Chanakya Quotes in Marathi | आचार्य चाणक्य यांचे 50+ अनमोल विचार

Share :

Chanakya Quotes in Marathi – या लेखात आपण आचार्य चाणक्य यांचे अनमोल वचन, Marathi Suvichar, Quotes वाचणार आहोत. आपल्याला हे अनमोल वचन नक्की आवडतील.

Acharya Chanakya Quotes in Marathi

भारतातील एक महान विद्वान म्हणून आपण सर्वजण आचार्य चाणक्य यांना ओळखतो. आचार्य चाणक्य हे खूप मोठे तत्वज्ञानी होते, तसेच ते एक अर्थशास्त्रज्ञ, राजकारणीदेखील होते. आचार्य चाणक्य यांचे विचार खूपच महान होते. त्यांचे विचार आजदेखील खूपच उपयोगी पडणारे असे आहेत.

त्यांना आपण विष्णुशास्त्री तसेच कौटिल्य या नावाने देखील ओळखतो.

त्यांना विविध विषयाचे ज्ञान अवगत होते. त्यामध्ये राजकारण, विज्ञान, अर्थशास्त्र, युद्धकला याबरोबरच इतरही भरपूर विषयाचे त्यांना ज्ञान अवगत होते.

आम्ही आपल्याला याठिकाणी त्यांचे काही सुप्रसिध्द वचन देणार आहोत, कि जे वाचून तुम्हाला तुमच्या आयुष्यात त्याचा नक्कीच उपयोग होईल.

चला तर मग सुरु करूया…

chanakya-quotes-in-marathi
Chanakya Quotes in Marathi

कोणतीही व्यक्ती आपल्या कर्माने महान बनते,
जन्माने नाही.
आचार्य चाणक्य

शिक्षण एक चांगला मित्र आहे.
ज्ञानी व्यक्तीला सर्वत्र सन्मान, आदर मिळतो.
तारुण्य आणि सौंदर्य यापेक्षा शिक्षण श्रेष्ठ आहे.
आचार्य चाणक्य

कोणतेही काम सुरु करण्याच्या अगोदर स्वतः ला
नेहमी खालील 3 प्रश्न विचारा…
1) मी हे का करत आहे?
2) याचा काय परिणाम होऊ शकतो?
3) मी या कामामध्ये यशस्वी होईल का?
जर काम करण्याच्या अगोदर या प्रश्नांची उत्तरे मिळाली तर तुम्ही योग्य मार्गावर आहात आणि तुमच्या जिंकण्याची शक्यता देखील कैकपटींनी वाढते.
आचार्य चाणक्य

निर्दोष व्यक्तीला शिक्षा देऊन तुम्ही
अजून एक नवीन शत्रू बनवता.
आचार्य चाणक्य

आयुष्यातील तीन मंत्र नेहमी लक्षात ठेवा :-
1) आनंदात वचन देवु नका.
2) रागामध्ये उत्तर देवू नका.
3) दु: खामध्ये निर्णय घेवू नका.
आचार्य चाणक्य

आपण आनंदात असणे, हेच आपल्या
शत्रूचे दुःखाचे मूळ कारण असते,
आणि
हीच त्याला सर्वात मोठी शिक्षादेखील असते.
आचार्य चाणक्य

क्रोध मूर्खपणापासून सुरु होऊन पश्चातापावर नष्ट होतो.
जो व्यक्ती स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण ठेवतो त्याला यश प्राप्त होत.
आचार्य चाणक्य

कधीच कोणासमोर स्वतःचे स्पष्टीकरण नका देऊ.
कारण ज्याला तुमच्यावर विश्वास आहे,
त्याला स्पष्टीकरणाची गरज नाही
आणि
ज्याला तुमच्यावर विश्वास नाही,
तो तुमच्या स्पष्टीकरणावर विश्वास ठेवणार नाही.
आचार्य चाणक्य

एकदा आपण कोणतेही काम सुरु करता
तेव्हा त्याच्या अपयशाबद्दल घाबरू नका
किंवा त्याचा विचारही करू नका.
जे लोक प्रामाणिकपणे आपले कार्य करतात,
ते सर्वाधिक आनंदी असतात.
आचार्य चाणक्य

कर्ज, शत्रू आणि आजारपण यांना कधीच कमी समजू नका.
शक्य असल्यास त्यांना आपल्याजवळ
फिरकूही देऊ नका.
आचार्य चाणक्य

महिला आणि पैसे दोघेही कधीही फसवणूक करू शकतात,
म्हणून या दोघांबद्दल नेहमीच हुशार रहा.
आचार्य चाणक्य

ज्या व्यक्तीचे पोट भरलेले असते,
त्या व्यक्तीला चांगले अन्नही निरुपयोगी आहे.
आचार्य चाणक्य

