Doctor Patient Jokes in Marathi | डॉक्टर पेशंट मराठी जोक्स

Doctor Patient Jokes in Marathi - याठिकाणी आपण डॉक्टर पेशंट यांच्यातील धमाल मराठी जोक्स वाचणार आहोत. आपल्याला हे जोक्स नक्की आवडतील...


जीवन हे सुख आणि दुःखाचे मिलन आहे. या सुख आणि दुःखाचा सामना ज्यावेळी आपण हसतमुखाने करतो, त्यावेळी आपल्याला एक वेगळ्याच प्रकारचा आनंद होत असतो. आपले पूर्वज देखील हेच सांगून गेले आहे कि, आपण सतत हसतमुख राहिले पाहिजे. कारण हसल्याने आपले आयुष्य वाढते. त्यामुळे आपण आपल्या जीवनात आनंदी राहिले पाहिजे आणि दुसऱ्यांना देखील आनंदी बनवले पाहिजे. विनाकारण चिंता करण्यापेक्षा आपले आणि दुसऱ्यांचे जीवन आनंददायी बनवा. त्यासाठी आपण आम्ही उपलब्ध करून दिलेले हे मराठी विनोद वाचू शकता.


Doctor Patient Jokes in Marathi


पोस्टमार्टम


डॉक्टर - बाई, तुमच्या नवऱ्याच्या सगळ्या टेस्ट झाल्यात
आणि
सगळेच रिपोर्ट नॉर्मल आले आहेत...
काही कळतच नाहीये,
यांना नेमकं काय झालंय ते...?

बाई (काळजीच्या सुरात) - अहो डॉक्टर साहेब, ते
पोस्ट मार्टम का काय असत, ते तरी करून पहा एकदा...!!!

पेशंट फरार आहे...

😂😂😂😂😂


व्यस्त डॉक्टर

 

एका डॉक्टरने नवीनच दवाखाना उघडला...

थोड्या वेळाने एक माणूस तिथे आला...

डॉक्टर साहेबांनी स्वतः खूप व्यस्त आहे,
असं दाखवण्यासाठी समोरील टेलिफोन कानाला लावला...

डॉक्टर (टेलिफोनवर) - नाही नाही, आज नको, उद्या दुपारी या...

मग फोन ठेवत डॉक्टर त्या माणसाला - हा, बोला काय समस्या आहे...?

तो माणूस - तुमचा टेलिफोन सुरु करण्यासाठी BSNL मधून आलोय...!!!

😂😂😂😂😂


फक्त आवाज येतो


राजू - डॉक्टर, कुणाबरोबर बोलताना मला त्याचा
फक्त आवाज ऐकू येतो... समोरची व्यक्ती दिसत नाही...

डॉक्टर - असे कधी होते???

राजू - जेव्हा मी फोनवर बोलत असतो तेव्हा...

डॉक्टर - निघ इथून... xxxxxxxxxxxxxxx

😂😂😂😂😂


वजन


पेशंट - डॉक्टर, वजन कमी करण्यासाठी तुम्ही
दिलेल्या या गोळ्या जेवणाआधी घ्यायच्या कि,
जेवणानंतर घ्यायच्या...?

डॉक्टर - त्या गोळ्या जेवणाऐवजी घ्यायच्या...!!!

😂😂😂😂😂


गाडी भाडे

 

एक माणूस रात्री 2 वाजता दारू पिऊन
डॉक्टरच्या घरी जातो
आणि
डॉक्टरला उठवून विचारतो...

डॉक्टर साहेब, घरी यायचे तुम्ही किती घेता...?

डॉक्टर - 500 रु. फक्त...

माणूस - चला मग डॉक्टर, पटकन...

डॉक्टर गाडी काढतात आणि
दोघेजण त्या माणसाच्या घराकडे निघतात...

माणूस - डॉक्टर साहेब, थांबा इथे... माझे घर आले...

डॉक्टर - ठीक आहे, पेशंट कुठे आहे...?

माणूस - अहो कुठला पेशंट...!
रात्री रिक्षावाले घरी जाण्याचे 1000 रु. मागत होते...!
हे घ्या तुमचे 500 रु.

