Darudya Jokes in Marathi | दारुड्या व्यक्तींचे भन्नाट मराठी जोक्स

Share :

Darudya Jokes in Marathi – याठिकाणी आपण दारुड्या व्यक्तींचे भन्नाट मराठी जोक्स वाचणार आहोत. हे मराठी जोक्स आपल्याला नक्कीच आवडतील…

Darudya Jokes in Marathi

जर आपण दारुड्या व्यक्तींचे जोक्स वाचण्यासाठी उत्सुक असाल तर आम्ही आपल्याला याठिकाणी विविध जोक्स उपलब्ध करून दिले आहेत. हे जोक्स वाचून आपण हसल्याशिवाय राहणार नाही. आम्ही हे जोक्स उपलब्ध करून देताना चांगले जोक्सच याठिकाणी निवडले आहेत. त्यामुळे हे जोक्स नक्की वाचा.

काही दारू पिणारे व्यक्ती हे खूपच कॉमेडी करतात. आपण नक्कीच कुठे ना कुठे हे पाहिलेच असेल. त्यांच्या नकळत त्यांच्याकडून असे काही भन्नाट विनोद निर्माण होतात कि, आपल्यालाही हसू आवरत नाही. असेच मराठी जोक्स आम्ही येथे उपलब्ध करून दिले आहे.

Darudya-Jokes-in-Marathi
Darudya Jokes in Marathi
 

Darudya Jokes Marathi

एकदा चार पाच दारुड्या मित्रांनी एक टॅक्सी थांबवली.
 
दारुडे – चल…

टॅक्सी ड्रायव्हरने फक्त गाडी चालू करून बंद केली
आणि
म्हणाला, पोहचलो आपण…

एकाने टॅक्सी ड्रायव्हरला पैसे दिले,

दुसरा त्याला धन्यवाद म्हणाला

पण

तिसऱ्याने त्याच्या जोरात कानामागे मारली.

टॅक्सी ड्रायव्हर (घाबरत) – काय झालं, साहेब…?

दारुड्या – जरा हळू चालवत जा ना गाडी, अपघात झाला असता मग…!

बापू – दारु पेल्यावर खोकला जातो का रं तात्या???
.
.
.
.
तात्या – अरे बापू दारुमुळे माझं शेत गेलं,
घरदार गेलं, बायको गेली,
तर मग तुझा खोकला का जाणार नाही.
पी तु…!!!

एक दारुड्या लोळून गाणी म्हणत असतो.
 
मग तो उलटा होऊन परत गायला सुरुवात करतो.

शेजारून चाललेला एक माणूस – हे काय?

दारुड्या – कॅसेटची दुसरी बाजू लावलीय…

पोलीस (दारुड्याला) – रात्री एक वाजता कुठे चालला आहेस…?

दारुड्या – मी दारूचे दुष्परिणाम या विषयावर व्याख्यान ऐकायला चाललोय…!

पोलीस – इतक्या रात्री तुला कोण भाषण देणार आहे…?

दारुड्या – माझी बायको…!

एक लग्नात डीजेवाला नवरदेवाला – किती वाजेपर्यंत वाजवायचे आहे?

नवरदेव – फक्त 8 – 10 पेग होईपर्यंत…
मग माझे मित्र फक्त जनरेटरच्या आवाजावर पण नाचतील…

दरवेळी भिंतीवर धडकणार “दारुड्याच” असतो असं नाही,

तो

मोबाईल उचकत चालणारा पण असू शकतो…!

एक वैतागलेला दारुड्या…

बार मध्ये बसण्याचे फायदे….
 
दहा वीस रूपये टीप देऊन वेटर कडून आपले लाड पुरवून घेता येतात…
चना डाल मे कांदा टमाटा अलग देना,
बाॅइल्ड एग के साथ नमक और कालीमिरी अलग देना,
काकडीपे चाट मसाला नही चाहीये,
पंखा चालू कर…
बंद कर…
स्लो कर…
फास्ट कर…
अच्छा गाना है आवाज बढा …

ही नाटकं घरी आख्खा पगार देऊन पण नाही करता येत…!!!

असं माझे मित्र सांगतात…

एक बेवडा गच्चीतून खाली पडला

आजुबाजुचे धावत आले आणि बोलले “काय रे काय झाले”?
.
.
.
.
बेवडा – काय माहीत नाय बुवा,
मी पण आत्ताच खाली आलोय…

दारुड्या वेटरला – गरम काय आहे…?

वेटर – चहा…

दारुड्या – अजून जास्त गरम…?

वेटर – सूप…

दारुड्या – अजून…?

वेटर – उकळत पाणी…

दारुड्या – त्याच्यापेक्षा अजून गरम…?

वेटर – आगीचा गोळा आहे, तो देऊ का?

दारुड्या – हो घेऊन ये, मला बिडी पेटवायची आहे…

एक दारुड्या ICU त पडलेला असतो.
 
