भगवान गौतम बुद्ध यांचे अनमोल विचार | Gautam Buddha Quotes in Marathi

Share :

Gautam Buddha Quotes in Marathi – या लेखात आपण महात्मा भगवान गौतम बुद्ध यांचे काही अनमोल विचार, वचन जाणून घेणार आहोत, जे आपल्याला नक्कीच आवडतील…

Gautam Buddha Quotes in Marathi

भगवान गौतम बुद्ध यांनी जगाला सत्य, अहिंसा आणि शांती यांची शिकवण प्रदान केली होती. भगवान गौतम बुद्ध यांचे अनमोल विचार आजही जगाला प्रेरणा देण्याचे कार्य करतात. त्यांच्या काही अनमोल विचार आणि शिकवणुकीत सत्य, अहिंसा, शांती, समानता आणि मानवता यांचा समावेश होतो. त्यांनी आपल्या तपश्चर्येतून सत्य प्राप्त केले होते. त्यांनी जगाला अनमोल उपदेश देण्याचे कार्य केले.

भगवान गौतम बुद्ध यांनी असे सांगितले होते कि, सत्य पालन हाच जगातील  सर्वात मोठा धर्म आहे. त्यांनी सत्य, अहिंसा आणि शांती याचे महत्व जगाला पटवून दिले होते. आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण भगवान गौतम बुद्धांचे अनमोल विचार वाचणार आहोत कि, जे आपल्याला जीवन जगताना आयुष्यभर प्रेरणा देत राहतील.

Gautam-Buddha-Quotes-Marathi

चला तर मग सुरु करुया…

Gautam Buddha Anmol Vichar Marathi

तुमचा शत्रू तुमचे जितके नुकसान करत नाही,
त्यापेक्षा जास्त नुकसान तुमचे नकारात्मक
विचार करतात.

तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टीना
तुमचे स्वतः चे कर्मच जबाबदार असते, हे
तुमच्या एक दिवस नक्की लक्षात येईल.
तुम्ही केलेल्या कर्माची चांगली, वाईट फळे तुम्हाला
इथेच भोगावी लागतात.

तुम्ही तिच गोष्ट गमावता,
ज्या गोष्टीला तुम्ही अधिक बिलगून बसता.

जो स्वतःच्या आणि
इतरांच्या कल्याणासाठी झटतो,
तो सर्वात उत्तम पुरुष समजावा.

कोणते काम करून झाले आहे,
हे मी कधीच पाहत नाही.
कोणते काम करायचे बाकी आहे, याकडेच
माझे लक्ष असते.

जो मनुष्य मनात उफाळलेल्या
क्रोधाला वेगवान रथाला रोखल्याप्रमाणे
त्वरित आवर घालतो,
त्यालाच मी खरा सारथी समजतो.
क्रोधभ्रष्ट होऊन त्याप्रमाणे चालणारा केवळ
लगाम हातात ठेवणाराच समजला जातो.

ध्यान करून ज्ञान मिळवता येते
आणि ज्ञान नसेल तर माणूस अज्ञानी राहतो.
आपण ह्या गोष्टी जरूर लक्षात घ्याव्यात
की, कोणत्या गोष्टी आपल्याला समोर घेऊन जातील
आणि कोणत्या अडवून ठेवतील,
म्हणून तेच निवडा जे तुम्हाला ज्ञानाकडे,
ध्येयाकडे घेऊन जातील.

कोणतीही गोष्ट देण्यामध्ये काय सामर्थ्य आहे,
हे तुम्हाला जर कळत असेल
तर तुम्ही कोणत्याही दिवशीचे जेवण हे
एखाद्याबरोबर वाटून घेतल्याशिवाय राहू शकत नाही.

भूतकाळाकडे लक्ष देऊ नका,
भविष्याचा विचार करू नका,
आजच्या वर्तमानात चित्त केंद्रित करा.

अर्थहीन वाद-विवादापेक्षा
अर्थपूर्ण शांतता नेहमीच श्रेष्ठ असते.

तुमच्या स्वतःशिवाय कोणीही आपल्याला
वाचवू शकत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा.

आपल्या विचारांवर आपण
अवघे विश्व  निर्माण करू शकतो.

