजक माहिती आपल्याला कशी वाटली ते देखील आम्हाला नक्की कळवा. जर आपल्याला हि माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. जगातील या अद्भुत गावाबद्दल व त्याच्या असणाऱ्या या विशिष्ट नियमाबद्दल त्यांनादेखील समजू द्या.

अशाच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी आमच्या www.Netmarathi.com या वेबसाईटला भेट द्या.