डॉक्टर येऊन त्याला तपासतात.

डॉक्टर – तुम्हाला लिव्हरचा प्रॉब्लेम आहे. बरोबर ना?

दारुड्या – हो. खूपच दुखतंय ओ डॉक्टर.

डॉक्टर – बरं, बरं, तुम्ही देशी घेता का?

दारुड्या – (जरा विचार करून) हो हो. पण एकच पेग द्या हं…जास्त नको.

कृपया दारु पिऊन ATM मध्ये जाऊ नका…
.
.
.
.
कारण
काल राञी माझ्या एका मिञाने 2000 ची नोट फाडुन टाकली
आणि
पांढरी स्लिप खिशात टाकली
यवढी पित्यात व्हय…!!!

पेशंट – डॉक्टर साहेब , तुम्ही सांगितल्या पासून दारू पित नाही ,
फक्त कोणी आग्रह केला तरच घेतो ?????

डॉक्टर – हे कोण तुमच्या बरोबर ?

पेशंट – ह्यालाच ठेवलाय आग्रह करायला…!!!

एकदा देव पृथ्वीवर आले.
 
चालता चालता त्याना तहान लागली.

इतक्यात समोरून दूधवाला येत होता.

त्याला थांबवून देवाने त्याच्याकडे
तहान भागविण्याकरीता थोडे दूध मागितले.

दूधवाला म्हणाला, “असं मोफत दूध मिळत नाही.”

दूधवाल्याचे उत्तर ऐकून देव पुढे चालतच राहिले.

पुढे एका लग्नाची वरात होती.

वरातीत एक माणूस दारू देत होता.

देवाने त्याच्याकडे दारू मागितली.

दारूवाला म्हणाला, “हवी तेवढी पी, नाच, मजा कर”.
देव त्या दारूवाल्यावर प्रसन्न झाले
 
आणि
 
त्याला वर दिला “लोक तुझ्याकडे शोधत शोधत येतील. तथास्तू!”
 
दूधवाल्याला शाप दिला “तुझे दूध खपवण्याकरीता तुला दारोदार जावं लागेल.

तीन दारुडे मित्र पुणे स्टेशनवर लोणावळा लोकलची वाट बघत उभे होते.
 
एवढ्यात लोकल येते, थांबते व सुटते.

तीन पैकी एक जण तसाच प्लॅटफॉर्मवर रहातो.

तो जोर जोरात हसू लागतो.

आजुबाजुचे लोक हैराण?

ह्याची गाडी चुकलीय आणि हा असा काय हसतोय?

न राहवून काहीजण त्याला विचारतात काय झालं हसायला?.
 
त्यावर तो म्हणतो, हसू नको तर काय करु?

ते दोघे जण मला सोडायला आले होते…

एका बसचा अपघात होतो.
 
माणस जोरजोरात रडायला लागतात…

कोणी म्हणत, माझा हात मोडला,
कोणी म्हणत, माझं डोक फुटलं…

तेवढ्यात एक दारुड्या मोठ्याने ओरडतो,
कंट्रोल युअरसेल्फ, तो माणूस मेला आहे तरी तो रडतसुद्धा नाहीये,

आणि

तुम्ही फक्त हात-पाय मोडला म्हणून मोठमोठ्याने रडताय…

एक दारुड्या विमानतळाच्या बाहेर उभा असतो.
 
एक युवक त्याच्या शेजारून चाललेला असतो.

दारुड्या त्या युवकाला – एक टॅक्सी घेऊन ये…!

युवक – मी पायलट आहे. टॅक्सीचा ड्रायव्हर नाही.

दारुड्या – अरे नाराज नको होऊ, मग एक विमान घेऊन ये…!

एक दारुड्या एका साधूला जाऊन धडकतो…
 
साधू – अरे मुर्खा, थांब मी तुला आता श्रापच देतो.

दारुड्या – थांबा, बाबाजी आताच नका देऊ,
मी पहिले ग्लास घेऊन येतो.

एक दारुड्या एकदा नेत्रदान करायला जातो.
 
क्लार्क – काही सांगू इच्छिता आपण…?

दारुड्या – ज्याला हे डोळे लावणार आहात,
त्याला सांगा दोन पेग टाकल्यावरच डोळे उघडतात…

Darudya Jokes in Marathi

तर मित्रांनो, आम्हाला खात्री आहे कि, आम्ही आपल्यासाठी जे दारुड्या  व्यक्तींचे मराठी जोक्स उपलब्ध करून दिले आहेत, ते आपल्याला नक्कीच आवडतील. आपल्याला हे जोक्स वाचून नक्कीच हसू आले असेल.
 
 
जर आपल्याला हे जोक्स आवडले असतील तर आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा. जेणेकरून तेदेखील हे मराठी जोक्स वाचून हसू लागतील.

Share :

Leave a Comment