मृत्यू कधीही झोपत नाही,
तो नेहमी जागृत असतो,
म्हणून मृत्यूला कधीही विसरू नका.
आचार्य चाणक्य

व्यक्तीच्या मनात नेमके काय चालले आहे?
हे त्याच्या वर्तनावरून लक्षात येते.
आचार्य चाणक्य

बुद्धिमान व्यक्तीचा कोणीही शत्रू नसतो.
आचार्य चाणक्य

प्रत्येक मैत्रीमागे स्वतःचा स्वार्थ लपलेला असतो.
स्वार्थाशिवाय मैत्री नसते.
हे जीवनातील एक कटू सत्य आहे.
आचार्य चाणक्य

जी व्यक्ती जिंकण्याची तसूभरही शक्यता नसताना देखील हार मानत नाही,
त्या व्यक्तीला या संसारातील कोणतीही शक्ती
पराभूत करू शकत नाही.
आचार्य चाणक्य

संकटाच्या वेळी नेहमी बुद्धीची परीक्षा होत असते,
आणि
तिच आपल्या कामाला येते.
आचार्य चाणक्य

ज्याठिकाणी तुमचा सन्मान होत नाही,
त्याठिकाणी एक क्षणभर देखील थांबू नका.
आचार्य चाणक्य

बरेच गुण असूनही,
फक्त एक दुर्गुण सर्व काही नष्ट करू शकतो.
आचार्य चाणक्य

दुसऱ्याजवळ असणाऱ्या धनाचा लोभ ठेवणे
हेच आपल्या अधोगतीचे कारण असते.
आचार्य चाणक्य

तुम्हाला जे करायचे आहे,
ते जोरदारपणे करा,
आणि
मनापासून करा.
हि गोष्ट सिंहापासून शिका.
आचार्य चाणक्य

आपल्या गुप्त गोष्टी कोणालाही सांगू नका,
ज्या गोष्टी तुम्ही गुप्त ठेवू शकत नाही,
त्या दुसरे लोक कसं काय गुप्त ठेवू शकतात.
स्वतःच्या गुप्त गोष्टी दुसऱ्याला सांगण्याची हि सवय तुमच्यासाठी
घातक सिद्ध ठरू शकते.
आचार्य चाणक्य

आळशी लोकांना ना वर्तमान असतो,
ना भविष्य…
आचार्य चाणक्य

तुम्ही बोलत असताना जो इकडे-तिकडे पाहतो
त्याच्यावर कधीही  विश्वास ठेवू नका.
आचार्य चाणक्य

हे वाचा : Marathi Suvichar | सर्वोत्तम व सुंदर मराठी सुविचार

Chanakya Suvichar in Marathi

नशीबसुद्धा बहादूर लोकांचीच साथ देते.
आचार्य चाणक्य

जेव्हा भिती तुमच्यावर आक्रमण करेल,
तेव्हा तुम्हीही त्याच्यावर तुटून पडा

त्याचा नाश करा.
आचार्य चाणक्य

आपल्यातील कमतरता कधीही इतरांना सांगू नका,
ते तुमच्यासाठी घातक सिध्द ठरू शकते.
आचार्य चाणक्य

सामर्थ्यवान शत्रू आणि
कमकुवत मित्र नेहमी हानीच करतात.
आचार्य चाणक्य

अवास्तव खर्च कुबेरालादेखील कंगाल करेल,
त्यामुळे खर्च मर्यादेत असू द्या.
आचार्य चाणक्य

कोणतीही व्यक्ती प्रमाणापेक्षा अधिक इमानदार
आणि
सरळ स्वभावाची असता कामा नये,
कारण,
जंगलातील सरळ वृक्ष
आणि
समाजातील सरळ व्यक्ती
सर्वात अगोदर कापल्या जातात.
आचार्य चाणक्य

भूतकाळात जे घडले,
त्यामुळे दुःखी होऊ नका.
चिंता आणि बेचैनी सोडून
वर्तमानकाळाचा सदुपयोग भविष्य सावरण्यासाठी
केला पाहिजे.
आचार्य चाणक्य

नियती म्हणजे केवळ योगायोग नाही,
ती प्रत्येक व्यक्तीला अडचणीतून
बाहेर पडण्यासाठी अनेक पर्याय तयार करून ठेवत असते..
बुद्धीमान मनुष्य त्या पर्यायांना ओळखून त्यातून योग्य पर्याय निवडतो.
सर्व काही नशिबाच्या हवाली टाकून बसणारा मनुष्य
सदैव दु:ख आणि कष्ट भोगत असतो.
असे लोक जीवनात काहीही करू शकत नाहीत…
आचार्य चाणक्य

जगातील सर्वाधिक बलाढ्य काय असेल,
तर ते म्हणजे,
पुरुषाची विवेकता आणि
महिलेचे सौंदर्य.
आचार्य चाणक्य

