आपल्या दैनंदिन जीवनात आपण हास्याला खूपच महत्वाचे स्थान दिले पाहिजे. बहुतेक लोकांना अशा व्यक्ती आवडतात कि ज्या त्यांना नेहमी हसवतात किंवा त्यांचा मूड चांगला ठेवतात. लोकांना अशा व्यक्ती कधीच आवडत नाही कि ज्या नेहमीच नकारात्मक, गंभीर असतात. त्यामुळे हसतमुख राहा आणि आपले व आपल्या प्रियाजनांचे आयुष्य आनंदमय बनवा. त्यासाठी आम्ही आपल्यासाठी येथे उपलब्ध करून दिलेले मराठी जोक्स वाचत राहा…
Festival Jokes in Marathi
अंधश्रद्धा
बायकोला तिळगुळ देणे हि
श्रद्धा आहे,
आणि
.
.
.
.
ती गोड गोड बोलेल हि
अंधश्रद्धा आहे…
😂😂😂😂😂
व्हॅलेंटाईन
रोज डे, प्रपोज डे, चॉकलेट डे,
टेडी डे, प्रॉमिस डे, कीस डे,
हग डे,
व्हॅलेंटाईन डे
हे सगळ लग्नाच्या अगोदर…
.
.
.
.
लग्न झाल्यावर तर फक्त…
टिफिन दे, चहा दे, रुमाल दे,
चादर दे, झोपून दे,
शांत जगून दे…
😂😂😂😂😂
जमणार नाही
कितीही तिळगुळ खा…
तुला गोड बोलण काही जमणार नाही…!
😂😂😂😂😂
त्वरा करा
तुम्ही सांगाल तेव्हा,
ऑर्डरनुसार घरी येऊन फराळ खाल्ला जाईल.
त्वरा करा, बुकिंग सुरू झालंय…!!!
😂😂😂😂😂
फराळ
चांदीच्या ताटात,
सुरमई अन हलवा,
शुभेच्छा सोडा राव,
कोणीतरी
फराळाला बोलवा…!
😂😂😂😂😂
कसे आहात…?
नमस्कार मंडळी,
कसे आहात?
मजेत ना…!
आणि
आपला नेहमीचाच आपुलकीचा प्रश्न…
फराळाला बोलावतान ना…!
बोलवलच पाहिजे…
नाहीतर संपणार कसे…!
😂😂😂😂😂
अवघड आहे बुवा…
अवघड आहे राव,
दिवाळी मध्ये कपाट उघडले कि,
सगळे कपडे जुने वाटतात,
आणि
होळीमध्ये उघडले कि,
सगळे कपडे नवे वाटतात…!
😂😂😂😂😂
गोड बोला
तिळगुळ घ्या
आणि
पाठीमागे पण गोड गोड बोला…
.
.
.
.
कारण,
तुम्ही तोंडावर तर गोडच बोलता…!
😂😂😂😂😂
उठा उठा
उठा उठा दिवाळी आली,
पणती हातात घेऊन फोटो काढायची वेळ झाली…!
😂😂😂😂😂
दरारा
दरारा कसा पाहिजे…?
सुटली बॉम्ब सारखा…!
वाजला तर ठीक नाहीतर
पेटला कि नाही हे,
जवळ जाऊन बघायला पण
जाम फाटते…!
😂😂😂😂😂
सांताक्लॉज
माझ्याकडे रात्री सांताक्लॉज आला
आणि
म्हणाला, माघ तुला काय हवे आहे ते???
मी म्हणालो, मला दुसरी बायको दे,
सध्याची माझ्याबरोबर खूप भांडते…!
सांताक्लॉजने मला खूपच तुडवला…
मग मला समजले कि,
माझी बायकोच सांताक्लॉज बनून आली होती…
😂😂😂😂😂
कडक उपवास
पती – नवरात्रीचे उपवास आहेत का?
पत्नी – हा…
पती – काही खाल्ले का…?
पत्नी – काही खास नाही…
पती – तरी काय काय खाल्ले…???