😂😂😂😂😂


विचित्र आजार

 

पेशंट - डॉक्टर, मला एक विचित्र आजार झालायं…

डॉक्टर - काय होतंय तुम्हाला?

पेशंट - मला जेवणानंतर भूक लागत नाही,
सकाळी उठल्यावर झोप लागत नाही,
काम केल्यावर थकवा येतो…!
काय करू ?

डॉक्टर - रोज रात्री उन्हात बसा…!!!

😂😂😂😂😂


ड्रिंक

 

डॉक्टर (पेशंटला) - मी तुमचा प्रोब्लेम सांगू नाही शकत,
परंतु
बहुतेक हे ड्रिंकमुळे होत असेल...!

पेशंट - ठीक आहे डॉक्टर,
तुमची उतरल्यावर परत येतो...!!!

😂😂😂😂😂


वय

 

डॉक्टर - तुमचे वय काय?

स्री - अं... 28 वर्षे...

डॉक्टर - त्याच काय आहे बर का...
मला तुम्हाला या औषधाची मात्रा वयानुसार द्यावी लागेल...
त्यामुळे खर वय सांगा...

स्री - असं आहे का? डॉक्टर 32 वर्षे आहे...

डॉक्टर - बघा बर का?
वयानुसार मात्रा दिली गेली नाही तर तुम्ही कोमात देखील जाऊ शकता...!

स्री - आता ऑपरेशन थिएटरमधून माझा मुडदा जरी बाहेर आला तरी बेहत्तर... पण 49 फायनल...
याच्या पुढे मी जाऊ शकत नाही...!!!

😂😂😂😂😂


बाहेरचे जेवण

 

चिंटू - डॉक्टर, कालपासून पोटात दुखतय...

डॉक्टर - बाहेरचे काही खाता का...?

चिंटू - हो...

डॉक्टर - बाहेर काही खाऊ नका...

चिंटू - ठीक आहे डॉक्टर,
पार्सल घेऊन येत जाईन...!!!

😂😂😂😂😂


व्यायाम

 

डॉक्टर - हे बघा,
तुमची तब्येत सुधरायची असेल
तर
तुम्ही व्यायाम केला पाहिजे...

एक काम करा तुम्ही रोज कुठलातरी खेळ खेळायला सुरवात करा...

गंपू - डॉक्टर , मी तर रोज क्रिकेट आणि टेनिस खेळतो...

डॉक्टर - अरे वा... किती वेळ खेळता?

गंपू - जोपर्यंत मोबाइलचं चार्जिंग असतं तोपर्यंत...!!!


नकार

 

डॉक्टर - तुझे तीन दात कसे तुटले ?

रुग्ण - बायकोने दगडासारखी भाकरी तयार केली होती.

डॉक्टर - मग खायला नकार द्यायचा होता.

रुग्ण - तेच तर केले होते...!

😂😂😂😂😂


झोप

 

डॉक्टर - बोला काय त्रास आहे?

पेशंट - झोप खूप येते…नेहमी झोपतच असते मी.

डॉक्टर - कोणता मोबाईल वापरता आपण..?

पेशंट - Nokia 1100!

डॉक्टर - एक स्मार्ट फोन लिहून देतो, त्यात Jio sim टाकून
Facebook, Whatsaap
आणि
काही games install करा,
सगळं ठीक होईल..!

😂😂😂😂😂विसर

 

पेशंट - डॉक्टर, तुम्ही दिलेलं औषध कुठेच मिळालं नाही.

डॉक्टर - अरेच्चा... मी औषधाच नावच लिहायला विसरलो...
हि तर माझी सही आहे...!

😂😂😂😂😂


क्रिकेट

 

पेशंट - डॉक्टर… जेव्हा मी झोपतो तेव्हा
माझ्या स्वप्नात येऊन माकडं क्रिकेट खेळतात…

डॉक्टर - हे औषध घ्या.. आज रात्री झोपण्यापूर्वी खाऊन झोपा…

पेशंट - उद्या पासून खातो डॉक्टर साहेब…

डॉक्टर - का?

पेशंट - आज त्यांची फायनल मॅच आहे

डॉक्टर अजून बेशुद्ध आहेत ...


पुन्हा पुणेच

 

एक बाळ जन्माला आल्याबरोबर बोलायला लागतो…

तो नर्सला विचारतो, खायला काय आहे?