ज्यावेळी विनाश जवळ येतो,
त्यावेळी बुद्धी भ्रष्ट होते.
आचार्य चाणक्य

काही गोष्टी या दुसऱ्याच्या चुकांमधून देखील शिका,
स्वतःवर प्रयोग करून जर तुम्ही प्रत्येक गोष्ट शिकण्याचा प्रयत्न केला
तर संपूर्ण जीवनदेखील तुम्हाला कमी पडेल.
आचार्य चाणक्य

समाधान आणि संयमाने मिळणारा
आनंद दुसऱ्या कशानेही मिळू शकत नाही.
आचार्य चाणक्य

मानवतेपेक्षा कोणताही धर्म श्रेष्ठ नाही.
आचार्य चाणक्य

जी व्यक्ती आपल्या निंदा शांतपणे ऐकून घेते,
ती दुनियेतील कोणतेही युद्ध जिंकू शकते.
आचार्य चाणक्य

ज्या लोकांचा स्वभाव आवश्यकतेपेक्षा,
जास्त साधा-सरळ, आणि सहज असतो,
त्यांना आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागतो…
धूर्त आणि लोभी लोक यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊ शकतात.
अशा लोकांना दुर्बल समजले जाते.
अनावश्यक स्वरुपात या लोकांना त्रास सहन करावा लागतो.
आचार्य चाणक्य

जे इतरांचे कल्याण करतात,
त्यांनाच आध्यात्मिक शांती मिळू शकते.
आचार्य चाणक्य

देशाचे रक्षण करण्यासाठी तुम्ही प्रत्येक गोष्टीचा त्याग करावा.
आचार्य चाणक्य

प्रत्येक व्यक्तीचा सर्वात मोठा शत्रू जर कोणता असेल
तर तो म्हणजे,
“त्याची भूक”.
आचार्य चाणक्य

सिंहाला जंगलाचा राजा घोषित करण्यासाठी कोणतीही
सभा आयोजित केली जात नाही,
तो स्वतःच्या पराक्रम आणि गुणाने राजा बनतो.
आचार्य चाणक्य

जर तुम्ही स्वतःला तुच्छ, निर्धन, क्षुद्र मानत असाल,
तर तुम्ही तसेच व्हाल.
याउलट स्वतःचा आदर करत असाल,
तर आत्मनिर्भर व्हाल आणि यश प्राप्त कराल.
आचार्य चाणक्य

ज्याप्रमाणे नशा करणाऱ्या व्यक्तीला
बरोबर कि चूक याची जाणीव नसते,
त्याचप्रमाणे
स्वार्थी व्यक्तीला देखील बरोबर कि चूक
हे समजत नाही.
मुळात स्वार्थ हाच खूप मोठा नशा आहे.
आचार्य चाणक्य

वाईट व्यक्ती आणि काटे
यापासून वाचण्याचे फक्त दोनच उपाय आहे,
एक तर त्यांना पायाखाली चिरडून टाका
किंवा
त्यांच्यापासून अंतर ठेवा.
आचार्य चाणक्य

अपमानित होऊन जगण्यापेक्षा मेलेलं बर…!
कारण
मृत्य तर फक्त काही क्षण दुःख देतात,
मात्र
अपमान प्रत्येक दिवशी दुःख देतो.
आचार्य चाणक्य

परमेश्वराने आपल्याला दोन डोळे, दोन कान दिले आहेत;
मात्र जीभ एकच आहे.
याचा अर्थ आपण जास्तीत जास्त पाहावे, ऐकावे;
मात्र बोलावे मोजकेच.
आचार्य चाणक्य

कधीही वाईट लोकांच्या चांगल्या शब्दांवर विश्वास ठेवू नका.
कारण ते त्यांचा मूळ स्वभाव कधीही विसरत नाही.
वाघ हिंसा करायच सोडत नाही.
आचार्य चाणक्य

या जगात सर्वाधिक भरवशाच काय आहे,
तर ते म्हणजे स्वतःचे मन.
आचार्य चाणक्य

फुलाचा सुगंध केवळ हवेच्या दिशेला पसरतो,
परंतु
व्यक्तीचे सद्गुण सर्व दिशांना पसरतात.
आचार्य चाणक्य

Chanakya Quotes in Marathi

तर मित्रांनो, आम्हाला खात्री आहे कि आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले  Chanakya Quotes in Marathi आपल्याला नक्की आवडतील. जर हे अनमोल सुविचार आपल्याला आवडले असतील तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, आप्तस्वकीयांना अवश्य शेअर करा. जेणेकरून त्यांनादेखील आचार्य चाणक्य यांचे बहुमूल्य वचन वाचण्यास मिळतील.

हे वाचा : फक्त सुंदर दिसून काही उपयोग नाही, विचारदेखील सुंदर हवे…

अशाच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी आमच्या www.Netmarathi.com या वेबसाईटला भेट द्या.


Share :

Leave a Comment