पत्नी – सफरचंद, काजू, बदाम, केळी, शेंगदाणे
पेरू, शाबूदाणा, शाबुदाण्याची खीर, पापड, काकडी,
सकाळी दोन कप चहा
आणि
आता ज्यूस पीत आहे…
पती – अरे बापरे…!
इतका कडक उपवास…
इतका कडक उपवास करण्याची हिम्मत तू कशी काय केली…???
अजून काही खाण्याची इच्छा आहे का?
नाहीतर तुला कमजोरी येईल..!!!
😂😂😂😂😂
एन्जॉयमेंट
कोंबडा स्विमिंग पूलमध्ये मनसोक्त पोहत असतो.
कोंबडी – आज तर मूड खूपच फ्रेश दिसतोय…
कोंबडा – हो, ना.
पहिले बकरी ईद, मग गणपती,
मग पितृपक्ष आणि आता नवरात्र.
एन्जॉयमेंट तो बनता है…!
😂😂😂😂😂
गुरुG
2G, 3G, 4G, 5G
आणि 6G पण येईल,
परंतु,
गुरुG शिवाय पर्याय नाही…
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
😂😂😂😂😂
बालदिन
वयाने मोठ्या आणि बुद्धीने
लहान असणाऱ्या माझ्या सर्व
मित्र-मैत्रीणीना
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
😂😂😂😂😂
आता तरी बोलवा
चांदीच्या ताटात,
सुरमई अन हलवा,
शुभेच्छा सोडा राव,
कोणीतरी
खायला-प्यायला बोलवा…!
😂😂😂😂😂
शुभेच्छा
सर्वांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या,
पण
.
.
.
.
वर्षा कुठे दिसली नाही राव…!
😂😂😂😂😂
काड्या
तिळगुळ घ्या,
गोड नाही बोलतात
तरी चालेल,
पण फक्त
तेवढं ते काड्या करायचं बंद करा…!
😂😂😂😂😂
गरबा
ज्या व्यक्तीला हे माहित नाही कि,
कधी पुढे जायचं आणि कधी मागे,
ती व्यक्ती कधीच गरबा खेळू शकत नाही…!
😂😂😂😂😂
गटारी
ओकू नका, माकू नका
मटणावर जास्त ताव मारु नका
फुकट मिळाली तर ढोसू नका
दिसेल त्या गटारात लोळू नका
गटारीच्या गटारमय शुभेच्छा!
😂😂😂😂😂
Gatari Special
संपली केव्हाच आषाढीची वारी
चला आता जोरात करु तयारी !
थोडेसेच दिवस हातात आहेत
जोरात साजरी करूया गटारी !
😂😂😂😂😂
खरी माणसे
तिळगुळ खाऊन खोटे खोटे बोलणाऱ्यापेक्षा,
चकना आणि क्वार्टर घेऊन
मनात येईल ते बोलणारी माणस
खरी असतात…
😂😂😂😂😂
गटारी स्पेशल
कोंबडीचा रस्सा मटणाचा साथ,
मच्छीची आमटी नि बिर्याणीचा भात,
बोम्बिलाची कढी भरलेला ताट,
खाऊन घ्या सगळं,
श्रावण महिना यायच्या आत
गटारीच्या हार्दिक शुभेच्छा!
😂😂😂😂😂
रक्षाबंधन स्पेशल
घर मालक – संपूर्ण वर्षभर तुझ्याकडे
तुझ्या खूप साऱ्या बहिणी आल्या होत्या…
या रक्षाबंधनला जर त्या सगळ्या आल्या नाही
तर रूम खाली कर xxxxxxxxxxxxxxxx
😂😂😂😂😂
Festival Jokes in Marathi
मित्रांनो आम्हाला खात्री आहे कि, आपल्याला हे मराठी जोक्स नक्कीच आवडतील. जर आपल्याला हे जोक्स आवडले असतील तर कृपया आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. जेणेकरून त्यांच्या चेहऱ्यावरदेखील हसू उमटेल….
![]() |
Festival Jokes in Marathi |