समुद्री लुटेरे किंवा चाचे डोळ्यावर काळी पट्टी का लावतात? तुम्हाला आहे का माहित...

Why Pirates use the Black Band on their Eye - या लेखात आपण समुद्री लुटेरे किंवा चाचे डोळ्यावर काळी पट्टी का लावतात? ही माहिती  जाणून घेणार आहोत...


जगात विविध प्रकारच्या अशा काही गोष्टी असतात कि ज्या बघून आपणही कधी कधी नकळतपणे विचार करण्यास सुरुवात करतो. असाच एक प्रश्न आपल्या सर्वांना कधी ना कधी पडलेलाच असेल कि समुद्री लुटेरे किंवा समुद्री चाचे ज्यांना आपण "पायरेट्स" देखील म्हणतो, ते आपल्या डोळ्यावर काळी पट्टी का बांधतात? काय कारण असेल कि ज्यामुळे ते आपल्या डोळ्यावर काळी किंवा इतर रंगांची पट्टी बांधतात? असा प्रश्न आपल्यापैकी बहुतेक जणांना नक्कीच पडला असेल.


Why-Pirates-use-the-Black-Band-on-their-Eye

आपण लहानपणी ज्यावेळी चोर पोलीस खेळ खेळायचो, त्यावेळी बहुतेक जण जे या खेळात चोर बनलेले असत, ते नक्कीच आपल्या डोळ्यावर अशी पट्टी बांधत असत. आपणही बहुतेक जणांना अशा प्रकारे बघितलेच असेल.


आपल्यापैकी बहुतेक जणांना असे देखील वाटत असेल कि समुद्री चाच्यांचा एक डोळा निकामी झालेला असेल किंवा फुटलेला असेल... म्हणून ते डोळ्यावर काळी पट्टी लावतात...पण मित्रांनो असं नाहीये?


मित्रांनो, हे खरे आहे कि ह्या समुद्री लुटारूंना नेहमीच धोक्याचा सामना करावा लागतो. त्यात प्रतिस्पर्धी टोळीकडून किंवा पोलिसांकडून त्यांना नेहमीच धोका असतो, तसेच समुद्रात देखील त्यांना खूपच धोका असतो. बदलत्या परिस्थितीचा, हवामानाचा त्यांनादेखील फटका बसतोच. त्यांच जगण हे शांत कधीच नसते. त्यांच्या डोक्यावर कायमच धोक्याची टांगती तलवार असते.



आज या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत कि अशी काय कारणे आहेत, कि ते समुद्री चाचे आपल्या डोळ्यावर काळी पट्टी बांधतात?


सर्वप्रथम आपण समुद्री चाचे किंवा लुटेरे कोणाला म्हणतात, ते समजून घेऊया...


नावावरूनच आपल्याला समजले असेल, कि समुद्री चाचे हे नक्कीच समुद्राशी संबंधित असतील. समुद्री चाचे म्हणजे समुद्रात लुटालूट करणारे लुटारू. हे लोक किनाऱ्यावरून जाणारी जहाजे किंवा इतर होड्या अडवून त्यावरील लोकांकडून किमती चीजवस्तू, सोने-नाणे यांची लुटमार करतात. कधी कधी काही चाचे हि जहाजे व त्यावरील लोकांना ओलीस ठेवून संबंधित देशाकडून मोठ्या प्रमाणात खंडणी उकळण्याचा प्रयत्न करतात.


Samudri-Lutere-Dolyavar-Kali-Patti-ka-Bandhatat


समुद्री लुटेरे हे फक्त आणि फक्त किमती चीजवस्तू किंवा सोने-चांदी यांचीच लुट करतात असे नाही... तर ते संबंधित जहाजावरील शस्रे, कपडे, अन्नधान्य, पाणी, दारू यांचीही लुट करतात. जर यासाठी कोणी त्यांना विरोध केला तर ते संबंधित व्यक्तीस ठार मारण्यास देखील मागेपुढे पाहत नाहीत.


डोळ्याला काळी पट्टी बांधण्याचे कारण...

आपण हे नक्कीच अनुभवले असेल कि ज्यावेळी आपण उजेडातून एखाद्या अंधाऱ्या खोलीत किंवा अंधाऱ्या जागी जातो, त्यावेळी आपल्याला काही क्षण समोरचे अजिबात दिसत नाही. विविध संशोधकांच्या मते, उजेडातून अंधाऱ्या जागी प्रवेश केल्यावर आपल्याला अगदी व्यवस्थित दिसण्यासाठी काही वेळ लागू शकतो.


आपण वर माहिती बघितल्याप्रमाणे या समुद्री चाच्यांना नेहमी धोक्याचा सामना करावा लागतो. अशावेळी त्यांची एक चुकी किंवा हलगर्जीपणा त्यांच्या जीवावर बेतू शकतो. कधी कधी हे लुटारू रात्रीच्या वेळी एखादे जहाज लुटण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी रात्रीच्या अंधारात त्यांना दिसण्यास कोणतीही अडचण येऊ नये... यासाठी किंवा उजेडातून अंधारात गेल्यावर लवकरात लवकर ऍडजेस्ट होण्यासाठी ते डोळ्यावर पट्टी बांधतात, असे कारण सांगितले जाते.


ज्यावेळी आपण उजेडातून एखाद्या अंधाऱ्या खोलीत जातो, त्यावेळी आपल्याला थोडावेळ अजिबात काहीही दिसत नाही. मात्र जर आपण उजेडातून अंधाऱ्या खोलीत जाण्याच्या अगोदर डोळ्यावर काळी पट्टी बांधली तर उजेडातून अंधारात गेल्यावर आपल्याला लवकर दिसेल.


कधी कधी शत्रूकडून हल्ला झाल्यावर हे समुद्री लुटेरे डेकच्या खाली जात असत, जेथे खूपच अंधार असे. त्यामुळे या अंधाऱ्या खोलीत स्वतः ला लवकरात लवकर ऍडजेस्ट करण्यासाठी ते डेकमध्ये प्रवेश करण्यापूर्वी एका डोळ्यावरील पट्टी दुसऱ्या डोळ्यावर लावत असत. जेणेकरून त्या अंधाऱ्या खोलीत ते लवकरात लवकर ऍडजेस्ट होतील किंवा जर एखादा शत्रू त्या खोलीत अगोदरच लपून बसला असेल तर तो त्यांना लवकर दिसेल.


मित्रांनो, हे लुटारू किंवा चाचे आपल्या डोळ्यावर काळी पट्टी का बांधत होते? हे सिध्द करण्यासाठी कुठलाही पुरावा किंवा नोंद आढळत नाही. मात्र जर थोडासा विचार केला तर आपल्या लक्षात हि बाब नक्की येईल, कि ते स्वतः चे संरक्षण करण्यासाठी डोळ्यावर पट्टी बांधत असावेत...



तर मित्रांनो, आम्हाला खात्री आहे कि आता आपल्या मनात कोणताच प्रश्न उरला नसेल कि, समुद्री लुटेरे किंवा चाचे आपल्या स्वतः च्या डोळ्यावर काळी पट्टी का बांधतात...


जर आपल्या काही शंका असतील तर त्या आपण कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा...


हि माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करून त्यांना देखील हि माहिती समजण्यास साहाय्य करा.


अशाच प्रकारच्या मजेदार, रंजक व आपल्या ज्ञानात भर घालणाऱ्या माहितीसाठी वेळोवेळी आमच्या www.Netmarathi.com या वेबसाईटला भेट द्या.