प्रेम म्हणजे एखाद्याच्या आंतरिक
परमात्म्याची ओढ.
हे दोन जीव एकत्र आले कि,
ते परिपूर्ण होतात.
प्रेमाने तर जगही जिंकता येते.

तुमच्याकडे वेळ आहे,
असा जेव्हा तुम्ही समज करता
तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे.
कारण वेळ कधी कोणावर कशी येईल,
हे कधीच सांगता येत नाही.
त्यामुळे जी वेळ आहे,
त्याचा व्यवस्थित उपयोग करून घ्या.

आपल्या संचित पापांचा परिणाम
म्हणजेच दु:ख होय.

तुमच्या रागामुळे तुम्हाला शिक्षा होणार नाही,
परंतु तुमच्या रागाने तुम्हाला शिक्षा होईल.

शांतता हि नेहमी मनातूनच येत असते.
त्याचा कुठेही बाहेर शोध घ्यायला गेलात तर
ती मिळणार नाही.

जगात इतर कोणावरही अधिक प्रेम करण्यापेक्षा
तुम्ही स्वतःच स्वतःवर अधिक प्रेम करण्यासाठी पात्र आहात.
स्वतःवर प्रेम करण्यास शिका.

दुसऱ्यांच्या दु:खात भागीदार व्हावयास शिकणे
हेच खरे शिक्षण आहे.

पाप अपरिपक्व असे पर्यंत गोड लागते;
परंतु ज्यावेळी ते पक्व होऊ लागते,
त्यावेळी खूप दु:खकारक असते.

हे वाचा : Marathi Suvichar | सर्वोत्तम व सुंदर मराठी सुविचार

Gautam Buddha Suvichar

रागाला शांततेने जिंका,
वाईटाला चांगल्याने जिंका
आणि
असत्याला सत्य बोलून जिंका.

ज्या पद्धतीने मेणबत्ती आगीशिवाय जळत नाही,
त्याच पद्धतीने,
मनुष्य आध्यात्मिक जीवनाशिवाय जगू शकत नाही.

जगात तीन गोष्टी कधीही लपवल्या जात नाही,
त्या म्हणजे,
सूर्य, चंद्र आणि सत्य.

दुसऱ्यांच्या दुःखात भागीदार व्हावयास शिकणे,
हेच खरे शिक्षण आहे.

पृथ्वी वरील घनदाट वृक्षांच्या छायेपेक्षा,
विवेकरुपी वृक्षांची छाया अधिक शीतल असते.

दयाळूपणा दाखवा.
नेहमी प्रेमाने वागा.
तुमचा हेतू चांगला आहे ना, हे तपासून पाहा.
तुमची वागणूक योग्य आहे ते तपासा
आणि नेहमी दुसऱ्याला माफ करण्याची क्षमता ठेवा.

देव आणि भक्त
यांमध्ये मध्यस्थाची गरज नाही.

जर तुम्ही खरंच स्वतःवर प्रेम करत असाल
तर तुम्ही कधीही दुसऱ्यांना दुःख देऊ शकत नाही.

आकाशात पूर्व आणि पश्चिम यामध्ये काहीही भेदभाव नाही.
लोक स्वतः आपल्या मनात भेदभाव निर्माण करतात
आणि हेच सत्य आहे असे समजू लागतात.

संयम हा खूप कडवट असतो,
पण त्याच फळ खूप गोड असतं.

आत्मज्ञान हे सर्व श्रेष्ठ आहे,
कारण आत्मज्ञानाच्या प्राप्तीनेच अहंकाराचा नाश होतो.

आदर हा आरशाप्रमाणे असतो.
जितका तुम्ही अधिक दाखवाल,
तितका तुम्हाला तो अधिक परत मिळेल.

एक क्षण एक दिवस बदलू शकतो,
एक दिवस आयुष्य बदलू शकतो,
आणि एखाद्याचे आयुष्य हे संपूर्ण जग बदलू शकतो.

नेहमी चांगला विचार करा.
दुसऱ्यांबरोबर चांगले वागा.
त्यांच्याबद्दल चांगले बोला.
या सगळ्याचा परिणाम म्हणजे,
तुमचेही नेहमी चांगलेच होईल.