नर्स - पोहे आणि उपीट तयार आहे…

मुलगा - अरे देवा...!

परत पुण्यातच जन्माला आलो कि काय???

😂😂😂😂😂


प्लास्टिक सर्जरी

 

स्थळ - पुण्याशिवाय दुसरे कोणते असूच शकत नाही.

पेशंट - डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी करायची आहे!
साधारण किती खर्च येईल?

डॉक्टर - 3 लाख रुपये.

पेशंट (थोडा विचार करून) - …आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर?

डॉक्टर - निघ... xxxxxxxxxx

😂😂😂😂😂


विश्रांती

 

डॉक्टर - तुमच्या पतीस विश्रांतीची गरज आहे.
मी झोपेच्या गोळ्या लिहुन देतो.

पेशंटची पत्नी - किती वेळा देऊ.

डॉक्टर - देऊ नका. तुम्ही घ्यायच्यात...!!!

😂😂😂😂😂


पेग

 

डॉक्टर - कस येण केलं?

झंप्या - तब्येत ठीक न्हवती ओ…
छातीत दुखत होत…

डॉक्टर - दारू पिता का?

झंप्या - हो.. पण 1 च पेग बनवा…

डॉक्टर - निघ इथून, xxxxxxxxxx

😂😂😂😂😂


अविश्वास

 

मुलगी - प्लीज, डॉक्टर माझ्या प्रियकराला आत
बोलवा ना...!

डॉक्टर - माझ्यावर भरोसा ठेवा,
मी एक चांगला डॉक्टर आहे...
मी तसलं काही करणार नाही...

मुलगी - अहो, तसं काही नाही डॉक्टर...
तुमची नर्स बाहेर एकटी आहे,
आणि त्या xxxxxxxxxxx वर माझा
अजिबात विश्वास नाहीये...!

😂😂😂😂😂


सिटी स्कॅन

 

मुलगी - डॉक्टर माझं डोकं खुप दुखतंय...
.
.
.
.
डॉक्टर - मॅडम सिटी स्कॅन करावा लागेल...
.
.
.
.
मुलगी - पण माझ्या एकटीच्या त्रासासाठी सगळी
सिटी स्कँन करायची काय गरज आहे डॉक्टर...!!!

डॉक्टरने डिग्री विकायला काढलीये...!!!

😂😂😂😂😂


स्मित हास्य

 

डॉक्टर - (चिमणरावांना) मी माझ्या देखण्या नर्सला
कामावरून काढून टाकले आहे.

चिमणराव - का हो, तिने असा काय गुन्हा केला?

डॉक्टर - अहो मी माझ्या अनेक रोग्यांना परस्परात बोलताना
ऐकले
की,
तिच्या गोड स्मित हास्याने त्यांचे अर्धे रोग बरे होतात.


बघण्याची वेळ

 

लेडी डॉक्टर - काय हो तुम्ही रोज सकाळी माझ्या
क्लिनिकसमोर उभे राहून स्रियांना का बघत असता?

गण्या - अहो तुम्हीच तिथे लिहले आहे ना,
स्रियांना बघण्याची वेळ 9.30 ते 11.30

😂😂😂😂😂


हे देखील वाचा...


विश्रांती

 

डॉक्टरने चारूला तपासून सांगितले की,
तिला कोणताच आजार झालेला नसून
फक्त विश्रांतीची गरज आहे.

त्यावर चारू म्हणाली, पण डॉक्टर तुम्ही माझी जीभ तर तपासलीच नाही.

डॉक्टर म्हणाले, तिलादेखील विश्रांतीची गरज आहे.

😂😂😂😂😂


जबरदस्ती

 

डॉक्टर - तुम्ही पेशंटला 1 तासापूर्वी
घेऊन आला असता तर आम्ही त्याला
वाचवू शकलो असतो.

गंप्या - अहो, डॉक्टर
20 मिनिटांपूर्वी या व्यक्तीचा अपघात झालाय,
1 तासापूर्वी जबरदस्तीने आणायला पाहिजे होते का...!

😂😂😂😂😂


ब्रॅण्ड

 

डॉक्टर - आपण कोणता साबण वापरता?

गण्या - पांडुरंगाचा लिंबाचा साबण...

डॉक्टर - कोणती पेस्ट वापरता?

गण्या - पांडुरंगाची आयुर्वेदिक पेस्ट

डॉक्टर - शॅम्पू?

गण्या - पांडुरंगाचा हर्बल शैम्पू..

डॉक्टर - हेयर ऑईल?

गण्या - पांडुरंगाच आवळ्याच तेल…

डॉक्टर - हे पांडुरंग मल्टीनॅशनल कंपनी ब्रॅण्ड आहे की पॉप्युलर लोकल ब्रॅण्ड आहे?

गण्या - नाही... तसं काही डॉक्टर,
पांडुरंग माझा रूम पार्टनर आहे.

😂😂😂😂😂


ऑपरेशन


डॉक्टर ऑपरेशन थिएटरबाहेर येऊन सांगतात,

‘सुरज, तुझ्या मुलीला आम्ही वाचवू शकलो नाही.

हे ऐकताच तो माणूस 100 मजली इमारतीवरून खाली उडी मारतो.

50 व्या मजल्याजवळ
येताच तो माणूस विचार करतो की,
‘मला तर मुलगीच नाही.’

जेंव्हा तो 25 व्या मजल्याजवळ येतो,
तेंव्हा त्याच्या लक्षात येते की,
‘माझे तर अजून लग्नच झाले नाही.’

आणि

जेंव्हा तो 10 व्या मजल्याजवळ
येतो तेंव्हा त्याच्या लक्षात येते की,
‘मी सुरज नसून नीरज आहे.‘

😂😂😂😂😂


सल्ला

 

एका चॅनेलवर एका कार्यक्रमात विचारलेला प्रश्न :-
मुलगी - माझं वय अठरा वर्षे आहे.
माझा रंग गोरा आहे.
माझी त्वचा खुप मुलायम आणि नाजुक आहे.
मी रात्री काय लावुन झोपू?
.
.
.
.
डॉक्टरांचा सल्ला - दाराची कडी.

😂😂😂😂😂


त्रास

 

डॉक्टर - या पुर्वी तुम्हाला स्पॅांडिलायसिसचा त्रास झाला होता का?

पेशंट - हो खुप पुर्वी….

डॉक्टर - कधी?

पेशंट - शाळेत सरांनी स्पॅांडीलायसिसचे स्पेलिंग विचारले होते तेव्हा…!

😂😂😂😂😂


चोरी

 

नंदू - तुम्ही तर माझे हृदय चोरलेत डॉक्टर
I love you...!!!

लेडी डॉक्टर - अहो, चुकलात तुम्ही,
आम्ही तर तुमची किडनी चोरली आहे.

😂😂😂😂😂


चिंता

 

डॉक्टर - आता कसं वाटत आहे तुम्हाला?

पेशंट - तुम्ही दिलेल्या औषधाने फरक पडत आहे,
परंतु कधी कधी जीव घाबरल्यासारखा होतो...!

डॉक्टर - चिंता नका करू...
औषध दिले आहे,
तो पण जाईल.

नसेल समजले तर परत वाचा...

😂😂😂😂😂


चष्मा

 

पेशंट - डॉक्टर मी चष्मा वापरणे चालू केल्यावर
मला वाचता येईल ना...!

डॉक्टर - हो, नक्की...

पेशंट - धन्यवाद, डॉक्टर साहेब...
तुम्ही या अडाणी माणसाची दुनिया बदलून टाकली.

😂😂😂😂😂


कसं आठवू


एक गरोदर बाई डॉक्टरकडे जाते,

डॉक्टर - कितवा महिना?

बाई - आठवा...

डॉक्टर - इश्श... मी कसा आठवू...!

😂😂😂😂😂


स्लो पॉईजन

 

डॉक्टर - तुम्हाला माहिती आहे का,
सिगारेट एका प्रकारे स्लो पॉईजनचे काम करते...

चंदू काका - अहो डॉक्टर साहेब,
मला कुठे मारायची घाई आहे...!!!

😂😂😂😂😂


तहान

 

एक रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल होतो.
नर्स त्याला प्रथमोपचार देण्यासाठी येते.

रुग्ण - अहो सिस्टर, मला जरा पाणी द्या हो प्यायला...

नर्स - काय तहान लागली आहे का?