भयाने व्याप्त असणाऱ्या या विश्वात
दयाशील वृतीचा मनुष्यच निर्भय पणाने राहू शकतो.

तुम्ही कितीही चांगले विचार वाचा,बोला,
मात्र जोपर्यंत तुम्ही त्यांना अमलात आणणार नाही
तोपर्यंत तुमचं काहीही चांगलं होणार नाही.

चित्त हे पाण्याप्रमाणे आहे.
जेव्हा पाणी खळाळतं असतं,
त्यावेळी आपल्याला त्यातील काहीच दिसत नाही,
त्याचप्रमाणे चित्त थाऱ्यावर नसतं तेव्हा काहीच दिसत नाही.
पण पाणी जेव्हा शांत असतं, तेव्हा त्याचा तळंही दिसतो.
त्याचप्रमाणे चित्त थाऱ्यावर असेल तर,
कोणत्याही संकटाचा सामना करणं अत्यंत सोपे होते.

एक निष्ठाहिन आणि वाईट मित्र हा
जंगली प्राण्यापेक्षा जास्त भयानक असतो;
कारण एक जंगली प्राणी फक्त शरीराला घाव देतो,
परंतु, एक वाईट मित्र तुमच्या मनावर आणि बुद्धीवर घाव घालतो.

आज आपण जे काही आहोत,
त्याचे कारण म्हणजे आपण
आजपर्यंत  “कसा विचार” केला
याचा परिणाम आहे.

जीवन ते नाही जे आपल्याला मिळाले आहे,
जीवन तर ते आहे, जे आपण बनवतो.

हे वाचा : आचार्य चाणक्य यांचे 50+ अनमोल विचार | Chanakya Quotes in Marathi

Thoughts of Gautam Buddha in Marathi

आपल्या वयावर आणि पैश्यांवर
कधीच घमंड करू नका,
कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात,
त्या एक ना एक दिवस संपतातच.

कधीही कोणाचीही भीती बाळगून राहू नका.
कोणावरही अवलंबून राहू नका.

माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे.
प्राणी मात्रांवर हृदयपूर्वक प्रेम करणे,
हीच खरी मानवता आहे.

मनासारखे सामर्थ्यशाली कोणीही नाही,
तुम्ही जो विचार करता, त्याप्रमाणे तुम्ही बनता.

एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्ती उजळू शकता.
आनंदाचेही तसेच आहे.
तुम्ही जितका आनंद वाटणार तितका तो वाढणार.
आनंद हा वाटल्याने कधीच कमी होत नसतो.

ज्यावेळी परिस्थिती बदलणे अशक्य होऊन बसते,
त्यावेळी तुमची मनस्थिती बदला.
सर्व काही बदलून जाईल.

जे लोक जास्त बोलतात,
ते शिकण्याचा प्रयत्न करत नाहीत.
परंतु शहाणा माणूस नेहमी निडर व धैर्यशील
असतो.
तो संयमाने योग्य वेळी योग्य तेच बोलतो.

स्वतःच्या क्षमतेवर कोणतेही कार्य करा,
दुसऱ्यावर अवलंबून राहू नका.

हजारो निरर्थक शब्द बोलण्यापेक्षा,
मनाला शांती देणारा,
बोलणारा एक शब्द केव्हाही चांगला.

ज्ञानी मनुष्य हा विश्वाचा स्वर्ग बनवू शकतो.

हे वाचा : संयमाचे फळ – अनमोल शिकवण देणारी कथा | Gautam Buddha Story in Marathi

तर मित्रांनो, आम्हाला खात्री आहे कि, आम्ही आपल्यासाठी जे गौतम बुद्ध यांचे अनमोल विचार उपलब्ध करून दिलेले आहेत, ते वाचून आपल्याला नक्कीच एक प्रकारचे समाधान आणि शांती प्राप्त झाली असेल. मुळात भगवान गौतम बुद्ध यांचे विचार आपल्याला एक प्रकारची मनशांती आणि समाधान प्राप्त करून देतात.

जर हे विचार आपल्याला आवडले असतील तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. भगवान गौतम बुद्ध यांचे अनमोल विचार त्यांनादेखील समजू द्या, म्हणजे त्यांनाही या अनमोल विचारांचा फायदा होईल.


Share :

Leave a Comment