रुग्ण - (वैतागून) नाही… गळा लिकेज आहे का ते बघायचंय...!!!

😂😂😂😂😂


मच्छर

 

मोलकरिण - बाईसाहेब तुमच्या मुलाने मच्छर खाल्ले...
.
.
.
.
बाईसाहेब - माझ तोंड काय बघतेस डॉक्टरला बोलाव...
.
.
.
.
मोलकरिण - आता घाबरण्याचे कारण नाही बाईसाहेब...
.
.
.
.
मी त्याला All Out पाजले आहे...!!!

😂😂😂😂😂


वात

 

पेंशट - डॉक्टर मला वात आहे...
.
.
.
.
.
.
डॉक्टर - मग पेटव की...

पेशंट सरळ वारीला निघून गेलाय...


रोगमुक्त


पेशेंट एका ऑपेरेशन नंतर,

पेशेंट - डॉक्टर साहेब आता मी रोगमुक्त झालो आहे ना...

उत्तर मिळाले,

भावा डॉक्टर तर खालीच राहिलेत मी तर चित्रगुप्त आहे...!!!

😂😂😂😂😂


टाके

 

एका माणसाला डॉक्टर साहेबांची मजा घ्यायची हुक्की येते.
तो दवाखान्यात जातो.

माणूस - डॉक्टरसाहेब, तुम्हाला टाके घालता येतात का?

डॉक्टर - हो येतात की... कशाला घालायचे आहेत?

माणूस - ही घ्या चप्पल.
हिचा बंद तुटलाय, जरा टाके घालून द्या.

डॉक्टर - निघ... xxxxxxxxxxxxx

😂😂😂😂😂


रिचेकिंग

 

डॉक्टर (इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याला) - तुमची 1 किडनी फेल झाली आहे.

विद्यार्थी आधी खूप खूप रडला….,
मग डोळे पुसत बोलला...
.
.
.
.
RECHECKING मध्ये निघेल का??”

😂😂😂😂😂चावी

 

एक गृहस्थ आपल्या चार वर्षांच्या मुलाला डॉक्टरकडे घेऊन गेले

म्हणाले,

गृहस्थ - माझ्या मुलाने चावी गिळली आहे...

डॉक्टर - त्याने चावी गिळून किती वेळ झाला?

गृहस्थ - दहा दिवस झाले असतील.

डॉक्टर - काय? दहा दिवस …
इतक्या दिवसांनंतर माझ्याकडे आणताय?

गृहस्थ - इतके दिवस आमच्याकडे डुप्लिकेट चावी होती,
आजच हरवली.

😂😂😂😂😂


ऑपरेशन

 

डॉक्टर - घाबरू नका देशपांडे...
खूप छोटे ऑपरेशन आहे...

पेशंट - धन्यवाद डॉक्टर... पण
माझे नाव देशपांडे नाही...!

डॉक्टर - देशपांडे तुमचे नाही,
माझे नाव आहे...!!!

😂😂😂😂😂


औषध

 

डॉक्टर - तुम्हाला मलेरिया झाला आहे.

रुग्ण - डॉक्टर, खरच मलेरिया झालाय ना?
एकदा एकाला डॉक्टरांनी मलेरियाची औषधे दिलीत
पण
तो टॉयफाईडने मेला...

डॉक्टर - नाही,
माझे रुग्ण मलेरियाचे औषध दिल्यावर मलेरियानेच मरतात...!!!

😂😂😂😂😂


Doctor Patient Jokes in Marathi

तर मित्रांनो आम्हाला खात्री आहे कि, आम्ही याठिकाणी आपल्याला जे मराठी जोक्स उपलब्ध करून दिलेले आहेत, ते आपल्याला नक्कीच आवडतील. जर आपल्याला हे विनोद आवडले तर आपण आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा.


Doctor-Patient-Jokes-in-Marathi
Doctor Patient Jokes in Marathi


अशाच मराठी जोक्ससाठी वेळोवेळी आमच्या www.Netmarathi.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या.


महत्वपूर्ण सूचना
❝सदर मराठी जोक्स आम्ही फक्त आणि फक्त मनोरंजन म्हणून उपलब्ध करून देत आहोत. त्यामागे कोणाची बदनामी करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही.❞